चुकून तणनाशक फवारले का?

चुकून तणनाशक फवारले का?

अनेक वेळा शेजारच्या शेतात तणनाशकाची फवारणी होते, तर कधी कधी आपण तणनाशकाच्या पंपाने कीटक नाशक फवारतो व उभ्या पिकावर त्याचा वाईट परिणाम होतो. खाली कापसावर टू फोर डी या तणनाशकाचा परिणाम दिसतो आहे. अश्या वेळी काय करावे? फोटोंच्या खाली उपाय योजना देखील दिली आहे. 

 

जेव्हा उभ्या पिकावर चुकून तणनाशकाची फवारणी होते तेव्हा हि तण नाशके चय-अपचय प्रक्रिया मंदावतात व पिकाला इजा व्हायला सुरुवात होते.

अश्या विपरीत परिस्थितीतून जेव्हा आपण पिकाला सावरायचा प्रत्यत्न करतो व त्यास पाणी व खते उपलब्ध करून देतो त्यावेळी विकरे तयार व्हायला वेळ जात असल्याने पिकाची वाढ पूर्ववत व्हायला वेळ लागतो. अशा वेळी आपण जर फॉलीबिओन ची फवारणी केली फायदा होतो कारण फॉलीबिओन मध्ये अमिनो एसिड आहेत ज्या पासून विकरे बनवली जातात. हा एक शॉटकट आहे. विकरे अपेक्षेपेक्षा अधिक लवकर बनल्याने पिकाच्या वाढीचा वेग पूर्ववत व्हायला मदत होते व पिक लवकर सावरते.

विपरीत परिस्थितीमुळे मागे पडलेले पिक फॉलीबिओन च्या मदतीने वेळ व सत्व भरून काढते ज्या मुळे उत्पादनावर होणारे दुष्परिणाम टाळले जातात.

बाजारात उपलब्ध प्रोटीन हायड्रोलायझेटस ला एक घाण वास असतो, ते पातळ असतात व त्यात मोठ्या प्रमाणात सोडियम क्लोराईड असते कारण ते अर्धवट कुजलेल्या-सडलेल्या सोर्सेस वर एसिड हायड्रोलीसीस या प्रक्रीयेद्वारे बनवले जातात व त्याचे स्प्रेड्राइंग करून पावडर बनवली जाते. हि पावडर बाहेरून इम्पोर्ट होते. इकडे आल्यावर यातच पाणी टाकून लिक्विड फोर्म्युलेशन बनवले जाते. एका प्रमाणापेक्षा जास्त विरघळवायचा प्रतत्न केल्यावर हि द्रावणे गढूळ बनतात व त्यातून खाली गाळ बसतो व वरती साय तयार होते. सोर्स चा घाणेरडा वास देखील टिकून रहातो.

--------------------------------
-------------------------------


फॉलीबीऑन ची निर्मित फ्रेश सोर्सेस पासून केली जाते. प्रथिने वेगळी केली जातात. त्यावर एन्झाईम प्रकिया करून रिव्हर्स ऑसमॉसीस, अल्ट्राफिल्टर व मायक्रोफिल्टर या प्रक्रिया वापरून कॉन्संट्रेट केले जाते. संपूर्ण पणे होलिस्टिक प्रक्रियांमुळे फॉलीबीऑन हे पारदर्शक, घट्ट व सुवासिक आहे. आत २० पेक्षा अधिक प्रकारचे अमिनो एसिड आहेत, हे मॉलेक्युल फार छोटे असल्याने लगेच शोषले जातात, लगेच लागू होतात व अधिक परिणाम कारक ठरतात.

फॉलीबिओन चे डोसेस काय आहेत? पिकाचे वय व वाढ लक्षात घेवून फवारणी चे डोसेस निवडावे. लहान पिकात १ मिली प्रती लिटर, फुलावर यायच्या वळेस २ मिली प्रती लिटर, फळावर यायच्या अगोदर ३ मिली प्रती लिटर. विपरीत परिस्थिती किंवा व्हायरस लागण झाल्यावर सुधारणे साठी १ ते २ मिली प्रती लिटर. ड्रीप ने देण्यासाठी ५०० मिली प्रती एकर, रोपांच्या पुनरलागवड करते वेळी रूट डीपिंग साठी ५ ते १० मिली प्रती लिटर.

Back to blog