एकात्मिक नियंत्रणाकडे वळायचे सहा टप्पे

पिक व्यवस्थापनाच्या बाबतीत अनेक शेतकरी बांधवांच्या मनात पराकोटीचा गोंधळ दिसून येतो. या गोंधळामुळे काही मंडळी रसायनांचा अतिवापर करतात तर काही सेंद्रियचा अतिरेक करतात. या गोंधळाचे रुपांतर तात्कालिक नुकसान व दूरगामी दुष्परिणाम यात होते. हे टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करण्याकडे कल असला पाहिजे. एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीने प्रत्येक प्रक्रिया करावी लागते. रोग-कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत एकात्मिक नियंत्रणाकडे वळायचे सहा टप्पे आहेत, त्याची माहिती घेवू.

ओळख शत्रू व मित्रांशी: बहुतेक सर्वच सजीव आपल्या अत्यंत उपयोगाचे आहेत. जे काही जिवंत आहे ते सगळे घालवुन आपले भागणार नाही. एकात्मीक पद्धतीच्या पहिल्या पायरीवर आपल्या शेतात कोणकोणते जीव राहतात यांची ओळख करून घ्यावी. 

जेव्हा आपण शेतात बेछूट फवारणी करतो तेव्हा स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. अश्या अनावश्यक फवारण्या एकीकडे आपल्याला खर्चिक तर असतातच पण त्यांच्या प्रभावात अनेक मित्र किडी व मधमाश्या मारल्या जातात. असे होवू नये म्हणून मित्र किडींची ओळख असणे आवश्यक आहे. 

शेताचे निरीक्षण व परीक्षण: एका अचूक निर्णयासाठी शेताच्या परीस्थीतीचे, शत्रू व मित्र जीवांच्या संख्याबळाचे, पिकाच्या वाढीच्या अवस्थेचे व पोषणाचे व्यवस्थित आकलन करायला हवे. अनेक फळांच्या व भाजीपाल्याच्या उत्पादनात क्षेत्राच्या नियमीत निरीक्षणातुन व रासायनिक फवारणीवर अंकुष ठेवुन उत्पादकता व गुणवत्ता यात सुधारणा शक्य झाली.

आपल्या शेतात शत्रूकीड आहे? तिचे प्रमाण घातक आहे का? जर नसेल तर फवारणी का करायची? त्यासाठी शेतात नित्याच्या फेर फटका मारायला हवा. उदा. जर कापसाच्या शेतात वीस झाडांपैकी ३ झाडांवर बोंडअळी चा आघात झालेला असेल तर फवारणी करयाची गरज आहे त्यापेक्षा कमी असेल तर फवारणी करू नये. अनेक वेळा संतुलित खत नियोजन केल्याने पिकात इतकी प्रतिकारशक्ती निर्माण होते कि रोग व किडी प्रमाणापेक्षा अधिक वाढूच शकत नाहीत. पाटील बायोटेक तंत्रज्ञानात संतुलित खत मात्रेचा मोठा आधार आहे. शेतकरी बांधवानी हे तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे. 


कृती आराखड्याचा उपयोग: कृती आराखड्याच्या वापराने योग्य वेळी व योग्य प्रमाणात किटनियंत्रकाचा वापर करून फक्त कीटनियंत्रकाचा अपव्यय टळतो असे नाही तर परीणाम ही जास्त होतो.

आपल्याकडे बहुतेकवेळी परिस्थिती पार हाताबाहेर गेल्यावर भारंभार फवारण्या होतात. कमीत कमी पुढील एका वर्षाचा कृती आराखडा बनवायला हवा, त्याला वेळोवेळी अपडेट करायला हवे.

 

आवाराचे  व्यवस्थापन: अनेक हानीकारक कीटक बांधावार, शेजारील पिकावर, कृषि कचऱ्यात व मृदेत निवास करतात. अवजाराच्या व माणसाच्या हालचालीतूनही त्यांचे परिवहन होते. पिकाच्या प्रतिकारक्षम जातीच्या वापराने, पेरणितील अंतर व लागवडीच्या वेळेत बदल करून आवाराचे व्यवस्थापन शक्य आहे.

नियंत्रण पद्धतींचा ताळमेळ: बचावात्मक व नियंत्रणात्मक पद्धतींचा योग्य ताळमेळ साधणे आवश्यक आहे. जैविक, भौतिक व रासायनिक पद्धतींचा योग्य ताळमेळ साधल्याने दीर्घकालीन व अधिक प्रभावी नियंत्रण शक्य आहे. त्यामुळे निव्वळ रासायनिक पद्धतीच्या वापराने भोगाव्या लागणऱ्या दुष्परीणामांना चुकवणे शक्य आहे. रासायनिक पद्धतींचा अवलंब हा एकात्मिक नियंत्रणातील शेवटचा घटक असून तीचा उपयोग क्वचीतच व नाममात्र करावा लागतो.

उदा. कापसाच्या क्षेत्रात एकरी दहा (पिवळे ७ व निळे ३) चिकट सापळे लावले तर कीडनिरीक्षण व नियंत्रण दोघी शक्य होते. जर परिसरातील सर्व शेतकरी बांधवानी मिळून हे नियोजन केले तर अधिक प्रभावी होऊ शकते.


आपल्या कृतीच्या परीणामाचे व परीणामकतेचे मुल्यांकन: प्रत्येक निर्णय पद्धतींचे विश्लेषण हा अवीभाज्य घटक आहे. नियंत्रित प्लॉट निरीक्षणासाठी ठेवणे, प्रत्येक फवारणी नंतरचे निरीक्षण नोंदुन ठेवणे, पिकाच्या गुणात्मक व उत्पादकतेचे विश्लेषण करणे या क्रिया आपल्या कृतीच्या परिणामकतेचे व परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी उपयोगी सिद्ध होतात. प्रत्येक शेतकरी बांधवाने डायरी नोंद करणे आवश्यक आहे. आकडे, चित्र, रेखाटने यांचा उपयोग करावा. 

 

आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

---------------------