Call 9923974222 for dealership.

एसिफेटचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्यापूर्वी नक्की वाचा

कीटकनाशकांचा वापर करते वेळी अपुऱ्या ज्ञानामुळे आर्थिक, मानसिक व शारीरिक दृष्ट्या भयंकर नुकसान होते. कीटकनाशकाचा प्रमाणात व योग्य पद्धतीने वापर केला तर हे नुकसान टाळता येईल हि बाब लक्षात घेवून आम्ही आपल्यासाठी ब्लॉगची हि नवीन सेरीज घेवून येत आहोत. आपण या सेरीजचा उपयोग करा व आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.

एसिफेटवर आधारित कीटकनाशके खालील प्रमाणे आहेत

  एसिफेट ७५ % एसपी हे पावडर स्वरूपातील कीटक नाशक असून कापूस, करडई व भात या पिकात शिफारस देण्यात येते. काढणीपूर्वी १५ दिवस याची फवारणी करू नये. कापसातील तुडतूडे नियंत्रणासाठी अर्धा ते एक ग्राम प्रती लिटर तर बोंडअळी नियंत्रणासाठी १ ते २ ग्राम प्रती लिटर असा डोस वापरावा.  करडईतील मावा नियंत्रणासाठी १ ते २ ग्राम प्रती लिटर असा डोस सुचवण्यात आला आहे. भात पिकातील खोड कीड, पाने गुंढाळणारी अळी व तुडतुडे नियंत्रणासाठी दोन ते तीन ग्राम प्रती लिटर एव्हडा डोस पुरेसा असतो. या कीटकनाशकाची व्यापारी नावे खालील प्रमाणे आहेत

  असाटाफ, फिल्डमार्शल,  टामरानगोल्ड,  लोड,  ऑसिफा,  स्टारथेन, ऑसोमिल,  ऑसाविप,  लान्सर,   ट्रीमोर,  टीनगार्ड,  मिलटाफ,  चेतक

   

   

  एसिफेट ९५ % एसजी एसिफेट ९५ % एसजी या कीटकनाशकाची शिफारस फक्त भात पिकात करण्यात आली असून, पिवळा खोड किडा, पाने गुंडाळणारी अळी व तपकिरी तुडतुडे नियंत्रणासाठी करता येतो. शेवटचे ३० दिवस या कीटकनाशकाचा वापर वर्ज असून प्रती लिटर एक ते सव्वा ग्राम एव्हड्याच प्रमाणात वापरावे.

  सिंगल कीटकनाशक वापरते वेळी अनेकदा किडीच्या प्रतिकारशक्ती मुळे डोसेस वाढवावी लागतात तसे करण्याऐवजी कोम्बो वापरल्याने फायदा होतो. असे कोम्बो स्वत: तयार करणे धोकेदायक असते त्याऐवजी खाली एसीफेट युक्त कोम्बो कीटकनाशकांची माहिती देत आहे.   

  एसिफेट ५० % + बायफेनथ्रीन १० % डब्ल्यूडीजी या कोम्बो कीटकनाशकाचा उपयोग फक्त कापूस पिकात केला जावू शकतो. तुडतूडे, फुलकिडे व बोंडअळी नियंत्रणासाठी एक ते दीड ग्राम प्रती लिटर प्रमाणात पाण्यात मिसळून फवारावे. शेवटच्या २० दिवसात याचा वापर करू नये.

  गुलाबी बोंडअळी चा सापळा फोटोवर क्लिककरून खरेदी करू शकता

  एसीफेट २५ % व फेनव्हलरेट ३% इसी. या पाण्यात एकसमान पसरणारया कोम्बो कीटकनाशकाचा उपयोग फक्त कापूस या पिकातील अमेरिकन बोंडअळी व अन्य रससोशक किडींच्या नियंत्रणासाठी ४ मिली प्रती लिटर या दराने करावा. शेवटच्या १५ दिवसात फवारणी वर्ज्य आहे.  या कीटकनाशकाची व्यापारी नावे "सरदार, कोनट्रा, असिफा" अशी आहेत.

   

   

  एसीफेट ५० % व इमिडाकलोप्रीड १.८% एस पी या कोम्बो कीटकनाशकाचा उपयोग फक्त कापूस या पिकातील  बोंडअळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरीमाशी या रससोशक किडींच्या नियंत्रणासाठी २ ग्राम प्रती लिटर या दराने करावा. शेवटच्या ४० दिवसात फवारणी वर्ज्य आहे. या कीटकनाशकाचे व्यापारी नाव लान्सर गोल्ड असे आहे.

  ब्युपरोफेन्झीन १५% व एसीफेट ३५ % वेटेबल पावडर या कीटकनाशकाचा वापर फक्त भात पिकातील तपकिरी व पांढरे तुडतुडे नियंत्रित करण्यसाठी केला जावा. शेवटचे २० दिवस शिल्लक असतांना अजिबात वापरू नये. डोस २.५ ग्राम प्रती लिटर.या कीटकनाशकाची व्यापारी नावे इंनोव्हा (पारस), टापुझ (एडामा) अशी आहेत.

  आपण हि माहिती आपल्या नोंदवहीत नोंदवून घ्यावीत जेणेकरून खरेदी करते वेळी त्याचा उपयोग करता येईल.

  एसिफेट हे ऑरगॅनो फोस्फेट प्रकारातील कीटकनाशक असून याचा कीटकांच्या मज्जातंतू व स्नायू वर परिणाम होतो. जर आपण या कीटकनाशकाचा वापर करून उपयोग झाला नसेल तर पर्यायी कीटकनाशकाचा उपयोग केल्याने अधिक फायदा होईल, त्यावर अधिक माहितीसाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता त्याकरता स्क्रीनवर "Message us" चे बटन आहे. त्यावर क्लिक करून आपले म्हणणे मांडा. २४ तासाच्या आत आम्ही आपल्याला प्रतिसाद देवू.

  15 comments

  • शेतकऱ्यांच्या खुपच उपयोगी माहिती आहे

   आंद्रेश लालझरे
  • ऊपयुक्त माहिती,……आभारी आहे.

   Sandip M Gaikwad
  • फारच उपयोगाची माहीती दिली! मी तर या वर्षि कापुस पेरूच नये असा विचार केला होता ! मागील वर्षी बोंडअळी मुळे उध्वस्त झालो! माझी ही अवस्था तर इतर शेतकर्‍यांच काय ?लाल बोंडअळीला प्रतिकारक आपले बियाणे आहे का ?

   प्रा.दिवाकर गमे
  • Atishay sundar mahiti aahe… Aaj ashya mahitichi garaj aahe. Karan kitknashakancha bhadimar chalu aahe. Thanks

   Arun Kolkar
  • असिफेट नि बोंड अली च नियंत्रण होते का ?

   लक्ष्मीकांत रमेशराव कदम

  Leave a comment

  Name and Mobile number .
  .
  Message with Address, District & Pincode .

  Please note, comments must be approved before they are published