तुमच्या शेतीपूरक जोडधंद्याला प्रसिद्धीची गरज आहे का?
शेतकरी हा जगातला सर्वोच्च दर्जाचा उद्योजक आहे. जगातील नामी उद्योजकांनी "शेतकऱ्यापासून प्रेरणा" घेतल्याचे अनेकदा सांगितले आहे. आम्हालाही अनेकदा शेतकरी बांधवांनी प्रेरित केले आहे, म्हणून आम्ही ठरवले आहे कि शेतकरी बांधवांच्या शेतीपूरक जोडधंद्याला प्रसिद्धी मिळवून द्यावी.
शेतीला पूरक कोणताही जोडधंदा असू द्या...
- डेअरी
- तूप, ताक, सुगंधी दुध, आईसक्रिम
- प्रक्रिया केलेली उत्पादने उद्योग
- फळभाजी प्रक्रिया
- सोयबीन प्रकिया
- ज्वारी प्रक्रिया
- तेलबिया प्रक्रिया
- चिक्की-आंबावडी उत्पादन
- बटाटे प्रक्रिया
- मधउत्पादन
- कुक्कुटपालन, वराह पालन, आळंबी उत्पादन इ
- शेणखत/गांडूळखत निर्मिती उद्योग
- मुरघास निर्मित प्रकल्प
- नर्सरी : भाजीपाला रोपे, फळझाडांची रोपे
- कृषीअवजारे निर्मिती
- महिला बचतगटाची उत्पादने - वाळवण, लोणचे वगैरे
जर तुमच्या या जोडधंद्याला प्रसिद्धी ची गरज असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा. आम्ही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रसिद्धी देवू.
- आमच्या नियमित प्रसारित होणाऱ्या यादीत आपल्या उद्योगाची माहिती विनामुल्य सामील करून घेतली जाईल
- आपल्या उद्योगावर आधारित ब्लॉग आमच्या वेबसाईटवर विनामुल्य प्रसारित करण्यात येतील
- आपल्या ब्लॉगला फेसबुकपेज, व्हाटसएप व टेलेग्राम च्या माध्यमातून विनामुल्य प्रसारित करण्यात येईल
- आपली खर्च करायची इच्छा असेल तर आपल्या बजेट नुसार आपले ब्राडींग व पेड प्रमोशन करण्यात येईल
या प्रक्रियेत लागणारे फोटो, ग्राफिक, लेखन आपणास स्व:खर्चाने करायचे आहे. आपण हि सामुग्री आमच्याकडे दाखल केल्यावर ब्राडींग व पेडप्रमोशन (ऐच्छिक) शिवाय इतर कोणताही खर्च आपणा कडून आम्ही घेणार नाही.
उत्तम संकल्पना