प्रत्येक भारतीयाने वाचावे असे पुस्तक - अनर्थ

प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक का वाचावे असे मला वाटते?
भारत म्हणजे काही त्याच्या चातुर्सिमा नाहीत. ती एक भौतिक बाब आहे. भारत म्हणजे त्यातली सर्वी माणसे, त्यांचे आरोग्य, शिक्षण, ज्ञान, आनंद, उत्साह, सलोखा, ऐक्य, समता. हा समाज म्हणजे भारत.
 
भारत स्वतंत्र झाल्या नंतर आजपर्यंत चातुर्सिमा ठीक आहेत पण आतला भाग, गाभा,  खराब होतो आहे. आरोग्य, शिक्षण, ज्ञान, आनंद, उत्साह, सलोखा, ऐक्य, समता लयाला जात आहेत. लोकशाही असूनही असे का व्हावे?
कुणीतरी चांगला वक्ता उभा रहातो, गोड गोड बोलतो, आम जनतेची दिशाभूल करतो आणि सत्ता काबीज करतो. सत्तेच्या जोरावर समाजातील एका गटाला फायदा करून देतो. 
अनर्थ या पुस्तकात लेखकाने अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी करून जी माहिती पुरवली आहे त्या माहितीला ग्रहण व आत्मसात केले तर हे फालतू वक्ते त्यांच्या भाषणातून आपल्यावर काहीहि खास प्रभाव टाकू शकणार नाही. तुमची मते आपल्या कडे वळवू शकणार नाही. 
आपण खरा नेता निवडू शकाल व लोकशाहीचा फायदा मिळवू शकाल. 
 
इथे युट्युब व्हिडीओ ची लिंक देत आहे त्यातून लेखक स्वत: आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. पुस्तक खरेदीची लिंकहि देत आहे, आपण पुस्तक खरेदी देखील करू शकता.