एप्पल बोर आणि बरच काही!

आंबट फळे सोडून फक्त गोडच फळे प्रभू श्रीरामाला द्यावी या लोभस विचाराने शबरीने चक्क उष्टी बोर श्रीरामास दिलीत. मातृसम प्रेम "वेड" असत हा विचार करून श्री रामाने देखील या फळांचा स्विकार केला व "राजाच व प्रजेच" हे नातं अजरामर झालं. त्या सोबत अजरामर झालीत "बोरं".

बोर हे फळ लोकांच्या इतके आवडीचे आहे कि त्यावर चारोळ्या देखील आहेत. चिडवाचिडवी करायला हि चारोळी मस्त आहे..

"थंडी वाटते, दाढी कापते, राजा ची राणी मला बोरं मागते"   

माझी आजी आम्हाला अशा गमती ऐकवत असे. बोर सुकवून - साठवून ठेवायचा उद्योगही तीच करायची. तिच्या हातच बोरवण, बोरकूट हे पदार्थ म्हणजे "पर्वणी" होती. सुपरमार्ट मध्ये बोरकूट दिसले कि आजीची आठवण येतेच व डोळे पाणावतात. बालपणाच्या गोष्टी आठवतात व मन रमून जातं.  

आम्ही लहान होतो तेव्हा बोरांची शेती वगैरे होत नसे. भोई रानातील बोर गोळा करून त्याची विक्री करीत असत. शाळेच्या रस्त्यावर मारोतीच्या पारावर भोयाचा एक पोरगा बोरं विकत असे. दहा पैशात खिसा भरून जायी! मी कधी कधी त्याच्याकडून पेन्सिल च्या बदल्यात बोर घ्यायचो. एकदिवस कुठूनतरी बाबांच्या कानावर हि गोष्ट पडली व त्यांनी मला चांगलेच चमकवले. पेन्सिली मिळण काही दिवस बंद झालं. मी रस्ता बदलवून टाकला. इकडची गोष्ट तिकडे करणारा "तो" हरामखोर कोण? हा प्रश्न आजही यक्ष बनून मनात उभा आहे. सापडला तर त्याला देईल म्हणतो - बोर!

औरंगाबादचे विणकर कापडासोबत जुनी नाणी व पेंटिंग देखील विकतात. एकात्मिक मार्केटिंग चा हा प्रकार शेतकरी देखील करू शकता. अनेक शेतकरी करतात त्याचे उदाहरण खाली देत आहे.

दोन वर्षापूर्वी "सौ.ला" औरंगाबादच्या वीणकराकडून कापडं हवी होती. माझी कार तेव्हा नवीनच होती, गाडी ने जायचा बेत आखला. माझी आई, सौची आई व सौ असे स्पोटक मिश्रण घेवून जळगाव हून सकाळी निघालो. मी तसा नवीनच गाडी चालवायला शिकलो होतो. अजिंठ्याच्या घाटातून गाडी काढत असतांना थोडे टेन्शन आले व मी उगाचच सौ. वर खेकसलो. एकूणच गाडीतल वातावरण एकदम "टाईट" झालं. "तुम्ही परत चला" - वगैरे! या विस्तवावर आता पाणी कसं टाकायचं "हा विचार" करत मी शांत पणे गाडी चालवत राहिलो. पुढे मला अचानक रस्त्याच्या बाजूला काहीतरी विक्रीला आहे असे दिसले. थोड्या थोड्या अंतरावर लोकं बसलेली होती. ते एप्पल बोर विकत होते. मी गाडी थांबवली, दरवाजा उघडला. एका मिनटात वातावरण निवळल.

सर्वांनी गाडी खाली उतरून बोर घेतली. बुआ लय बोलके होते. त्यांनी ताजी रसाळ बोर दिलीत. आमचे शेत पहा, म्हटले. शेत एकदम छान होते, स्वच्छ. झाडांवर बोर लगडलेली होती. छोटी झोपडीवजा बैठक होती. तीनचार रांजण भरलेली होती. शेताच्या पलीकडील बाजूला राहोट्या होत्या.

बाबांना विचारले असता त्यांनी सांगितले कि या राहोट्या त्यांनी एका हॉटेलवाल्याला भाड्याने दिल्या आहेत. हॉटेल चे विदेशी पाहुणे अधून मधून राहोट्यात रहाण्यास येत असतात. पुढे जायचे असल्याने आम्ही अधिक खोलात चौकशी केली नाही. इथे थांबल्याने व इथल्या प्रशस्त वातावरणा मुळे सगळ्यांचा मूढ एकदम बदलला. पुढचा रस्ता सहज पार झाला! सायंकाळी येतांना थोडा वेळ झाला होता, माणसे उठून गेली होती. त्यामुळे बोरं  मिळाली नाहीत पण आठवण मनात पक्की राहिली!

 प्रत्येकाच्या मनात बोरांच्या बाबतीत असा एकतरी किस्सा असतोच. आहे ना?

एक शेतकरी म्हणून बोर हे पिक अतिशय उत्तम आहे. एप्पल बोर, शाम बोर, मेहरूणचे बोर, गावठी बोर असे कितीतरी प्रकार आहेत. ताजी फळे हातोहात विक्री होतातच. थोड पॅकिंग केलं तर शहरी बाजारपेठ देखील सहज मिळवता येते. जास्त झालेली फळ सुकवून देखील विक्री होतात. बोरकूट देखील बनवता येते. हे बोरकूट व्यापारी घेतात किंवा छोटे पॅकिंग करून देखील विक्री केले जावू शकतात. महिला बचत गटाच्या उद्योजिका असे पदार्थ खरेदी-विक्री करतात. मागील वर्षी एका प्रदर्शनात एका स्टोलवर बोराची जाम-जेली विक्रीसाठी होती. पॅकिंग आकर्षक होते त्यामुळे दीडशे रुपयाला २०० ग्राम ची बरणी हतोहात विक्री चालली होती.

जर तुम्ही बोरांची शेती करायचे प्लानिंग करीत असाल तर इथे क्लिक करा!

एप्पल बोरात फळमाशी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. सहजनजरेत न पडणारी हि माशी फळाच्या आत अंडी देते. त्यातून निघणारी अळी फळ आतून फस्त करते. त्यात बुरशीचा संसर्ग होतो व फळ सडते. फळमाशीच्या नियंत्रणासाठी आपण "मक्षिकारी" कामगंध सापळे वापरावेत.

विशेष डिस्काउंट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

 एप्पल बोर मध्ये पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून धमाल उत्पादन घेणे शक्य आहे. फेसबुक व्हायरल होणारी हि पोष्ट बघा...

एप्पल बोर मध्ये पाटील बायोटेक तंत्रज्ञान मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.