तुम्हाला सवय आहे कि व्यसन?

तुम्हाला सवय आहे कि व्यसन?

मित्रहो सर्वसाधारणपणे व्यसन व सवय या दोन गोष्टीत आपली मोठी गल्लत होते. कधीकधी सवय व व्यसन यातील अंतर माहित नसल्याने सवयींचे रुपांतर व्यसनात होते. तुम्हाला एखादी वाईट सवय असेल तर, स्वकीयांच्या मदतीने किंवा स्वत:च्या जिद्दीने तुम्ही  ती सवय नक्की सोडू शकता. पण जर तुम्हाला व्यसन जडले असेल तर ते सोडवण्यासाठी प्रस्थापित मनोविकारतज्ज्ञाच्या मदतीची गरज असते. तुम्हाला व्यसन आहे कि सवय हे शोधून काढण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्या. जर यातील तीन पर्याय तुम्हाला लागू होत असतील तर लवकरात लवकर मानसोप्चार तज्ञाकडे धाव घ्या.

 • तुमची हि सवय टाकून द्यायचा तुम्ही  प्रयत्न केला कि तुम्हाला त्रास होतो जसे कामात मन न लागणे, संताप होणे, नैराश्य येणे, झोप न येणे.
 • हि सवय थांबवल्यावर पूर्वी ज्या गोष्टी तुम्हाला आवडायच्या त्या आता आवडत नाहीत.
 • सवयीचा पुन्हा अवलंब केल्यास तेव्हडा वेळ तुम्हाला बरे वाटू लागते
 • तुमच्या या सवयीशी निगडीत वस्तूंचा तुम्ही आपत्तीकालीन साठा बनवून ठेवतात. जसे घरातील कानाकोपऱ्यात दारूच्या बाटल्या, तंम्बाखु च्या पुड्या लपवून ठेवणे. साठा नसल्यास असुरक्षित वाटते
 • या सवयी मुळे तुमची दिनचर्या बाडगळते
 • या सवयीवर झालेल्या खर्चामुळे तुमची आर्थिक बाजू कमजोर झाली आहे
 • या सवयीवर तुमचे नियंत्रण रहात नाही. जसे दोन पेग प्यायला बसतात व पूर्ण बाटली संपल्यावरच उठतात
 • या सवयी मुळे तुम्हाला शारीरिक व्याधी जडली आहे जसे बिडी मुळे खोकला
 • या सवयी साठी तुम्ही धोका पत्करतात जसे दारू पिण्यासाठी चोर किंवा नालायक लोकांच्या संगतीत बसणे
 • तुमची हि सवय म्हणजे ताणतणाव व मानसिक दुखः हलके करण्याची तुमची पद्धत आहे. जशे शेतीती झालेल्या नुकसानाला कंटाळून तुम्ही गांजाचा नशा करतात
 • तुमची या सवयी संबंधीचीवर्तणूक तुम्ही इतरापासून लपवून ठेवतात जशे कामाच्या नावाने बाहेर जावून वेश्यागमन करणे
 • या सवयीमुळे तुमचे नाते सबंध दुखावले आहेत. समजा तुम्ही एकाच घरात राहून वडिलांसोबत मुलांच्या भविष्याबद्दल बोलू शकत नाही.

मित्रहो, जीवनात येणाऱ्या चढउतारात कधी सवयीचे व्यसन होते ते समजत नाही. एखादे व्यसन लागले म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहात असे नाही. मनात असा कुठलाही न्युनगंड बाळगू नका. आजच स्वत:ला सावरायला सुरवात करा. स्वत:ला थोडा वेळ द्या. हजारोच्या संख्येने लोक व्यसनातून मुक्ती मिळवून सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. चला लागा कामाला!

Back to blog