पिकाचे संतुलित पोषण म्हणजे काय?

पिकाचे संतुलित पोषण म्हणजे काय?

पिकाचे संतुलित पोषण करावे असे तज्ञ मंडळी नियमितपणे सांगत असतात पण याचा नेमका अर्थ काय? हे शेतकरी बांधवांना ठावूक नसते. अशा अवस्थेत ते जो जे सांगेल ते व म्हणेल त्या प्रमाणात पिकास देत सुटतात. यामुळे खर्च तर वाढतोच परिणाम देखील चांगले मिळत नाही. आपल्या देशात तज्ञांची देखील काही कमी नाही! कुणी सांगते शेतात यज्ञ करा, कुणी म्हणते फक्त शेणखत वापरा! खता ऐवजी मीठ टाकायला सांगणारे देखील आहेत. अशा अर्धवट तज्ञापासून आपण सावध असायला हवे. खर्चच करायचा नाही, शेती नैसर्गिक पद्धतीने करायची असे सांगणारे हेकेखोर देखील आहेत. मित्रहो, शांत तळ्यात उचलून एक दगड टाकावा इतक्या साध्या प्रक्रियेलादेखील कृत्रिम मानले जाते तर मग शेती "नैसर्गिक" कशी असू शकते? शेती नैसर्गिक पद्धतीने करा हे सांगणाऱ्या व्यक्ती मोबदल्यात काय मिळवतात, त्यांचा छुपा अजेंडा काय असतो? याबाबत विचार करा. शेती करतांना खर्च करावाच लागेल आणि कुठलाही खर्च हा काटेकोर पद्धतीनेच करायचा असतो हे लक्षात असू द्या.

असो. समजा भात आवडतो म्हणून जेवणात तुम्हाला फक्त फक्त भातच दिला. जेवणातील इतर घटक जसे वरण, पोळी, भाजी, लोणचे, पापड, चटणी, ताक दिलेच नाही तर तुम्हाला जेवण जाईल का? व जरी तुम्ही फक्त भातच खात राहिलात तर तुमचे पोषण होईल का? तब्येत चांगली राहील का? मित्रहो पिकाच्या संतुलित पोषणाचा अर्थ नेमका असाच आहे. पिकास प्रमाणापेक्षा जास्त नत्र दिले तर रससोषक किडी वाढीस लागतात, यातून विषाणू पसरू लागतो. पिकाची रोगप्रतिकार क्षमता खालावते व ते बुरशीजन्य व जीवाणू जन्य रोगाला बळी पडते. म्हणून बेसल डोस मध्ये नत्राची पूर्ण मात्रा टाकू नये असे साधे सोपे नियम आपल्याला पाळावे लागतील.

पिकवाढीच्या अवस्थे नुसार खतात योग्य बदल करणे आवश्यक आहे. तसेच सर्व खते फक्त मुळांच्या माध्यमातून न देता काही खते फवारणीतून द्यायला हवीत. खासकरून जर शेतात वाफसा नसेल किंवा पिकाची उत्पादकता सामान्य दर्जाच्या वरची असेल तर फवारणीतून खते द्यावेच लागतील!  

कोणतेही पिक घेण्यापूर्वी आपण त्याचा थोडा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपण निवडलेल्या पिकाचे बियाणे देशी आहे कि विकसित वाण? कि आपण हायब्रीड बियाणे वापरणार आहात? आपण पिकातील कोणता भाग विक्री करणार आहात? पिक किती काळ शेतात उभे राहील? पाण्याचे व्यवस्थापन कसे असणार आहे? मृदेची ठेवण व पोषण अवस्था काय आहे? वातावरण कसे असणार आहे (थंड, गरम, दमट, मिश्र कि कसे)? या बाबींचा अभ्यास केल्यावर आपण खते कोणती व कशी द्यावीत हे ठरवता येते. हे लक्षात असू द्या कि आपणास तीन प्रार्थमिक पोषक तत्व (नत्र, स्पुरद व  पालाश), तीन दुय्यम पोषक तत्व (कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक/सल्फर) व सहा सूक्ष्म पोषक तत्व (लोह, जस्तन/झिंक, मंगल/मेंग्नीज, तांबे, बोरान व मोलाब्द) पिकास योग्य प्रमाणात उपलब्ध करून द्यायची आहेत. 

मृदेत सेंद्रिय कर्ब योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. हे सेंद्रिय कर्ब एका प्रकारे मध्यस्तीची भूमिका बजावते. मृदेतील अजैविक मूलद्रव्य शोषून त्याला जैविक स्वरुपात आणायचे काम सूक्ष्मजीव करत असतात. या सूक्ष्मजीवांना सेंद्रिय कर्बाची आवश्यकता असते. त्यामुळे मृदेत खास करून मुळांच्या भोवती सेंद्रिय कर्ब असणे आवश्यक आहे. एक टक्क्यापेक्षा कमी सेंद्रिय कर्ब असेल तर पिक पोषणात अडचण निर्माण होते त्यामुळे मृदेची तयारी करते वेळी त्यात पूर्णपणे कुजलेले शेणखत व नत्र-स्पुरद-पालाश याचा बेसल डोस  (शिफारसी नुसार) टाकणे आवश्यक आहे. त्यासोबत करंज/निंबोळी पेंड (उपलब्धते नुसार)  व मायक्रोडील ग्रेड १ (एकरी १० किलो) टाकावे. शेणखत पुरेसे नसेल तर ह्युमॉल गोल्ड एकरी १ ते २ किलो द्यायला विसरू नका. 

मायक्रोडील ग्रेड १ हे सूक्ष्मअन्नद्रव्य मिश्रण असून शासनाच्या निर्देशां नुसार तयार केले जाते. झिंक, लोह, मंगल, तांबे व बोरान हि पाच सूक्ष्मअन्न द्रव्ये योग्य प्रमाणात (संतुलित) मिसळलेली आहेत.

अनेकदा सुरवातीचे डोस देवून झाल्यावर आता माझ्या पिकाला काही खते द्यायची गरज नाही असे शेतकऱ्यास वाटते. अश्या वेळी आपण पिकाच्या वाढीकडे निट लक्ष द्यावे व त्याच्या गरजे नुसार प्रार्थमिक पोषक तत्वांची डोसेस द्यावीत. जर आपण बेसल डोसेस दिलेलेच नसतील तर आता प्रार्थमिक पोषक तत्व द्यावेच लागतील. यासाठी आपण अमृत गोल्ड एन पी के (१०० % विद्र्याव्य) खते द्यावीत. गरजे नुसार आपण १९-१९-१९, १३-४०-१३, १२-६१-००, ००-५२-३४,  १३-००-४५, ००-००-२३, ००-००-५० या सात ग्रेड पैकी ग्रेड निवडू शकता. पिकाच्या गरजेनुसार व व्यवस्थापना नुसार हि खते ठिबक द्वारे किंवा फवारणी तून देता येतात. हि खते शासनाच्या नियंत्रण कक्षेतील आहेत त्यामुळे विश्वसनीय व दर्जेदार देखील आहेत. 

दुय्यम खते याचा अर्थ अनेक शेतकरी बांधव चुकीचा लवतात. दुय्यम म्हणजे कमी महत्वाचे - नाही वापरले तरी हरकत नाही अस त्यांचा समज असतो. हा गैरसमज एक मोठे दुर्दैव आहे.  कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक/सल्फर हि तीन मूलद्रव्ये अतिशय आवश्यक असून पिक वाढीच्या काळात त्यांच्या कमरतेमुळे उत्पादनाचा दर्जा व प्रमाण घसरते. तेव्हा हि खते द्यायलाच हवीत हे प्रत्येक शेतकरी बांधवाने लक्षात घ्यावे. 

कॅल्शियमच्या पूर्तते साठी कॅलनेट वापरावे.  कॅलनेट पाण्यात पूर्णपणे विरघळणारे "कॅल्शिअम" नायट्रेट आहे. वनस्पतीमध्ये कॅल्शिअम वहन करयाची व्यवस्था खूप चांगली नसते त्यामुळे कॅल्शिअम नायट्रेट वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. नत्रामुळे कॅल्शिअम च्या वहनाला मदत होते व ते लगेच लागू होते. कॅलनेट सल्फेट फ्री असून त्यात नत्राचे दोन स्वरूप आहेत, एमिनो व नायट्रेट.  कैल्शीअम मुळे उत्पादनाचा दर्जा व टिकावूपणा (शेल्फलाईफ) वाढतो. 

कॅलनेट १० व २५ किलोत उपलब्ध असून आपण ते खरेदी करू शकता. 

गंधक या खताचे अनन्यसाधारण महत्व आहे. हे एक नैसर्गिक मूलद्रव्य असून त्यापासून खत बनवण्यासाठी त्यावर काही प्रक्रिया केल्या जातात. या प्रक्रियांतील "सुपर मायक्रोनायझेशन" हि प्रक्रिया सर्वात आधुनिक आहे. साधे गंधक लागू होण्यासाठी जेव्हा काही वर्ष लागू शकतात तेव्हा हे सुपर मायक्रोनाइझ केलेलं गंधक फक्त २४ तासात कार्य सुरु करते.

या उत्पनाचे व्यापारी नाव रीलीजर + आहे. ते पाण्यात लगेच मिसळते. हे एक खत तर आहेच शिवाय एक प्रभावशाली स्पर्षीय बुरशी व लाल कोळीनाशक देखील आहे. मातीत मिसळल्यावर काही तासातच याचे सल्फेट मध्ये रूपांतर होते त्यामुळे सामू संतुलनात याचे विशेष महत्व आहे. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत सल्फर ची  महत्वपूर्ण भुमिक असून प्रथिन, एन्झाईम निर्मिती व व्हिटेमीन च्या निर्मितीत देखील महत्व आहे. द्विदलवर्गीय पिकात नत्राच्या गाठी तयार करण्यासाठी याचे महत्व असल्याने सल्फर च्या माध्यमातून नत्र देखील वाढते. 

ह्युमॅग पाण्यात पूर्ण पणे विरघळणारे मॅग्नेशिअम सल्फेट आहे. चिकणमातीत मॅग्नेशिअमचे प्रमाण वालुकामय मातीपेक्षा अधिक असते. ज्या प्रकारच्या खनिजापासून जमिनीची निर्मिती झाली त्यावरून एकूण मॅग्नेशिअमचे प्रमाण अवलंबून असते. वनस्पतीच्या पानात व बियात भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम आढळतो. त्या खालोखाल झाडांच्या देठात. क्लोरोफिलच्या प्रत्येक रेणूत मॅग्नेशिअमचा अणु असतो. मॅग्नेशिअमच्या पुरवठ्यामुळे चय-अपचय प्रक्रियेतील विकर पूर्ण क्षमतेने कार्यरत रहातात. प्रकाशसंश्लेषण, नत्र स्थिरीकरण अश्या अत्यावश्यक जैविक प्रक्रिया सुरळीतपणे चालतात त्यामुळे पिकाची वाढ योग्य वेगाने होते. कापसात लाल्या होतो तेव्हा आपण हेच खत देत असतो.  

सूक्ष्मअन्नद्रव्य फार कमी प्रमाणत लागत असली तरी ती अत्यावश्यक असतात. मृदेची तयारी करते वेळी वर सांगितलेले मायक्रोडील ग्रेड १ दिले नसेल तर ते ड्रीप फर्टिलायझर स्वरुपात "मायक्रोडील डीएफ" या नावाने उपलब्ध आहे, ठिबकने एकरी दोन किलोचा डोस आहे. 

त्याव्यतिरीक्त मृदेचा सामू व मुळांवरील ताण या गोष्टी ध्यानात घेवून सूक्ष्मअन्नद्रव्ये पानांद्वारे दिले जावू शकते. मायक्रोडील ग्रेड २ लिक्विड १ मिली प्रती लिटर किंवा चिलेटेड मायक्रोडील-सुपरमिक्स अर्धा ग्राम प्रती लिटर या दराने द्यावे. याचा फायदा असा होतो कि "कोडीफीशीअन्सी" होत नाहीत. 

"कोडीफीशीअन्सी" म्हणजे काय?  जेव्हा पिकास एका तत्वाची कमतरता होते तेव्हा ते इतर तत्व मिळवण्यात अपयशी ठरते. एका मागून एक अश्या अनेक तत्वांची कमतरता निर्माण होते. याला पर्याय हाच असतो कि अनेक घटकांचे एक संतुलित मिश्रण पिकाला उपलब्ध करून द्यायचे. आपण पिकास जेव्हा जेव्हा मायक्रोडील श्रेणीतील खते द्याल तेव्हा तेव्हा त्याला हा फायदा नक्की होईल.

कधी कधी सर्व काही व्यवस्थित करून देखील अश्या काही परिस्थिती निर्माण होतात कि पिकास लोह, झिंक व बोरान यांची नेमक्या वेळी कमतरता होते. चुनखळीची मृदा असेल तर हिरव्या गर्द पिकात पिंगट चट्टे पडतात, हि लोहाची कमतरता दूर करण्यासाठी मायक्रोडील एफ इ १२ ची अर्धा ग्राम प्रती लिटर या दराने फवारणी करावी. ढगाळ वातावरण असेल तर पिक फिक्कट हिरवे दिसू लागते अश्या वेळी झिंकची कमतरता दूर करण्यासाठी मायक्रोडील झेडएन १२ ची अर्धा ग्राम प्रती लिटर या दराने फवारणी करावी. धान्याचे दाणे पोचे रहाणे, फळांचे तडकणे अशी लक्षणे दिसली कि मायक्रोडील बोरान २० ची एक ग्राम प्रती लिटर दराने फवारणी करावी.

  

विविध  पिकांसाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

मित्रहो हि माहिती आपणास कशी वाटली? आवडली असेल तर नक्की शेअर करा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हि माहिती नक्की पोहोचवा. काही प्रश्न/सूचना असेल तर कॉमेंट मध्ये नक्की लिहा.

Back to blog