खादाड केळीत दिसून येणारी अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे व त्यावरील उपाय

खादाड केळीत दिसून येणारी अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे व त्यावरील उपाय

केळी हे अतिशय खादाड पिक आहे. या पिकाला खताचे व पाण्याचे असंतुलन सहन करावे लागले तर उत्पन्नात घट येते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी याच्या पानावर दिसणाऱ्या अन्नद्रव्य कमतरतेकडे करडी नजर ठेवून योग्य वेळी व्यवस्थापनात बदल करायला हवे. लक्षणांचे विश्लेषण नीट झाले नाही तर आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी असे होऊन नुकसान वाढू शकते. इथे या विषयावर माहिती घेवू.

------------------

फेसबुक, व्हाटसएप व टेलेग्राम वरीलआमच्या सोशल गृप्सला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा आणि वेळो वेळी प्रसारित होणारे लेख नियमित मिळवा.

------------------नत्राची कमतरता: इतर पिका प्रमाणे केळीमध्ये नत्राच्या कमतरतेत पाने सुरवातीला फिक्कट हिरवी व नंतर पिवळी पडतात. दुर्लक्ष झाल्यास पाने करपतात व मरतात. खोडाची वाढ खुंटते व ते खुजे रहाते. गंधक व लोहाच्या कमतरतेमध्ये देखील पिंगट पणा येतो पण नत्रात दिसणाऱ्या लक्षणात थोडा फरक असा आहे कि नत्र कमतरतेची लक्षणे सुरवातीला जुन्या पानावर दिसतात तर गंधक व लोहाच्या कमतरतेची लक्षणे सुरवातीला नव्या पानांवर दिसतात शिवाय मध्य शिरा हिरवीच रहाते.

केळी उत्पादकता या विषयावर पीडीएफ फाईल डाउनलोडकरण्यासाठी इथे क्लिक करा


वाढीच्या विविध अवस्थेत नत्र महत्वाची भूमिका बजावते. वाढ, उत्पादन व दर्जा यासाठी नत्र महत्वाचे आहे. नत्राचे संतुलन साधले तर घडाचे वजन, फण्याची संख्या यात वाढ होते शिवाय फळाचे घनत्व, शर्करेचे प्रमाण व टीएसएस/आम्ल गुणोत्तर यात वृद्धी होऊन फळाचा दर्जा चांगला येतो.

मृदेचा असंतुलित सामू, वालुकामय किंवा हलकी मृदा, सेंद्रिय कर्बाची कमतरता, जलअसंतुलन, अतिजलद वाढणारे वाण, अर्धवट कुजलेले काडी-कचरा खत यामुळे नत्राची कमतरता वाढू शकते.

नत्राची कमतरता दिसून आल्यास सर्वप्रथम व्यवस्थापनातील चुका व वातावरणातील ताण यांचा अंदाज घेवून योग्य तो बदल साधने गरजेचे आहे. त्यासाठी आपण तज्ञांशी चर्चा करावी. खाली पाटील बायोटेक तंत्रज्ञानाची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून फोर्म भरावा. आमचे तज्ञ आपणास संपर्क साधून योग्य सल्ला देतील.

स्पुरद कमतरता: वनस्पतीची जनुके, स्निग्ध, उर्जेचा साठा, उर्जेचे वहन यात स्पुरद हा घटक महत्वाचा आहे. स्पुरदाची कमतरता झाल्यास मुळांच्या वाढीचा वेग मदवतो. फुलधारणा व फळांची फुगवणी यात घट येते. अति आम्ल किंवा विम्ल मृदा, सेंद्रिय कर्बाची कमतरता, थंडी व ओलावा, लोहाचे वाढीव प्रमाण यामुळे स्पुरदाची कमतरता वाढीस लागू शकते. कमतरतेची लक्षणे सर्वप्रथम जुन्या पानावर दिसायला सुरवात होते. पाने गडद निळसर हिरवी होतात त्यात पिवळे व करपलेले चट्टे पडतात. हे चट्टे नंतर एकत्र येतात व पूर्ण करपून तपकिरी दिसायला लागतात. खोड बारीक व कडक होते. पानांचे देठ सहज मुडतात. 

कमतरता भरून काढण्यासाठी अमृत गोल्ड ००-५२-३४ चा वापर करावा. शेत तयार करते वेळी ह्युमोल होर्टीकल्चर स्पेशल वापरल्याने सेंद्रिय कर्ब संतुलन साधले जाईल.

पोटाशची कमतरता: श्वसन, प्रकाश संश्लेषण, जल नियमनात, शर्करेचे वहन व साठवण यामध्ये पोटाश महत्वाची भूमिका बजावते. पोटाशमुळे खोडाची उंची, जाडी व पर्ण सांबार वाढतो. फळाचा गर, फळाची साईज सुधारते. एकूण उत्पन्न व फळाचा दर्जा चांगला येतो.

याच्या कमतरतेची लक्षणे जुन्या पानांवर प्रथम दिसून येतात. पानाच्या टोकाकडील भागात सुरवात होते. शिरांमधील भाग पिवळा पडायला सुरवात होते. चट्टे एकमेकात मिसळतात, रंग तपकिरी होतो व पान मरते. देठाकडील भाग जास्त काळ हिरवा रहातो. लक्षणे कडेवर दिसत असल्यास, जळका भाग व हिरवा भाग यात एक गर्द पिवळी जोड स्पष्ट दिसते.

स्पुरद कमतरतेमध्ये देखील समान लक्षणे दिसतात पण सुरवात पानाचा कडे कडून होते. 

मॅगनीज कमतरते मध्ये अशी लक्षणे नव्या पानात प्रथम दिसून येतात व परिणाम फक्त टोकावर न होता संपूर्ण पानावर होतो.

अति आम्ल मृदा, वालुकामय हलकी मृदा, अवर्षण, अति पाण्यामुळे अन्न द्व्य्व वाहून गेल्याने, मृदेत पालाश ची कमतरता, मृदेतील जास्तीचा मॅग्नेशियम यामुळे पोटाशची कमतरता वाढीस लागते.

पाटील बायोटेकची अमृत गोल्ड ००-००-५० व ००-००-२३ हि खते वापरल्याने कमतरता भरून निघेल.

मॅग्नेशियमची कमतरता: लक्षणे पहिले जुन्या पानांवर दिसून येतात. काठ पिवळे पडतात, त्यात जळके ठिपके पडू लागतात. देठावर निळे-जांभळे चट्टे पडतात. मध्य शिरेभोवतीचा पट्टा हिरवाच रहातो.

वालुकामय मृदा, अम्ल्धार्मी मृदा, अति पालाश, ओलसर थंडी यामुळे हि कमतरता वाढते.

मॅग्नेशियम विकारां(एन्झाईम) सोबत काम करत असल्याने चयअपचय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतो. स्पुरद वहन करतो. कमतरतेमुळे घडाचे वजन व उत्पादकतेवर त्याचा सरळसरळ परिणाम होतो.

पाटील बायोटेक चे ह्युमॅग दिल्याने हि कमतरता भरून निघेल.

कॅल्शियमची कमतरता: कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाने टोकाकडून पिंगट पडतात व पाठोपाठ हलके तपकिरी होऊन करपतात. नवीन पानावर पहिले परिणाम जाणवतो. खालच्या पानांचा आकार वेडावाकडा होतो. पाने काठावर पाठ्तात व गुंढाळली जातात. बोरान च्या कमतरतेमध्येही यासारखी लक्षणे दिसतात पण त्यात पिंगटपणा पानाच्या काठाकडून येतो शिवाय पाने फाटत नाही.


कॅल्शियमच्या कमतरतेमुळे काही पानाची फक्त मध्य शिरा दिसते. पानाचे पटल विकसितच होत नाही. त्यामुळे पान तलवारीच्या पात्यासारखे दिसते. पोन्ग्यातून निघणारे पान अडकून पडते.

केळीचे साल तडकणे देखील कॅल्शियमच्या कमतरतेचेच लक्षण आहे.

आम्लधर्मी हलकी मृदा, मृदेतील अति सोडियम व अल्युमिनियम मुळे, दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणी वाढू शकतात. पाटील बायोटेकचे कॅलनेट वापरून कमतरता कमी करता येईल.

 

 

टिशू कल्चर रोपे बुकिंग करण्यासाठी कृपया इथे क्लिक करा.

 

गंधकाची कमतरता: गंधकाची कमतरता झाल्यास पाने पिंगट-हिरवी दिसतात. संपूर्ण पानावर परिणाम होतो. मध्यशिरा देखील हिरवी रहात नाही. नवीन पानावर अधिक परिणाम होतो ते लहान व फिक्कट रहातात. खोडाची वाढ थांबते.

आम्ल धर्मी हलकी मृदा, सेंद्रिय घटकाची कमतरता, पाणथळ यामुळे गंधकाची कमतरता वाढू शकते.

गंधक पाण्यात विरघळत नाही त्यामुळे साधी गंधक पावडर पाण्यात मिसळत नाही व शेतात नीट पसरत नाही. पाटील बायोटेकचे रीलीजर हे ९० टक्के गंधक आहे ते पाण्यात भिजले कि वेगाने पसरते. खूप बारीक केलेले असल्याने सहज पसरते व चार दिवसात लागू होते. गंधकाची कमतरता सहज भरून काढते. एकरी ३ किलोचा डोस आहे.

बोरानची कमतरता: बोरानची कमतरता सर्वात नव्या पानावर दिसते. काठाच्या कडेने पण पिंगट होते व आतल्या बजुला गुंढाळले जाते. पिंगट भाग करपून गडद तपकिरी होतो. जुन्या पानांवर खालच्या बाजूने शिरांच्या काटकोनात पांढरे चट्टे पडतात.

वालुकामय मृदा, विम्ल मृदा, मृदेतील सेंद्रिय घटकाची कमतरता, अतिप्रमाणातील नत्र किंवा कॅल्शीयम, पाण्याचा ताण यामुळे हि अवस्था बळावू शकते.

बोरान संतुलन साधल्याने फणीतील केळ्यांची संख्या वाढून वजन व उत्पादकता वाढते. इतर अन्नद्रव्यांचा अपटेक चांगला होतो. केळीतील एकूण विद्राव्य स्थायू घटक (गोडवा) वाढतो.

पाटील बायोटेक चे मायक्रोडील बोरान-२० पाण्यात पूर्णपणे विरघळते व याची फवारणी करून हि अडचण दूर केली जावू शकते.

लोहाची कमतरता: लोहाच्या कमतरतेमुळे पानांवर पिंगटपणा येतो. पान सुरवातीला पिंगट हिरवे व नंतर अगदी पिवळे दिसतात. शिरांमधील भाग देठाकडून पिवळा पडायला सुरवात होते व टोकाकडे वाढत जाते. मध्य शिरा हिरवी रहाते पण शेवटी तीही पिवळी होते. पाने करपत नाही हि बाब लक्षात घ्यावी.

विम्ल मृदा, पाणथळ मृदा, चूनखळी तसेच मृदेत गरजेपेक्षा जास्त तांबे, मेंग्नीज किंवा झिंक असल्यास लोहाची कमतरता बळावते.

मृदेची तयारी करतांना पाटील बायोटेक चे ह्युमोल गोल्ड, मायक्रोडील ग्रेड १ यांचा वापर करावा. बुरशीनाशकांसोबत मायक्रोडील सुपर मिक्स ची फवारणी करावी.

लक्षणे दिसू लागली असल्यास पाटील बायोटेक चे मायक्रोडील आयर्न-१२ पाण्यात पूर्णपणे विरघळते व याची फवारणी करून हि अडचण दूर करावी.

मॅगनीजची कमतरता: या घटकाची कमतरता झाल्यास सुरवातीला पाने फिकट हिरवे दिसतात नंतर पिंगट पणा दिसू लागतो व नंतर करपतात, काठ आतल्या बाजूला वळतात. हि लक्षणे टोकाकडून सुरु होतात.

मृदेची तयारी करतांना पाटील बायोटेक चे ह्युमोल गोल्ड, मायक्रोडील ग्रेड १ यांचा वापर करावा. लक्षणे दिसू लागल्यावर मायक्रोडील सुपर मिक्स ची फवारणी करावी.

झिंकची कमतरता: झिंकची कमतरता ओळखायला सोपी आहे. पानांवर मध्यशिरेच्या काटकोनात, दुय्यम शिरांच्या समांतर, लांब लांब हिरवे व पिवळे चट्टे पडतात. हे पानभर पसरतात. मध्यशिरा देखील हिरवी रहात नाही. पुढील टप्यात काठाकडून मध्य शिरेकडे लालसर डाग दिसतात. हि सर्व लक्षणे नवीन पानांवर दिसून येतात. नवीन येणारी पाने लहान असतात. दोन सांध्यातील अंतर कमी होते, पाने जवळ जवळ येतात त्यामुळे झाड गुच्छेदार दिसते.

विम्ल मृदा, मृदेत अतिरिक्त फोस्फेट किंवा त्याचा गरजेपेक्षा जास्त पुरवठा केल्याने झिंक ची कमतरता बळावू शकते.

मृदेची तयारी करतांना पाटील बायोटेक चे ह्युमोल गोल्ड, मायक्रोडील ग्रेड १ यांचा वापर करावा. बुरशीनाशका सोबत मायक्रोडील सुपर मिक्स ची फवारणी करावी.

कमतरतेची लक्षणे दिऊन आल्यावर पाटील बायोटेकचे मायक्रोडील झिंक-१२ पाण्यात पूर्णपणे विरघळते व याची फवारणी करून हि अडचण दूर केली जावू शकते.

संदर्भ:

एफएओ.ओआरजी

आपणास हि माहिती कशी वाटली? प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

शेअर नक्की करा

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

Back to blog