निर्यातक्षम केळी, उत्पादन एकरी ८ लाख, कालावधी १८-१९ महिने

अलीकडील काळात केळीची लागवड पसरली आहे. पूर्वी केळीचे उत्पादन मुख्यत: जळगाव जिल्ह्यात होत असे पण आता तसे राहिलेले नाही. राजस्थानात देखील केळीचे उत्पादन घेतले जाते. तंत्रज्ञानाची प्रगती, ज्ञानाचा प्रसार, शेतकरी बांधवांची जिद्द, स्रोतांचा पुरेपूर वापर याचाच हा परिपाक आहे. खाली दिलेल्या व्हिडीओत प्रतिक चंद्रकांत देसाई, पंढरपूर या बांधवाने एक एकर क्षेत्रात १२०० खोड लावलीत. काढणीनंतर खोडवा घेतला. १८-१९ महिन्याच्या या कालावधीत कमीत कमी ८ लाखाची कमाई त्यांनी केली असून प्रत्येक खोडामागे ६५० ते ७०० रु त्यांना मिळाले आहेत. व्हिडिओ पाहते वेळी आपण बघू शकता कि शेतात कोणतीही बांधणी केलेली नाही. खोडाचा घेर, फण्यांची संख्या, घडाचा आकार याचे नीट निरीक्षण करावे. प्रतिकभाईनी या यशाचे ९५ टक्के श्रेय पाटील बायोटेक तंत्रज्ञानाला दिले असले तरी त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास व जिद्दीने घेतलेली मेहनत हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे आमचे प्रतिनिधी श्री. संदीप जाधव (मो. 9423241403) यांना वाटते. 

नाव: प्रतिक चंद्रकांत देसाई, पंढरपूर
लागवड: २०१७ मध्ये १२०० खोड, क्षेत्र १ एकर
लागणीचे उत्पादन ४० टन
खोडव्यातील घडाचे वजन ४०-५० किलो, फण्या १८
एकूण कालावधी (मूळ लागवड व खोडवा): १८-१९ महिने
खोडव्याचे अपेक्षित उत्पादन: ४५ टनाच्या पुढे
बेसल डोस: जमिनीच्या मगदुरा नुसार विभागणी करून ३ डोस
अळवणी: ४-५ अमृत कीट
फवारणी: ५-६ फवारण्या
१लि फवारणी: १०० लिटर पाण्यात सुपरजिब १० मिली, अरेना ४२ ग्राम (७ वड्या)
२री फवारणी: १०० लिटर पाण्यात झकास ७५ मिली, अरेना ४२ ग्राम (७ वड्या)
३ री फवारणी: १०० लिटर पाण्यात सुपरजिब १० मिली, अरेना ४२ ग्राम (७ वड्या), झकास ७५ मिली
४थी फवारणी: १०० लिटर पाण्यात सुपरजिब १० मिली, फोलीबिओन १०० मिली
५ वी फवारणी: १०० लिटर पाण्यात सुपरजिब १० मिली

वैशिट्य: खंदणी व बांधणी केलेली नाही

एकूण उत्पादन ८० टन किंवा ८०,००० किलो.

एकूण मिळकत: १० रु किलोच्या दराने उत्पादन: ८ लाख
प्रत्येक खोडा मागे मिळकत: ६५०-७०० रु

केळी लागवड व प्रक्रिया उत्पादने यावरील निवडक पुस्तके आजच खरेदी करा

 

टिशू कल्चर रोपे बुकिंग करण्यासाठी कृपया इथे क्लिक करा.

 

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.