Click Here for Product Demand Form

वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग अकराव्वा )

मित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या नियोजनावर भर देत आहोत. सोबतच इतर काही बाबीं ज्या आपल्या यशावर परिणाम करतात त्यांच्या विषयी देखील जाणून घेत आहोत. (जर आपण या पूर्वीचे भाग वाचले नसतील तर नक्की वाचा. याच पानावर त्याच्या लिंक्स मिळतील) 

या भागात आपण सल्ला कुणाचा घ्यायचा हे कसे ठरवायचे हे बघू.

तज्ञांसमोर झुकु नका

सत्यनारायणाची कथा तुम्ही ऐकलेली असेल. (ऐकलेली नसेल तर ऐकू नका, तुम्ही नशीबवान आहात!) या कथेत जर तुम्ही सत्यनारायणाची पूजा केली नाही तर तुमची नाव बुडेल, तुमचे नुकसान होईल असे सुचवले जाते, अनेक उदाहरणे दिली जातात. असेच काहीतरी देशातील नेते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, उद्योजक, आर्थिक सल्लागार, सरकारी अधिकारी ई. लोकं आपल्याला सांगत असतात.

एकदा माझे हाताचे दुखणे डॉक्टरकडे घेवून गेलो. ते फार नामांकित आहेत. मला म्हणाले "तू नशीबवान आहेस, अजून जिवंत आहे! लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल." मी त्या सल्ल्याला कचऱ्याची टोपली दाखवली..या गोष्टीला आता दहा वर्ष झाली आहेत. अनेकवेळेला तथाकथित तज्ञांचा सल्ला आपण इतक्या अंधळ्याप्रमाणे मानतो, जणू काही देवाने आपल्याला कुठली बुद्धी दिलेलीच नाही. वरच्या कथेतील डॉक्टरचा सल्ला मी पाळला नाही कारण ते तथ्यांचा विपर्यास करीत होते. दुसऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधी घेतल्यावर हळूहळू माझे दुखणे कमी झाले व कालांतराने नाहीसे झाले. मी माझ्या दिनचर्येत व आहारात योग्य बदल केलेत, त्यातून हळूहळू होणाऱ्या बदलांची मी नोंद घेतली. एकूणच स्वत:च्या बुद्धीचा वापर केला.

शाळेत शामला गुरुजी शिकवत होते. "ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो" या विषयावर शिकवतांना "घरगुती गॅसच्या सिलेंडर" मध्ये ऑक्सिजन असतो असे गुरुजी म्हणाले. पुस्तकात असे लिहिलेलं नसतांना गुरुजी चुकीचे शिकवत आहेत असे शामला जाणवले. त्याने या विषयी वडलांना विचारले. "घरगुती गॅसच्या सिलेंडर" च्या सिलेंडर मध्ये ऑक्सिजन नसतो व जो वायू असतो तो अतिशय ज्वालाग्रही वायू असतो असे वडलांनी त्यास सांगितले. पुढे शामच्या वडलांनी मुख्याध्यापकास गाठून त्यांच्या कानावर हि गोष्ट घातली. मुख्याध्यापकाने कथित गुरुजींची पडताळणी केल्यावर "घरगुती गॅसच्या सिलेंडर मध्ये ऑक्सिजनच असतो" असे गुरूजींनी मुख्याध्यापकास ठासून सांगितले! तेव्हा गुरुजींचे ज्ञान अपूर्ण असल्याचे सिद्ध झाले. भारतीय संस्कृतीत गुरुचे फार महत्व आहे, असायलाही हवे. ज्ञानसागर अथांग असल्याने कधी कधी गुरुचे ज्ञान अपुरे असू शकते. शाम ने पडताळणी केली त्याप्रमाणे आपणही पडताळणी करायलाच हवी.

---------------------------------------------
---------------------------------------------
शेतकरी बांधवांनी वाचावी अशी निवडक पुस्तके. वरील फोटोवर क्लिक करून अधिक माहिती मिळवा.
----------------------------------------------

प्रा. शाम मानवांनी तथाकथित ज्ञानी लोकांचा भांडाफोड कसा करायचा याचे एक सुत्र सांगितले आहे. ज्ञानी लोकांना तुम्ही असे प्रश्न विचार ज्याचे खरे उत्तर तुम्हाला ठावूक आहे. जर या ज्ञानी माणसाने चुकीचे उत्तर दिले तर भांडाफोड होतो. भविष्य सांगण्यासाठी हजारो रुपयाची फी घेणाऱ्या व्यक्तीवर हा प्रयोग करण्यात आला. सुमारे १९९५ च्या काळात हि भविष्यकार व्यक्ती एखाद्याचा मासिक पगार असावा अशी फी घेत असे व भविष्य जाणून घेण्यासाठी चार चार तास रांगेत उभे राहावे लागे. एका शीख व्यक्तीने या भविष्यकारास माझे लग्न कधी होईल का? व मला मुलबाळ होईल कि नाही? असे प्रश्न विचारले. जेव्हा लवकरच लग्न होईल पण संतती व्हायची शक्यता नाही असे भविष्य त्यास सांगितले गेले तेव्हा त्या भविष्यकारचा भांडाफोड झाला कारण या शीख गृहस्थास दोन मुले होती!

एक शेतकरी म्हणून तुम्ही किती लोकांचा सल्ला घेतात? पाणी कुठे लागेल या प्रश्नापासून सुरुवात होते, काय पेरायचे? कुठे विकायचे? काय फवारायचे? अश्या प्रत्येक विषयात उलटसुलट सल्ले देणारे तज्ञ तुम्ही पहिलेच असतील. काहींवर तुमची श्रद्धा व विश्वास देखील असेल. जर तुम्ही पडताळणी करून बघितली तर एकतर तुमचा विश्वास पक्का तरी होईल किंवा नाहीसा तरी होईल. पडताळणीतून फायदा नक्की होईल.

लक्षात ठेवा पडताळणी केल्याशिवाय ठेवलेला विश्वास, मग तो छुमंतर करणारया बाबावर असो कि पांढरा कोट घालणारया व खूप शिकलेल्या डॉक्टर वर असो, अंधविश्वासच असतो.

तुम्हाला काय अनुभव आला आहे? तुम्ही कधी पडताळणी केली आहे का? काही किस्सा सांगू शकता का? प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका!

 

1 comment

  • Best

    Abhay Halde

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published