रानडुकराच्या जाचातून मुक्ती

रानडुकराच्या जाचातून मुक्ती

हजारो बागायतदार शेतकरी रानडुकरांच्या भितीने धास्तावलेले असतात. चांगल्या हाती येणाऱ्या पिकात रानडुकरे घुसली तर, मोठी हानी करतात. अनेक वेळेला अश्या उपद्रवी रानडुकरास मारायची सशर्त परवानगी वन विभागाकडून देण्यात येते. अनेक डूकरे मारली जातात व समस्येला तात्पुरता दिलासा मिळतो. अशा परवान्या मुळे पर्यावरण संतुलनाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यावरण प्रेमी अश्या परवान्यांच्या विरोधात उभे रहातात. काही ठिकाणी परवान्यांच्या बाबतीत राजकारण होते.  वाद निर्माण झाल्याने परवाने रद्द करण्यात येतात. रानडुकरांचा संतती निर्माण करण्याचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे अधूनमधून मिळणाऱ्या अशा शिकारी परवान्यांचे फायदे होत नसतात. रानडुकरांची संख्या लवकरच पूर्ववत होते.

रानडुक्कर चिवट प्राणी असातात.  त्यांना संपूर्ण शरीरात चरबी एकसमान पध्तीने साठवता येते. यामुळे अन्न उपलब्ध असले की ते वेगाने शारीरातील चरबी वाढवतात व या साठवलेल्या चरबीच्या जोरावर दुष्काळाचा सामना सहज करतात.  यांचे पाय मजबुत असल्याने ते दूरवर ची अंतरे सहज कापतात. रात्रीच्या अंधारात त्यांना दिसु शकते त्यामुळे ते दिवस रात्र प्रवास करू शकतात. त्यामुळे रातोरात नविन प्रदेशात शिरकाव करतात. ते रानातुन कधी बाहेर येतील व पिकात कधी नासधुस करतील, याचे अनुमान काढता येत नाही.

झटका मशीन एक महागडी संकल्पना असून त्याचा रखरखाव देखील खर्चिक असतो या मुळे ते निरुपयोगी ठरते. डांबर गोळ्या टांगणे, काचेच्या बाटल्या टांगणे, वाऱ्यावर वाजणारी थाळी लावणे असे पर्याय शेतकरी बांधव आळीपाळीने करीत असतात. रानडुक्कर हा तसा हुशार असल्याने तो अनुभवातून शिकतो व आपण निर्माण केलेल्या अडथळ्यांना सारून शेतात शिरतो व नासधूस करतो.

हि अडचण लक्षात ठेवून पाटील बायोटेक ने फार्मगार्ड हे उत्पादन बाजारात आणले आहे.  फार्मगार्ड मातीत किंवा वाळूत मिसळून बागेभोवती चार फुटाच्या पट्ट्यात पसरवले कि त्यातून निघणारा दर्प रानडुक्क, नीलगाय, हरीण अश्या प्राण्यांच्या मनात जंगली शिकाऱ्यांची भीती निर्माण करतो. व ते परिसरातून काढता पाय घेतात. गेल्या चार वर्षात अनेक शेतकरी बांधवांनी या उत्पादनाचा अनुभव घेतला असून त्यांच्या कडून पुनःपुन्हा मागणी होत असतते. दुर्दैवाने या उत्पादनाच्या उत्पादनात असलेल्या अपरिहार्य अडचणी मुळे खुल्या बाजारात हे उत्पादन विपुल प्रमाणात उपलब्ध करून देणे कठीण आहे. जर आपण या पूर्वी फार्मगार्डचा उपयोग केला नसेल तर एकदा अवश्य करा. उत्पादनाच्या उपलब्धतेसाठी जवळच्या कृषी केंद्रावर संपर्क साधा. या उत्पादनाच्या बाबतीत डुप्लिकेट ची देखील समस्या आहे, त्या मुळे आमच्या अधिकृत कृषीकेंद्रातूनच खरेदी करावी, हि विनंती.

अधिक माहितीसाठी संपर्क: ९९२३९७४२२२

 

Back to blog