मधुमेहाच्या राजधानीत कडू-कारल्याने दिली बळीराजाला मोठी संधी!

मधुमेहाच्या राजधानीत कडू-कारल्याने दिली बळीराजाला मोठी संधी!

भारत हि मधुमेहाची राजधानी मानली जाते. करोना दरम्यान मधुमेह असलेल्या व्यक्तींना जास्त अडचणींचा सामना करावा लागला. याच पार्श्वभूमीवर कारले या फळभाजीचे महत्व वाढले आहे. गोळ्या औषधी घेण्यापेक्षा आठवड्यातून दोन सांजेला कारल्याची भाजी खावी अस विचार जनमानसात रुजतो आहे. ताजी फळभाजी म्हणून कारल्याला शहरी मोठी बाजारपेठ आहेच. त्याव्यतिरीक्त आयुर्वेदीक कंपन्यात या फळाच्या विशीष्ट प्रजातींना विशेष मागणी आहे. या औषधी कंपन्या कारल्याचा मिक्स ज्यूस व कॅप्सूल बनवतात. नमकीन उत्पादक कंपन्या देखील कारल्या पासून उत्तम दर्जाचे चिप्स बनवतात. तब्येतीबाबत जागरूक असणारा शहरी ज्येष्ठ नागरिकांचा समूह कारल्याच्या चिप्सचा महत्वाचा ग्राहक वर्ग आहे. याच मुळे अनेक हुशार शेतकरी बांधव शेताच्या एका तुकड्यात, फेरपालट पद्धतीने पण सातत्याने कारल्याची शेती करतात. असे केल्याने ते हि फळभाजी वर्षभर बाजरात पुरवतात . 

कारल्यात आलेल्या नव नवीन प्रजातींची आता वर्षभर लागवड होऊ शकते. उत्तम मशागत, दर्जेदार सरी-वरंबा, मच्लिंग, ठिबक, तारबांधणी अश्या गुंतवणूकीची गरज या पिकाला असते. हि सुरवातीची गुंतवणूक उत्तम दर्ज्याची करायची असते. असे केल्यानंतर एकदा वेल स्थिरस्थावर झाले कि थोडक्या  आवर्ती खर्चाच्या मोबदल्यात भरगोस व नियमित पैसा मिळवला जावू शकतो. एकदा लागवड केल्यावर अनेक शेतकरी बांधव १५-१८ महिने हे वेळ जोपासतात.


निवडक प्रजातींची माहिती घेवू


पुसा दो मौसमी: हि जात आय ए आर आय, नवी दिल्ली यांनी विकसित केली असून उन्हाळा व पावसाळ्यासाठी हि व्हरायटी उपयुक आहे. फळे गर्द हिरवे, मध्यम लांबीची व जाड सर असतात. लागवडीनंतर दोन महिन्यात फळे निघायला सुरुवात होते. एका किलोत साधारण पणे ८-१० फळे बसतात.

कोइम्बतुर लोंग: नेशनल सिड कार्पोरेशन ने या प्रजातीचा विकास केला असून फळे लांब व नाजूक असतात. रंग भुरा असतो. पावसाळी वातारणात हि जात हेक्टरी २५-३० टन उत्पादन देते.

अर्का हरित: हि प्रजाती आय. आय. एच. आर. हेस्सारघट्टा या संस्थेने विकसित केले असून फळे आकर्षक चंबूच्या आकाराची, हिरवी असतात. हे पिक १०० ते ११० दिवसाचे असते व हेक्टरी उत्पादन १२ टन येते.

व्ही के प्रिया: हि व्हरायटी केरळा कृषीविद्यापीठाने विकसित केली असून, फळ ३५ ते ४० से. मी. इतके लांब असते. साठ दिवसात उत्पादन सुरु होते व प्रत्येक वेलीवर ५० फळे लागतात.

फुले प्रियांका: हि प्रजाती राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केली  असून फळ २५-३० से.मी. इतके लांब असते. हे वाण निर्यातीसाठी उत्कृष्ट मानले जाते. 

फुले उज्वला: हे वाण देखील राहुरी कृषी विद्यापीठानेच तयार केले असून फळ १८-२० से. मी. इतके लांब, गर्द हिरवे असते. सरासरी उत्पादन हेक्टरी ३०-३५ टन असून निर्यातीसाठी निवडले जाते.

प्राईड ऑफ गुजरात: फळे लहान, गोल, निमहिरवे असते. फळाचे वजन ८-१० ग्राम इतके कमी असते.

शेतकरी मित्रहो,  या पिकावर आम्ही या पूर्वी सविस्तर लेख प्रकाशित केले आहेत. खाली स्क्रोल करून आपण हे लेख वाचू शकतात. कडू कारल्यात उपलब्ध असलेल्या गोड संधीचा शेतकरी बांधवांनी अवश्य फायदा घ्यायला हवा.

या पिकाचे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने करायचे असल्याने यासाठी आपण श्री. अमोल पाटील यांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. लागवडीची पद्धत, पिक पोषणातील खाचा-खोचा, कीडनियंत्रणातील तारतम्य, उत्तम उतारा कसा घ्यावा? या विषयावर अमोलसर आपणास विभागनिहाय मार्गदर्शन करतील. स्क्रीनवर श्री. अमोल पाटील यांचे व्हाटसअप बटन तरंगतांना दसेल. त्यावर क्लिक करून संपर्क साधू शकता.

या माहिती संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण श्री. अमोल पाटील यांना व्हाटसअप वर प्रश्न विचारू शकता. त्याकरिता स्कीन वर दिसणाऱ्या बटनावर क्लिक करावे.
Back to blog