लावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका!

लावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका!

व्यापारी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठा चढ-उतार होत असतो. अशा आर्थिक परिस्थितीचा कौटुंबिक बजेटला धक्का लागू नये म्हणून अभ्यासू शेतकरी, शेतीच्या एका भागात वेलवर्गीय भाज्यांची शेती करतात. यात कारले व दोडके हि पिके अग्रणी आहेत कारण शहरी व स्थानिक बाजारात या फळभाज्यांना वर्षभर चांगली मागणी असते.  

हवामान: या दोन्‍ही पिकांची पावसाळी व उन्‍हाळी हंगामात लागवड करतात. कारल्‍यास उष्‍ण व दमट हवामान तर दोडक्‍यास समशितोष्‍ण व दमट हवामान मानवते. दोडका थोडीशी थंडी सहन करु शकतो, मात्र कारल्याच्या वेलीवर थंडीचा वाईट परिणाम होतो.

जमीन: भुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्‍यम जमन निवडावी, चोपण अथवा चिबड जमिनीत ही पिके घेऊ नयेत.

पूर्वमशागत व लागवड:

जमीनीची उभी आडवी नांगरट करून , काडी कचरा वेचून शेत स्‍वच्‍छ करावे. प्रति हेक्‍टरी 100 ते 150 क्विंटल चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोष्ट हुमणासूर मध्ये  मिसळून शेतात पसरवावे.  हुमणासूर हे उत्तम दर्जाचे मृदा सुधारक असून मातीतील उपयोगी सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतात तसेच हुमणी, सुतकृमी, वाळवी यांची संख्या कमी करतात.  कुळवणी करून खत जमिनीत चांगले मिसळावे. कारल्याची लागवडीसाठी दोन ओळीत 1.5 ते 2 मिटर व दोन वेलीत 60 सेमी अंतर ठेवावे. दोडक्‍यासाठी दोन ओळी 2.5 ते 3.5 मिटर वर दोन वेलीत 80 ते 120 सेमी अंतर ठेवावे. प्रत्‍येक ठिकाणी 2 ते 3 बिया लावाव्यात. दोन्‍ही पिकात बियांची टोकन ओलसर जमिनीत करावी. बिया वरंब्‍याच्‍या बगलेत टोकाव्‍या. उगवण होईपर्यंत बेताचे पाणी द्यावे.

हंगाम: कारल्याची लागवड उन्‍हाळी पिकासाठी जानेवारी-फेब्रूवारी- मार्च व खरीपाची लागवड जून-जूलै महिन्‍यात करावी. दोडका कमी दिवसात येणारा असल्‍यामुळे त्‍याची लागवड कारल्‍यापेक्षा 15 ते 20 दिवसांनी उशिरा केली तरी चालते.

बियाण्‍यांचे प्रमाण

कारल्‍यासाठी हेक्‍टरी 5 ते 6 किलो बियाणे लागते. बियाणे 25 ते 50 पी.पी.एम. सुपरजिब च्‍या द्रावणात बुडवून नंतर प्रतिकिलो बियाण्‍यास 3 ते 4 ग्रॅम कार्बोन्‍डॅझिम लावून नंतर लागवड करावी.

दोडक्‍यासाठी हेक्‍टरी 3 ते 4 किलो ग्रॅम बियाणे लागते.

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

कारले पिकासाठी प्रति हेक्‍टरी 20 किलो नत्र 30 किलो स्‍फूरद व 30 किलो पालाश लागणीच्‍या वेळी द्यावे व नत्राचा दुसरा हप्‍ता 20 किलो या प्रमाणाम फूले दिसायच्‍या वेळेस द्यावा. तसेच दोडका पिकासाठी प्रति हेक्‍टरी 20 ते 30 किलो नत्र 25 किलो स्‍फूरद व 25 किलो पालाश लागवडीच्‍या वेळी द्यावेत.  नत्राचा 25 ते 30 किलोचा दुसरा हप्‍ता 1 महिन्‍याने द्यावा. अनेक वेळा अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पानांवर दिसू लागतात. गैरसमज होऊन आपण बुरशीनाशक, जीवाणू नाशकांची फवारणी करतो पण फायदा होत नाही. त्यामुळे या कामी तज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर आहे. या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर तज्ञांचे फोन नंबर दिले आहेत त्यांना संपर्क साधावा, अन्यथा तंत्रज्ञानाचा फोर्म भरावा जेणेकरून आम्ही आपणास संपर्क साधू शकू. 

दोघी पिके फवारणीच्या खतांना चांगला प्रतिसाद देतात या द्र्ष्टीकोनातून अमृत गोल्ड एन पी के खतांची माहिती देत आहे. 

 

अमृत गोल्ड एन पी के हि सर्व खते पाण्यात विद्राव्य असल्याने फवारणी व ठिबक ने पिकाच्या गरजेच्या वेळी देता येते त्यामुळे थोडे सुद्धा वाया जात नाही व अतिशय कमी प्रमाणात वापरून देखील जास्त प्रभावशाली असतात. हि खते नत्र, स्पुरद, पालाश,मॅगनेशियम व गंधकाचा ठराविक प्रमाणात पुरवठा करतात. यात क्लोराईड, सोडियम व इतर हानीकारक पदार्थ अजिबात नसतात. इतर खते, कीटकनाशके व तणनाशकांसोबत देखील वापरता येतो. हि खते पर्यावरण पूरक असून मजुरीच्या खर्चात बचत करतात.पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी खताची निवड करता येते.

 • अमृत गोल्ड १९-१९-१९, नत्र, स्पुरद व पालाश चा समप्रमाणात पुरवठा करते. वाढीच्या अगदी सुरवातीच्या काळात याचा वापर करावा. निस्तेज झालेल्या पिकात सुधारणा करण्यासाठी याची फवारणी अतिशय प्रभावी ठरते. 
 • अमृत गोल्ड १३-४०-१३  शाखीय विकासासाठी याचा चांगला उपयोग होतो. 
 • अमृत गोल्ड १२-६१-०० म्हणजेच विद्राव्य मोनो अमोनियम फॉस्फेट; नत्र व स्पुरद चे उत्कृष्ट खत. सुरवातीच्या काळात जेव्हा नत्र व फॉस्फेट ची पिकास गरज असते, याचा वापर प्रभावशाली ठरतो. पिक फुलावर यायला यामुळे मदत मिळते.
 • अमृत गोल्ड १३-००-४५ म्हणजेच विद्राव्य पोटॅशीअम नायट्रेट. या खतात नत्र नायट्रेट स्वरूपातील असल्याने लगेच शोषले जाते, शिवाय पोटॅशीअम च्या शोषणात मदत करते. यात क्लोराईड नसल्याने म्युरेट ऑफ पोटॅश पेक्षा चांगले आहे, क्षारपड जमिनीत याचा उपयोग लाभकारी आहे. 
 • अमृत गोल्ड ००-५२-३४ म्हणजेच विद्राव्य मोनो पोटॅशीअम फॉस्फेट; स्पुरद व पोटॅश चे उत्कृष्ट खत. फळांच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात जेव्हा पोटॅशीअम व फॉस्फेट ची पिकास जास्त भूक असते, याचा वापर प्रभावशाली ठरतो. फळे रसदार व गोड व्हावीत म्हणून फळांच्या वाढी च्या काळात याचा उपयोग करावा.
 • अमृत गोल्ड ००-००-२३ म्हणजेच पोटॅशिअम शोनाइट, पालाश व मॅगनेशियम ची पूर्तता करते. दोघी अन्नद्रव्य सल्फेट स्वरुपात असतात त्यामुळे गंधकाचा पुरवठा होतो. क्लोरीन सहन न होणाऱ्या पिकात एम ओ पी ऐवजी  याचा वापर केला जातो.
 • अमृत गोल्ड ००-००-५० म्हणजेच सल्फेट ऑफ पोटॅश. पिकास पोटॅश व गंधकाचा पुरवठा करणारे विद्र्याव्य खत. यात क्लोराईड नसल्याने म्युरेट ऑफ पोटॅश पेक्षा चांगले आहे, क्षारपड जमिनीत याचा उपयोग लाभकारी आहे. फळांची टिकवण क्षमता वाढण्या साठी याची फवारणी करावी. 

  प्रत्येक पिकास वाढीच्या काळात केव्हा ना केव्हा, कोणत्या ना कोणत्या सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता जाणवते. एका सूक्ष्मअन्नद्रव्याची कमी झाली के अन्य सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते याला को-डेफिसिअन्सी म्हटले जाते. त्यामुळे वैज्ञानिकांनी सूक्ष्मअन्नद्रव्य मिश्रण वापरायची सूचना केली आहे. कमीत कमी मात्रेत याचा अधिक चांगला फायदा दिसून येतो. याच्या फवारणी मुळे मातीतील इतर सूक्ष्मअन्नद्रव्यांचे देखील शोषण होते. याच्या फवारणी ने पिकाची वाढ जोमाततर होतेच शिवाय रोग प्रतिकार क्षमता देखील विकसित होते. या साठी आपण पाटील बायोटेक चे मायक्रोडील मरा ग्रेड २ हे एक सहा सूक्ष्मअन्नद्रव्यांचे मिश्रण वापरावे. यात जस्त ३%, लोह २.५%, मंगल १ %, तांबा १%, बोरोन ०.५% व् मोलाब्द ०.१ % आहे. महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या ग्रेड च्या फवारणीची शिफारस केली आहे. याचा डोस फक्त १ मिली प्रती लिटर लागतो. विकासकाळात दोनदा पुनरावृत्ती करावी.  

  आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

  ---------------------

  आंतरमशागत

  झाडा भोवतालचे तण काढून स्‍वच्‍छता ठेवावी, जमिन नेहमी भुसभुशीत ठेवावी. दोन्‍ही पिकास आधाराची गरज असल्‍यामुळे बांबू , झाडांच्‍या वाळलेल्‍या फांद्यां व तारेचा चा वापर करावा. वेली नीट पसरल्याने उत्पादन वाढीस मदत होते. 

  रोग व कीड

  या पिकांवर प्रामुख्‍याने केवडा (डाऊनी मिल्ड्यू) व भुरी (पावडरी मिल्ड्यू) बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो.

   

  भूरित पानांच्या दोन्ही भागांवर व खोडावर पावडरीसारखे लहान ठिपके सुरवातीला दिसतात. हे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पानांवर खूप जलद पसरतात. या भुरी रोगाच्‍या नियंत्रणासाठी डिनोकॅप -1 मिली + डॉक्टर प्लस ४ ग्राम प्रती लिटर पाण्‍यातून फवारावे.

  दमट हवामानात होणारा केवडा हा बुरशीजन्य रोग खूपच हानिकारक आहे. पानांच्या वरच्या बाजूने पिवळ्या रंगाचे लहान ठिपके सुरवातीला दिसतात. पानांच्या खालच्या बाजूने पाहिल्यावर चिकट, ओले, फिकट हिरव्या रंगाचे ठिपके दिसतात. हे ठिपके ठराविक आकारापेक्षा जास्त वाढत नाही. परंतु मोठ्या संख्येने असल्यामुळे पूर्ण पानभर पसरतात. यामुळे पाने वाळतात व संपूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते. या रोगाच्‍या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रतिलिटर + व्हेनॉम १ मिलि प्रती लिटर पाण्‍यातून फवारावे.

  ----------------------
  --------------------- 

  किडी : या पिकांवर प्रामुख्‍याने तांबडे भुंगे, फळमाशी, मावा, नागअळी  या किडीचा प्रादुर्भाव होतो. बचावात्मक कीड नियंत्रण पद्धतीचा उपयोग नक्की करावा. क्षेत्रात एकरी दहा (पिवळे ७ व निळे ३) चिकट सापळे (यलो स्टिकी ट्रॅप व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप) लावले तर कीडनिरीक्षण व नियंत्रण दोघी शक्य होते. जर परिसरातील सर्व शेतकरी बांधवानी मिळून हे नियोजन केले तर अधिक प्रभावी होऊ शकते.

  पाने खाणाऱ्या अळीच्‍या नियंत्रणासाठी ट्रायअॅझोफॉस 2 मिली प्रतिलिटर पाण्‍यातून फवारावे. फळ माशीच्‍या नियंत्रणासाठी माक्षिकारी काम-गंध सापळे एकरी ६ लावावे.  नागअळी च्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस 2 मिलि व पोकलॅड १ मिली प्रति लिटर फवारावे. 

  मक्षिकारी चे रिझल्ट कसे आहेत हे पहाण्यासाठी इथे दिलेला व्हिडिओ नक्की पहा

  काढणी व उत्‍पादन

  पिक लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी फुलावर येते. पुर्ण वाढलेली पण कोवळी फळे काढावीत. नखाने हळूच दाबल्‍यावर व्रण पडतो. ती फळे कोवळी समजावीत. दोडक्‍याचे हेक्‍टरी 100 ते 150 क्विंटल उत्‍पादन मिळते.

  कारल्‍याची फळे कोवळी असतानाच काढावीत. कारल्‍याचे हेक्‍टरी 100 ते 150 क्विंटल उत्‍पादन येते.

  नाविन्यपूर्ण बाजारपेठ: तुमच्या शेतीतुंन उत्पादित होणारे कारले लगेच विकले गेले तर पैसा लवकर मोकळा होतो पण अश्या ठिकाणी तुम्ही नाडले जायची शक्यता असते. हि गोष्ट लक्षात घेवून एकूण उत्पादित कारल्याचा काही भाग वेगवेगळ्या पद्धतीने विकल्यास अधिक फायदा होईल. 

  शहरी भागात प्रभात फेरी मारणाऱ्यांची संख्या फार मोठी असते. हि मंडळी रस्त्याच्या बाजूला विकला जाणारा कारल्याचा ज्यूस पितात. ज्यूस बनवून विकणाऱ्या लोकांशी संपर्क साधला तर फ्रेश कारल्यासाठी व्यावसायिक ग्राहक मिळू शकतो. हि मंडळी कारल्याचे काप सुकवून विकू शकतात. शहरी चाकरमाने म्हणजे या उत्पादनासाठी मोठी बाजारपेठ आहे. 

   

  आपण नियमित कारले उत्पादन घेत असाल तर इथे क्लिक करून फॉर्म भरा

   

     वर दिलेली माहिती, पत्ते, फोन नंबर आदि आपण आपल्या पद्धतीने पडताळून घ्यावीत.

    वाचकाचे पश्न

    Balu Pathade(balupathade8620@gmil.com):

    सर मी एक एकर कारले लावगड केलि आहे. दोनदा तोडणी झालि. आता काही ठीकाणी वेलिवरती व्हायरस दिसून येत आहे,यावर उपाय सांगावा.

    आपल्या पिकात विषाणू जन्य रोगाची लागवड झाली आहे. यावर सरळमार्गी उपाय नाही. सर्वप्रथम आपण खत नियोजनाकडे लक्ष द्यावे. नत्र-स्पुरद-पालाश-कॅल्शीयम-मॅग्नेशियम सल्फर व सूक्ष्मअन्न द्रव्य व्यवस्थित दिले आहे कि नाही याची पडताळणी करा. नसेल तर त्याचे योग्य नियोजन करा.

    रसशोषक किडीच्या माध्यमातून विषाणू पसरतो तेव्हा रससोश्क किडी च्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड ७० डब्ल्यू.जी. (ॲडमायर, ॲटम प्लस, टेर्नर, व्हिक्टर प्लस, सेनसेक्स गोल्ड) १-२ ग्राम प्रती पंप फवारणी करावी. १५ दिवसानि फेनव्हलरेट २० टक्के प्रवाही -(बीलफेन, सुमिसीडीन, लुफेन, फेनकिल) ५ ते ७ मिली प्रती पंप फवारणी करावी. या पुढे प्रत्येक पिकात पिवळे व चिकट सापळे एकरी १०-१२ नियमित लावत जावे. याचे निरीक्षण करून किडीचा अंदाज येईल

    त्यानंतर पाटील बायोटेक चे अरेनाची फवारणी करा - दर १५ दिवसात एकदा.अरेनाच्या फवारणी मुळे आपल्या पिकाची रोग व कीड प्रतिकारशक्ती वाढेल. अरेनामुळे लीग्नीफिकेशन ची प्रक्रिया वेग धरते ज्यामुळे रससोशक किडींना रस शोषून घ्यायला अडचण होते व त्याच्या मार्फत होणारा विषाणू चा प्रसार नियंत्रीत होतो. 

    आपण एकरी ६-८ माक्षिकारी सापळे लावले आहेत कि नाही? नसतील तर आजच लावा नाहीतर पुढे फळमाशीचा प्रकोप होऊ शकतो.

    कॅल्शीयम-मॅग्नेशियम सल्फर व सूक्ष्मअन्न द्रव्य दिले नसेल तर जवळच्या कृषीकेंद्रातून पाटील बायोटेक ची अमृत ड्रेंचींग कीटमायक्रोकीट खरेदी करा.

    आपल्याला कोणत्या पिकाचे व्यवस्थापन शेड्यूल हवे आहे का? शेड्यूल मिळवा स्क्रीन वर दिसणाऱ्या बटणावर क्लिक करा.
    Back to blog