गुलाबी बोंड अळी इतकी गंभीर समस्या का आहे?

मागील वर्षी बोंड अळी येण्याचे भाकीत तज्ञांनी केले होते. बियाणे विक्री सुरु होण्याच्या वेळेसच खबरदारी घेण्याबद्दल सर्वदूर सांगितले जात होते. आपण बीटी बियाणे पेरीत असल्याने बहुतेक शेतकरी बांधवांनी या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. याचा जो परिणाम असा झाला तो आपण सर्वांनी अनुभवला आहे. 

आश्चर्याची बाब अशी कि जरी बहुतेक ठिकाणी तिसरी वेचणी झालीच नाही तरी काही निवडक शेतकरी बांधवांनी सरासरी उत्पादन काढत मार्च-एप्रिल पर्यंत वेचणी केली. 

मित्रहो, बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यावर प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज यायला वेळ लागतो. अनेक शेतकरी बांधव योग्य निरीक्षण घेण्यात कमी पडतात त्यामुळे अळी चे भरपूर प्रजनन होते व कीड नियंत्रणाबाहेर जावून उत्पादनात गंभीर म्हणजे ९० ते १०० टक्के घट होते. हि बाब लक्षात घेवून आपण सुरवातीच्या काळात म्हणजे फुले लागण्याच्या वेळेसच गुलाबी बोंड अळी चे सापळे शेतात लावावे व त्यात पतंग अडकल्यास शिफारसी नुसार फवारणी करावी

या वर्षी नकारात्मकता पसरवणारी मंडळी त्यांचे काम करते आहे.  त्यामुळे उत्पादन घटून कापसाला भाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा अजिबात कापूस लावू नका अश्या म्हणण्याला बळी न पडता, कमी प्रमाणात का होईना कापूस नक्की लावा.

 

  तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले का? खालील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रश्नावर क्लिक करा.

  1. या वर्षी कापसावर बोंड अळी येणार का?
  2. गुलाबी बोंडअळी चे नियंत्रण कसे करावे?
  3. बोंड अळी चे सापळे वापरण्याची पद्धत काय?

--संपर्क--

खान्देश  7507775355  विदर्भ  9049986411 

मराठवाडा  8554983444  पश्चिम महाराष्ट्र  7507775359

मित्रहो, हा लेख वाचून आपल्याला काही उपयोगी माहिती मिळाली का? काय अडचण वाटते? आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.