वांग्यातील फळ व शेंडे पोखरणारया अळीचे कसे करणार नियंत्रण?

वांग्यातील फळ व शेंडे पोखरणारया अळीचे कसे करणार नियंत्रण?

वांग्यातील फळ आणि शेंडा पोखरणारी कीड (Leucinodes orbonalis ल्युसीनोड्स ओर्बोनालीस) सर्वसाधारणपणे ४० टक्के नुकसान करते. जर दुर्लक्ष केले व योग्य वेळी फवारण्या केल्या नाहीत तर हे नुकसान ८० टक्क्या पर्यंत जावू शकते. हि अळी पानांच्या देठात, कोवळ्या शेंड्यांत, फुलांत किंवा फळांत शिरून आतलं गर खाते. 

वर्षाकाठी किडीच्या आठ ते दहा पिढ्या पूर्ण होतात. अंड्यातून बाहेर पडणारी अळी पानाच्या मुख्य शिरेतून देठात आणि त्यानंतर शेंड्यात प्रवेश करते. अळीने शेंडा आतून पूर्णपणे पोखरल्याने कीडग्रस्त शेंडे सुकून वाळलेले दिसतात.

पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वाळून, सुकून जमिनीवर गळून पडतात.

लहान फळामध्ये ही अळी हिरव्या पाकळीच्या आतून फळामध्ये प्रवेश करून, विष्ठेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडले आहे की नाही, हे कळणे अवघड असते.

अळी फळात शिरल्यावर आतील गर खाते. विष्ठा आतच सोडते. अशी कीडग्रस्त फळे खाण्यास अयोग्य ठरतात.

किडीचे नियंत्रण अगदी सुरवातीच्या काळात करणे गरजेचे आहे. या साठी पिक फुलावर यायच्या अगोदर एकरी 15 कामगंध सापळे लावावेत. 

 

यातील कामगंध किडीच्या उडणाऱ्या अवस्थेला आकर्षित करून जायबंदी करतो. त्यामुळे त्यांचे ना मिलन होते ना ते अंडी देवू शकतात. प्रजननक्षमता निरस्त्र झाल्याने कीड मोठ्या प्रमाणत नियंत्रणात येते. 

जर आपल्या शेतात पिक अगोदरच फुल-फळ अवस्थेत पोहोचले असेल तर खाली  दिलेल्या केंद्रीय कीटकनाशक बोर्डाच्या शिफारसी नुसार कीटकनाशक फवारणी करावी व त्यानंतर वर सांगितलेले सापळे शेतात उभे करावे. 

कीटकनाशकांची निवड करते वेळी प्रकर्षाने कोम्बो कीटकनाशके वापरावीत जेणे करून उत्तम दर्जाचे नियंत्रण मिळेल.

 1. बीटा सायफ्लूथ्रीन ८.४९ + इमीडाक्लोप्रीड १९.८१ ओडी (सोलोमोन) ५-६ मिली प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये
 2. सायपरमेथ्रीन३% + क़्विनोलफोस २०% इसी (रिले १०१, विराट) ५-८ मिली पर पंप, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये
 3. डेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफोस ३५ % इसी (टायगर, डेलफोस, अशोका) २-२.५ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये
 4. पायरीप्रोकझीफेन ५% इसी + फेनप्रोपाथ्रीन १५ % इसी १ ते १.२५ मिली पर लिटर, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये

वरील कोम्बो कीटकनाशके उपलब्ध होण्यात अडचणी असल्यास खाली दिलेल्या यादीतील कीटकनाशके आलटून-पालटून फवारावीत जेणेकरून किडीत प्रतिकारक्षमता विकसित होणार नाही.

 • अझाडीरेकटीन १% (१०००० पी पी एम) कडूनिंबावर आधारित प्रवाही, २ ते ३ मिली प्रती लिटर,  तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये 
 • क्लोरानट्रानिप्लोर १८.५ टक्के (ड्यूपांटचे कोराजेन) ५-६ मिली प्रती १५ लिटर, तोडणी सूर व्हायच्या २२ दिवस अगोदर वापरू नये
 • क्लोरपायरीफॉस २० ईसी  (डर्सबान, त्रिशुल, रडार, क्लोरगार्ड, क्लोरवीप, फोर्स, ट्रायसेल, क्लोरोसन, क्लासिक, लिथल, क्लोरोसील) १- २ मिली प्रती लिटर
 • सायपरमेथ्रीन १० टक्के प्रवाही (सापरमार, स्टार सायप्रीन, रीपकॉर्ड, अंकुश, फेनसान, सायपरमील, उस्ताद) १ ते ४ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये
 • सायपरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही (बासाथ्रिन, सिबील, रुद्र, सायपरसान, सिंबुश, सापरगार्ड, सूपर फाईटर, कोब्रा, सायरस) ५ ते ६ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये 
 • डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही (डेसिस, डिकामेथ्रीन, डेकागार्ड) १ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये
 • इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी  (प्रोक्लेम, डेरिम, ओेलेक्स, हिलक्लेम, तत्काळ, सफारी) ६ ग्राम प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये
 • फेनव्हलरेट २० टक्के प्रवाही (बीलफेन, सुमिसीडीन, लुफेन, फेनकिल) १० मिली प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये
 • फेनप्रोपाथ्रिन ३० टक्के प्रवाही  (मिथोथीन) ५ ते ७ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या १० दिवस अगोदर वापरू नये
 • लॅमडा- सीहॅलोथ्रीन ४.९ सीएस-(मिट्रो) ०.५ ते १ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये
 • फोसॅलॉन ३५ टक्के प्रवाही -(झोलोन, होल्टोन) ३ मिली प्रती लिटर
 • थायक्लोप्रीड २१.७ % एस सी (अलर्ट, अलंटो) १.५ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये
 • थायोडिकार्ब ७५ टक्के पा.वि.भु.(लार्वीन, सर्वीन) १.२ तो २.० ग्राम प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ६ दिवस अगोदर वापरू नये.

वांगी उत्पादनाचा खर्च कमीत कमी ठेवण्यासाठी आमचा विशेष लेख वाचा. त्यासाठी इथे क्लिक करा


आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

---------------------

आपल्याला कोणत्या पिकाचे व्यवस्थापन शेड्यूल हवे आहे का? शेड्यूल मिळवा स्क्रीन वर दिसणाऱ्या बटणावर क्लिक करा.
Back to blog