वांग्याचे कीडनियंत्रण करा स्वस्तात

वांग्याचे कीडनियंत्रण करा स्वस्तात

महाराष्ट्रातील सर्व भागात वांगी लागवड वर्षभर होत. या फळभाजी पिकाला मोठी मागणी आहे. लहान-थोरांना सर्वांना हि भाजी आवडत असल्याने किंमतहि चांगली मिळते. दुर्देवाने यात किडीचे प्रमाण खूप आहे. योग्य नियोजन न केल्यास एक तर पिक हातून जावू शकते व उशिरा नियोजन केल्यास उत्पादन खर्च वाढू शकतो. 

या ब्लॉगमध्ये खाली केंद्रीय कीटकनाशक बोर्डाच्या कीडनियंत्रणाच्या शिफारसी व्यापारी नावासहित देत आहे. आपण या शिफारसी आपल्या नोंदवहीत लिहून ठेवू शकता. तत्पूर्वी किडींचे प्रमाण कमीत कमी रहावे म्हणून काय करता येईल? व त्यासाठी पाटील बायोटेकची कोणती उत्पादने आपण वापरू शकतो याची माहिती घेवू. 

  • ज्या जमिनीत टोमॅटो, मिरची, भेंडी किंवा वेलवर्गीय भाज्या अशी पिके घेतली असतील तिथे वांग्याची लागवड करू नये. चांगली निचरा असलेली मध्यम काळी कसदार जमीन या पिकासाठी चांगली असते
  • रोपे बनवण्यासाठी वाफयावर बी पेरताना फोरेट 10 टक्‍के दाणेदार प्रती वाफा 20 ग्रॅम या प्रमाणात बियाण्‍याच्‍या दोन ओळींमध्‍ये टाकावे.
  • रोपवाटिकेतील रोपावरील मावा, तुडतुडे फूलकिडे या किडींच्‍या नियंत्रणासाठी दोन आठवडयांनी बायरचे सोलोमन ३-४ मिली प्रती पंप किंवा ३० मिली मॅलेथिऑन (५० टक्‍के) किंवा ३ मिली फॉस्‍फॉमिडॉन ( ८५ टक्‍के) किंवा १५ मिलीलिटर डयमेथोएट (३० टक्‍के ) किंवा १५ मिली फार्मोथिऑन (२५ टक्‍के ) १५ लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.
  • रोपवाटिकेतील रोपावर अमृत गोल्ड १९-१९-१९ एक टक्का (१५० ग्राम प्रती पंप) च्या दराने दोन दिवसाआड फवारणी केल्यास वाढ जोमदार होईल.
  • रोपवाटिकेतील रोपावर तिसऱ्या आठवड्यात मायक्रोडील ग्रेड २ लिक्विड १५ मिली प्रती पंप ची फवारणी करावी जेणे करून रोपात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होईल व पुनर्लागवड करते वेळी त्यावर जास्त ताण येणार नाही.

 • रोपांची पुनर्लागवड करते वेळी इमिडॅक्‍लोप्रीड १७.८ टक्के एस एल च्या एक मिली प्रती लिटर द्रावणात मुळे बुडवून मगच लागवड करावी.
 •  पुनर्लागवडीची जमनी तयार करते वेळी एकरी १० किलो मायक्रोडील ग्रेड १, ३ किलो हुमणासूर, ३ किलो रीलीजर चांगल्या कुजलेल्या भरखतात मिसळून द्यावे.एकरी बेसल डोसमध्ये जमिनीच्या मगदुरानुसार १०० किलो युरिया, १३० किलो एस एस पी व ४१ किलो एस ओ पी चा समावेश करावा

 

 • वांग्यात प्लास्टिक मल्चिंग चा वापर करू शकता. फायदे, खर्च व नियोजन या विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आमचा लेख नक्की वाचावा - मल्चफिल्म ची निवड व फायदा
 • वाफ्याची रुंदी सव्वा मीटर असवी व दोन वाफ्यात एक फुट अंतर ठेवावे. मधोमध ठिबक ची नळी टाकावी. ३.५ ते ४ लिटर प्रती तास या क्षमतेचा पाणी पुरवठा व्हावा अशी रचना करावी. दोन ओळीत समोरा समोर लागवड करावी. रुंदीवर दोन रोपातील अंतर ३ फुट तर लांबीवर हे अंतर २ फुट असावे. 
 • रोपाच्या उंचीच्या वर एकरी ७ पिवळे व ३ निळे चिकट सापळे लावावेत. यावर आपण येता-जाता नजर ठेवू शकता. चिकटलेल्या किडींची संख्या व प्रकार या नुसार फवारणी बद्दल पुढील निर्णय घेवू शकता. रससोषक किडींचे या पद्धतीने नियंत्रण केल्यास, या किडींच्या माध्यमातून पसरणारे विविध विषाणूजन्य रोग नियंत्रणात रहातात.
 • वांग्यात शेंडे व फळ पोखरणारी अळी खूपच त्रासदायक असते त्यासाठी आपण एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावू शकता.
 • ठिबकच्या माध्यमातून पिक वाढीच्या काळात गरजे नुसार अमृत गोल्ड एन पी के १३-४०-१३, कॅलनेट, रीलीजर, ह्युमँँग द्यावे
 • फुलांची संख्या वाढण्यासाठी अमृत गोल्ड एन पी के १२-६०-०० ची १% द्रावणाची फवारणी करावी.
 • फळांची वाढ चांगली होण्यासाठी अमृत गोल्ड एन पी के ००-५२-३४ व मायक्रोडील बी २० ठिबक ने द्यावे किंवा फवारणी करावी.
 • पानांवरील करपा, फळकूज रोगांच्या नियंत्रणासाठी बाविस्टीन १० ग्रॅम अथवा डायथेन एम-४५, २५ ग्रॅम यांपैकी एक औषध, आलटून पालटून १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. गरजे नुसार तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.
 • पानांवरील ठिपके आणि भुरीसाठी रीलीजर २.५ ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.गरजे नुसार तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.

खाली केंद्रीय कीटकनाशक बोर्डाच्या शिफारसी देत आहे. कोम्बो कीटकनाशकांचा वापर प्रकर्षाने करवा. तीच तीच औषधी फवारल्याने कीडित प्रतिकारशक्ती निर्माण होते म्हणून नियमित पणे पर्यायी कीटकनाशक निवडावे. 

 फळ व खोड पोखरणारी कीड

अझाडीरेकटीन १% (१०००० पी पी एम) कडूनिंबावर आधारित प्रवाही, २ ते ३ मिली प्रती लिटर,  तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये 

क्लोरानट्रानिप्लोर १८.५ टक्के (ड्यूपांटचे कोराजेन) ५-६ मिली प्रती १५ लिटर, तोडणी सूर व्हायच्या २२ दिवस अगोदर वापरू नये

क्लोरपायरीफॉस २० ईसी  (डर्सबान, त्रिशुल, रडार, क्लोरगार्ड, क्लोरवीप, फोर्स, ट्रायसेल, क्लोरोसन, क्लासिक, लिथल, क्लोरोसील) १- २ मिली प्रती लिटर

सायपरमेथ्रीन १० टक्के प्रवाही (सापरमार, स्टार सायप्रीन, रीपकॉर्ड, अंकुश, फेनसान, सायपरमील, उस्ताद) १ ते ४ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये

सायपरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही (बासाथ्रिन, सिबील, रुद्र, सायपरसान, सिंबुश, सापरगार्ड, सूपर फाईटर, कोब्रा, सायरस) ५ ते ६ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये 

डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही (डेसिस, डिकामेथ्रीन, डेकागार्ड) १ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये 

इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी  (प्रोक्लेम, डेरिम, ओेलेक्स, हिलक्लेम, तत्काळ, सफारी) ६ ग्राम प्रती पंपतोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये

फेनव्हलरेट २० टक्के प्रवाही (बीलफेन, सुमिसीडीन, लुफेन, फेनकिल) १० मिली प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये

फेनप्रोपाथ्रिन ३० टक्के प्रवाही  (मिथोथीन) ५ ते ७ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या १० दिवस अगोदर वापरू नये


लॅमडा- सीहॅलोथ्रीन ४.९ सीएस-मिट्रो ०.५ ते १ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये

फोसॅलॉन ३५ टक्के प्रवाही -झोलोन, होल्टोन, ३ मिली प्रती लिटर

थायक्लोप्रीड २१.७ % एस सी (अलर्ट, अलंटो) १.५ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये

थायोडिकार्ब ७५ टक्के पा.वि.भु.(लार्वीन, सर्वीन) १.२ तो २.० ग्राम प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ६ दिवस अगोदर वापरू नये

बीटा सायफ्लूथ्रीन ८.४९ + इमीडाक्लोप्रीड १९.८१ ओडी (सोलोमोन) ५-६ मिली प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये

सायपरमेथ्रीन३% + क़्विनोलफोस २०% इसी (रिले १०१, विराट) ५-८ मिली पर पंप, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये

डेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफोस ३५ % इसी (टायगर, डेलफोस, अशोका) २-२.५ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये

पायरीप्रोकझीफेन ५% इसी + फेनप्रोपाथ्रीन १५ % इसी १ ते १.२५ मिली पर लिटर, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये

मावाफेनव्हलरेट २० टक्के प्रवाही  (बीलफेन, सुमिसीडीन, लुफेन, फेनकिल) १० मिली /पंप, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये  


फोस्फामीडॉन ४० % एस एल (स्टारमीडॉन,केमीडॉन, किनाडॉन प्लस, हायडन) तोडणी सूर व्हायच्या १०  दिवस अगोदर वापरू नये 

थायोमेंटोन २५% इसी १-१,२५ मिली प्रती लिटर

बीटा सायफ्लूथ्रीन ८.४९ + इमीडाक्लोप्रीड १९.८१ ओडी (सोलोमोन) ५-६ मिली प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये

डेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफोस ३५ % इसी (टायगर, डेलफोस, अशोका) २-२.५ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये

तुडतुडे


कार्बारील ५० डब्ल्यु.पी. (सेव्हिन, हेक्साबिन) २-४ ग्राम/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५  दिवस अगोदर वापरू नये 

फोस्फामीडॉन ४० % एस एल (स्टारमीडॉन,केमीडॉन, किनाडॉन प्लस, हायडन) तोडणी सूर व्हायच्या १०  दिवस अगोदर वापरू नये 

बीटा सायफ्लूथ्रीन ८.४९ + इमीडाक्लोप्रीड १९.८१ ओडी (सोलोमोन) ५-६ मिली प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये

डेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफोस ३५ % इसी (टायगर, डेलफोस, अशोका) २-२.५ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये

पांढरी माशी

डायफेनथुरॉन ५० डब्ल्यु.पी. (पोलो, पेगासस, रुबी, डिक्लेअर) तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये

फेनप्रोपाथ्रिन ३० टक्के प्रवाही  (मिथोथीन) ५ ते ७ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या १० दिवस अगोदर वापरू नये

फोस्फामीडॉन ४० % एस एल (स्टारमीडॉन,केमीडॉन, किनाडॉन प्लस, हायडन) तोडणी सूर व्हायच्या १०  दिवस अगोदर वापरू नये 

थायमिथॉक्झाम २५ डब्ल्यू जी (ॲक्टरा, ॲरो, क्लिक, स्लेअर, रिनोवा) ०.४ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये 

पायरीप्रोक्झीफेन ५ % इसी + फेनप्रोपथ्रीन १५% इसी १ ते १.२५ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये 

पिवळा कोळी

 

डायकोफॉल १८.५ ईसी  (केलथेन, डिफॉल, हिम्फोल, कोलोनेल- एस) ६ ते १० मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या १५-२० दिवस अगोदर वापरू नये

 

फेनप्रोपाथ्रिन ३० टक्के प्रवाही  (मिथोथीन) ५ ते ७ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या १० दिवस अगोदर वापरू नये

फ्लूमाइट २०% एस सी / फ्लूफेनझाईन २०% एस सी. ०.५ - १ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये 

लाल कोळी

इथोक्साझोल १०% एस सी (बोरनियो) १ ग्राम प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये

फेन्झाक्वीन १०% इसी (मेजीस्टर) २.५ मिली परतील लिटर तोडणी सूर व्हायच्या १० दिवस अगोदर वापरू नये

फेनप्रोपाथ्रिन ३० टक्के प्रवाही  (मिथोथीन) ५ ते ७ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या १० दिवस अगोदर वापरू नये

मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही (सायथिऑन, मॅलमर, मालटेक्स, हिल्थोऑन, सल्मॉथीऑन) २-३ मिली प्रती लिटर 

स्पायरोमेसीफेन २२.९ % एससी (ओबेरॉन, व्होल्टेज, ऑफमाइट) ०.८ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये

दोन ठिपक्यांचा कोळी

प्रोपारगाइट ५७ % इसी. (ओमाइट, माइटकिल, माष्टामाइट, सिम्बा) २.५ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ६ दिवस अगोदर वापरू नये 

 

वांग्यातील बुरशीजन्य रोगांसाठी खालील प्रमाणे बुरशीनाशके वापरावीत

 • रोपांना मर रोग होऊ नये म्हणून कॅप्टन ७५% डब्लू पी १ किलो ४०० लिटर पाण्यातून १ एकर वाफ्यात सोडावे
 • पानावरील ठिपके व फळसड रोखण्यासाठी वापरा कार्बेंडाझिम ५०% डब्लू पी ०.५ ग्राम/लिटर
 • पानावर पसरणाऱ्या डागांसाठी वापरा झिनेब ७५ % डब्लू पी २ ग्राम प्रती लिटर
 • भुरी नियंत्रणासाठी बेनोमिल ५० % डब्लू पी २ ग्राम प्रती १५ लिटर


संदर्भ: 

 • केंद्रीय कीटकनाशक बोर्ड
 • भारतीय कृषी अनुसंधान परिषद
 

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

Back to blog