वांग्याच्या पिकावर लोणच्याची मात्रा!

वांग्याच्या पिकावर लोणच्याची मात्रा!

वांगी हे अखिल भारतातील नाही तर विश्वातील लोकप्रिय पिक आहे. असे असले तरी प्रत्येक क्षेत्रातील वांग्याला एक वेगळी चव, रंग आणि रूप आहे. लग्न सोहळे असो कि हॉटेलचा मेनू, रस्त्यावरील चटोरी दुकाने असो कि घरगुती सकाळ-सायंकाळचा मेनू, इतकेच काय चखना असो कि लोणचे! वांग्याने सगळीकडे आपले चाहते निर्माण केले आहेत. 

 तसे नाशवंत असले तरी बऱ्याच दूरच्या बाजारपेठेत वांगे पाठवता येतात. वर्षभर मागणी असते. 

सन २०२० या आर्थिक वर्षात भारतात वांगी उत्पादनाचे प्रमाण अंदाजे १२ दशलक्ष मेट्रिक टन होते. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही थोडीशी घट झाली. एकूण लागवड साधारणपणे सात लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती. सरासरी एकरी उत्पादन ७ टन एव्हढे होते.

 मित्रहो जर बाजारपेठेची फारशी अडचण वाटत नसेल तर, वांग्याचे पिक व्यावसायिक दृष्टीकोन समोर ठेवून घेता येते. एकरी १२ ते १६ टनाचे लक्ष अनेक शेतकरी गाठतात. सुरुवातीचा ३ महिन्याचा काळ गुंतवणूक व मेहनतीचा आहे. त्या पुढील २ महिन्याच्या काळात गुंतवणूकीची वसुली होते. त्या पुढे जितका काळ आपण या पिकास शेतात उभे करू शकलो, तितका जास्त नफा होतो. या काळात व्यवस्थापकिय खर्चाची बाजू, मागणी व भावाच्या हिशोबाने सांभाळायची असते. सरते शेवटी आपला नफा, मागणी-पुरवठा, या मूळ तत्वावर आधारित आहे. जे भव्यदिव्य दावे यशोगाथांमध्ये केले जातात, ते मृगजळ निर्माण करतात. त्या मागे शहाण्याने न जाणे हिताचे.

 

व्यावसायिक दृष्टीकोन म्हणजे काय? हा मुद्दा लक्षात घेवू. कोणत्याहि व्यवसाय किंवा पिकाचा एक नियम आहे. सुरुवातीचा खर्च, म्हणजे गुंतवणूक जितकी व्यवहारिक, गुणवत्तापूर्ण  व ठोस तितकी बाजारात टिकून रहायची, लढायची क्षमता अधिक. सुरुवातीची गुंतवणूक भक्कम असेल तर त्यानंतर प्रत्यक्ष व्यवसाय सुरु असतांना करावा लागणारा खर्च कमी होतो. पण नफ्याचा टक्का व त्याची शाश्वती वाढत जाते. 

जसे पिकासाठी मृदेची निवड, त्यात मिसळलेली भरखते, जोरखते, जीवाणूखते, सूक्ष्मअन्न द्रव्ये, आच्छादन, ठिबक, आवश्यक असल्यास तारबांधणी, उन्हापासून रक्षणाची गरज पडणार असेल तेव्हा क्रोपकव्हर, अतिपाउसा पासून रक्षणासाठी निचरा करायची सोय, किडीचे निरीक्षण व नियंत्रण करण्यासाठी प्रकाश, फेरोमोन व चिकट सापळे,  पक्षीथांबे, जंगली प्राण्याचा वावर असल्यास त्यांच्या पंचेन्द्रीयावर आघात करू शकणाऱ्या यंत्रणा, पूर्वनियोजनासाठी वापरायची आधुनिक कीडनाशके, नैनो युरिया,  संजीवके, उत्तेजके असा आपला मोठा डोलारा आहे. या सर्व बाबतीत आपण जितके सजग व व्यवहारी दृशिकोन ठेवाल तितक्या कमी खर्चात भरीव गुंतवणूक करू शकाल.

वांगे पिकाच्या बाबतीत आम्ही यापूर्वी काही लेख प्रसिद्ध केले आहेत. या लेखा वर स्क्रोल करून, खालील बाजूस, आपण त्या लेखांचे थंबनेल पाहू शकता, त्यावर क्लिक करून वाचू शकता.

वांगे या पिकात पाटील बायोटेकच्या अमृत ड्रेंचींग कीटचा शेतकरी बांधव उत्तम उपयोग करून घेवू शकतात.

फुले आल्यावर फळे भरू लागले कि अमृत ड्रेंचींग किटचा उपयोग केल्याने मुळांच्या क्षेत्रात महत्वपूर्ण बदल होतात. सर्वप्रथम नत्राच्या सानिध्यात कॅल्शियमचा अपटेक होतो. फळे चांगली पोसली जातात. तोपर्यंत मुळांच्या शेजारील क्षेत्रात सल्फरचे सूक्ष्म दाणे विरघळून सल्फेट तयार होतात. मृदेचा सामू घटून ६.५ च्या आसपास जातो. याच दरम्यान, ह्युमॉल च्या प्रभावा मुळे,    मुलरोमांची संख्या वाढते. या दोघी घटनांचा एकत्रित परिणाम होऊन मृदेतील एन-पी-के, लोह व झिंक या घटकांचा अपटेक वाढतो. यामुळे संपूर्ण रोप चांगले पोसले जावून पुढील फुल धारणेस तयार होते. 

मार्केट मध्ये चांगला भाव मिळत असेल व पिकाचे आयुष्य वाढवून अधिक नफा मिळण्याची शक्यता असेल तर शेतकरी बांधव प्रत्येक फळ धारणेच्या वेळी अमृत ड्रेंचींग किटचा उपयोग करू शकतो. यामुळे तोड्यांची संख्या वाढत जाते. रोपाची ताकद टिकून रहाते. डौल कायम रहातो. 

लेखाच्या नावात "लोणच्याची मात्रा" असा उल्लेख आवर्जून केला आहे. या उल्लेखाचा उद्देश आपली दिशाभूल करण्याचा नाही तर आपले लक्ष वेधून घेण्याचा होता. पाटील बायोटेकच्या झकास या उत्पादनाला लोणच्याची उपमा दिली. झकास हे उत्पादन, नावा प्रमाणे झकास आहे. फुलांची संख्या वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. रोपांची शाखीय वाढ बेलगाम होण्या ऐवजी ती शक्ती फुल धारणे कडे वळवली जाते. यातूनच पुढे फळ धारणा वाढते. झकास चा उपयोग कमी प्रमाणात करावा लागतो. अगदी तसाच जसा आपण जेवणात लोणच्याचा करतो.

मित्रहो, पाटील बायोटेक तंत्रज्ञानात अशी अनेक रहस्य लपलेली आहेत. वेळोवेळी ती विशद करून देण्याचा प्रयत्न आमच्या लेखांमधून होत असतो. तेव्हा आपण आमचे लेख नियमित वाचत चला व इतर शेतकरी भावंडांशी याबद्दल चर्चा देखील करत जा. 

आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

---------------------

हा लेख आपणास कसा वाटला? हे कमेंट मध्ये अवश्य लिहा. लेख जास्तीत जास्त शेतकरी बांधवा सोबत शेअर करा. 

आपल्याला कोणत्या पिकाचे व्यवस्थापन शेड्यूल हवे आहे का? शेड्यूल मिळवा स्क्रीन वर दिसणाऱ्या बटणावर क्लिक करा.
Back to blog