Call 9923974222 for dealership.

कॅल्शियम बद्दल रहा जागरूक

चमत्कार दाखवल्या शिवाय लोक नमस्कार घालत नाहीत हे जीवनातील एक अधोरेखित सत्य आहे. पिकातील कॅल्शियम खताच्या च्या बाबतीत नेमके असेच होते. शेतकरी बांधव खत नियोजनात कॅल्शियम चा अंतर्भाव करीत नाहीत व कॅल्शियम च्या कमतरतेची लक्षणे दिसली कि "हा कुठला रोग आहे?" असा विचार करीत बसतात.

केळीतील कॅल्शीयम ची कमतरता

कॅल्शियम पुरेसे उपलब्ध असले कि वनस्पती पेशीभित्तिका मजबूत व जाड बनतात. पेशीमध्ये पेक्टिन व पॉलिसॅकराइड तयार होण्यासाठी कॅल्शियमची जरुरी असते. या घटकांमुळे पेशींना मजबुती येते, फूल व फळधारणाक्षमता वाढते,  उत्पादनाचे शेल्फ लाइफ अर्थात  अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता वाढते. उष्माघातविरोधी प्रथिनात कॅल्शियम महत्वाची भूमिका बजावते.  पेशी भित्तिका मजबूत असल्याने  बुरशीजन्य व जिवाणुजन्य रोगाविरुद्ध रोगप्रतिकारक क्षमता चांगली रहाते. अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या प्रथिनांच्या कार्यात कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे अन्नद्रव्यांचे मुळांद्वारा शोषण होऊन पिकांच्या प्रत्येक भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.

कॅल्शियमचा वापर भूसुधारकांमध्येही होतो. कॅल्शियमयुक्त खतांचा वापर जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी आणि मातीची जडणघडण चांगली राखण्यासाठी केला जातो.

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे -

  • शेंड्याकडील वाढ, कळ्या आणि मुळांची वाढ खुंटते.
  • वाढ खुंटते
  • पानांच्या कडा करपणे, पिवळे डाग पडणे, टोके जळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
  • फळ, फुले व टोकाकडील भागाचा आकार लहान होतो
  • फूल व फळांची गळती होते

पिकात कॅल्शिअम कमतरतेची लक्षणे दिसायची वाट पहात बसण्या ऐवजी पिकाच्या वाढीच्या पहिल्या टप्प्यात कॅलनेट चा वापर करावा. कॅलनेट-हे तांत्रिक दर्जाचे सर्वोकृष्ठ कॅल्शिअम नायट्रेट खत आहे. पाण्यात लगेच मिसळत असल्याने नत्र व कॅल्शिअम चा तत्पर पुरवठा करते. पिकात कॅल्शिअम परिवहन प्रणालीचा अभाव असतो त्यामुळे पिकाच्या वाढीच्या काळात लगेच लागू होणाऱ्या कॅल्शिअम खताची गरज असतेच.  कॅलनेटमध्ये कोणताच फिलर टाकलेला नाही, ते १०० टक्के शुद्ध आहे. सल्फेट, क्लोराईड व सोडियम मुक्त आहे. फॉस्फेट व् सल्फेट सोडून इतर सर्व विद्राव्य खतांसोबत द्यायला हरकत नाही. 

मित्रहो, हा लेख कसा वाटला हे कळवायला विसरू नका. पाटील बायोटेक तंत्रज्ञानात एकात्मिक अन्नद्रव्य (खत) व्यवस्थापनाचा विचार केला जातो. हे तंत्र अवगत करण्यासाठी आमचा फॉर्म नक्की भरा. 

 

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published