नत्र-स्पूरद-पालाश वर आधारित एन-पी-के खते कोणती आहेत हे आपण जाणतोच. पाटील बायोटेक ने मागील वर्षापासून अमृत गोल्ड एन-पी-के या नावाने हि विद्राव्य खत शृंखला आपल्यास सेवेत हजर केलेलीच आहे. हि खते दर्जेदार असून आवश्यकतेनुसार त्यांचा वापर फवारणी किंवा ठिबकने करता येतो. पिकाची गरज लक्षात घेवून शृंखलेतील योग्य खताची निवड करायची असते. जसे...
- किडी व रोगामुळे निस्तेज झालेल्या पिकाची सुधारणा करण्यासाठी अमृत गोल्ड एन-पी-के १९-१९-१९ व १३-४०-१३
-
खोड मजबूत करणे, रोगप्रतिकार क्षमता वाढवणे, फळे व भाज्यांचा रंग, चव व टिकवण क्षमता वाढवणे यासाठी अमृत गोल्ड एन-पी-के ००-००-५० व १३-००-४५
- जोरदार वाढीच्या सुरवातीच्या काळात जेव्हा पोटॅशीअम व फॉस्फेट ची पिकास जास्त भूक असते, तसेच फळे रसदार व गोड व्हावीत म्हणून फळांच्या वाढीच्या काळात अमृत गोल्ड एन-पी-के ००-५२-३४
-
पिकाच्या अगदी सुरवातीच्या काळात जेव्हा नत्र व फॉस्फेट ची पिकास गरज असते तेव्हा तसेच इतर कीटकनाशके व तणनाशकांसोबत अमृत गोल्ड एन-पी-के १२-६१-०० चा वापर करावा
आता मुद्दा सी एम एस खतांचा!
- सी म्हणजे "कॅल्शिअम"
- एम म्हणजे "मॅग्नेशिअम" व
- एस म्हणजे "सल्फर"
पाटील बायोटेक चे सी एम एस खते कोणती?
- कॅल्शिअम साठी "कॅलनेट"
- मॅग्नेशिअम साठी "ह्युमॅग" व
- सल्फर साठी "रीलीजर"
मित्रहो, आमची हि तिन्ही खते गेल्या अनेक वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहेत. हि खते दर्जेदार तर आहेत. कॅलनेट व ह्युमॅग पाण्यात पूर्णपणे विद्राव्य असून फवारणी, आळवणी तसेच ठिबक ने वापरता येतात. रीलीजर हे पाण्यात घुसळले जाते व घुसळलेल्या अवस्थेत फवारणी, आळवणी व ठिबक ने पिकास पुरवता येते.
कॅलनेट सल्फेट मुक्त आहे. याच्या वापरणे मालाचा दर्जा व टिकवण क्षमता वाढते. वनस्पतीत कॅल्शियम परिवहन प्रक्रियेसाठी प्रणाली नसते त्यामुळे वाढीच्या काळात कॅलनेट ने याची आपूर्ति करणे आवश्यक आहे. केलनेट मध्ये कॅल्शियम व नायट्रेट एक साथ असल्याने, नायट्रेट सोबत कॅल्शियम देखील लवकर शोषला जातो.
----------------------------------
ह्युमॅग पाण्यात पूर्ण पणे विरघळणारे मॅग्नेशिअम सल्फेट आहे. मॅग्नेशिअमच्या पुरवठ्यामुळे चय-अपचय प्रक्रियेतील विकर पूर्ण क्षमतेने कार्यरत रहातात. प्रकाशसंश्लेषण, नत्र स्थिरीकरण अश्या अत्यावश्यक जैविक प्रक्रिया सुरळीतपणे चालतात त्यामुळे पिकाची वाढ योग्य वेगाने होते.
रीलीजर, पाण्यात मिसळणारे मायक्रोनाइज्झड सल्फर आहे. हे एक खत तर आहेच शिवाय एक उत्तम दर्जाचे स्पर्शीय बुरशी नाशक व लाल कोळी नाशक देखील आहे. पाण्यात मिसळल्यावर काही तासातच याचे रुपांतर सल्फेट मध्ये होते ज्यामुळे मृदेचा पी एच संतुलित ठेवण्यास मदत मिळते. प्रकाशसंश्लेषणा त सल्फर चे महत्व असून, प्रथिन, एन्झाईम व व्हिटॅमीन के निर्मितीत याची महत्वाची भूमिका आहे. द्विदलवर्गीय पिकात हा मुळावरील गाठी बनवण्यास चालना देतो त्यामुळे नत्र स्थिरीकरणात मदत मिळते.
मित्रहो हि तिघी खते उत्तम भूसुधारक असून मिरची, वांगे, बटाटे, भुईमुग, कारले, दोडके, गिलके चवळी या पिकात ह्युमोल सोबत मिसळून आळवणी केल्याने उत्तम रिझल्ट मिळतात.