ग्लोबल दुधवाले!

ग्लोबल दुधवाले!

मित्रहो रोजच्या जीवनात दुधाचे फार महत्व आहे. मध्यमवर्गीय चौकोनी घरात रोज सरासरी २ लिटर दुध लागते. प्रत्यक्ष २ लिटर लागत नसले तरी दही, ताक, तूप, पनीर, क्रीम या अप्रत्यक्ष माध्यमातून दुधाचा खप होतच असतो. असे असले तरी हल्दीरामअमूलचितळे सारखे मोजके अपवाद वगळता दुध-डेअरीचा व्यवसाय खूप भरभराट करतांना दिसत नाही. गावो गावी अनेक तरुण व्यक्ती या व्यवसायात प्रयत्न करतांना दिसतात पण त्यांची उत्तरोत्तर प्रगती होतांना दिसत नाही. या ब्लॉग मध्ये जाणून घेवू दोन तरुणांनी यातून कसा मार्ग काढला आणि कसे ते बनले "ग्लोबल दुधवाले!"

----------------------


अमुलेचे हे चीज तुम्ही पहिले आहे का? फोटोवर क्लिक करून अधिक माहिती मिळवू शकता

--------------------------

घोळक्यात उठून दिसण्यासाठी वेगळेपण असावे लागते हे आपण जाणतोच. वेगळेपण म्हणजे अपवाद, प्रवाहाच्या विरोधात पोहायचा प्रयत्न! एडविक फूड हे "विरोधाभासातून प्रगती साधणाऱ्या ब्रांडचे" एक उत्तम उदाहरण आहे. 

उद्योग सूर करतांना त्यात एखादे नाविण्य असून चालणार नाही तर नाविण्यतेची साखळी असावी असा विचार श्रेय कुमार व हितेश राठी या मित्रांच्या मनात आला. तेव्हा त्यांनी उंटाच्या दुधाचा व्यवसाय करायचे असे ठरवले. खरतर उंटाच्या दुधाला बाजारपेठच नव्हती शिवाय कुणाला या दुधाचे महत्व देखील ठावूक नव्हते. हे दुध खारट असते, त्यास वास असतो अशा काही शंका देखील लोकांच्या मनात होत्या. शिवाय गाई-म्हशीचे दुध सर्वदूर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतांना "उंटाचे" दुध कोण पिणार? 

श्रेय कुमार व हितेश राठी हे चांगले सुशिक्षित तरुण. त्यांना विरोधाभास आणि अडचणी स्पष्ट दिसत होत्या. सभोवतालची प्रत्येक व्यक्ती त्यांच्या कानात "तुम्ही करू शकणार नाही" हे ओरडून ओरडून भिनवत होती. पण गाईच्या दुधातील लॅक्टोज नावाच्या शर्केरेमुळे अनेक लोकं गाईचे दुध पचवू शकत नाही. उंटाच्या दुधात हि समस्या निसर्गत: नसते. शिवाय या दुधात नैसर्गिक इन्सुलिन असल्याने मधुमेहींना फायदा होतो. उंटाच्या दुधात लोहाचे  व व्हिटामिन सी चे प्रमाण गाईच्या दुधातील प्रमाणाच्या तीन ते दहा पट असते. कॅल्शियम व प्रथिनाचे प्रमाण देखील अधिक असते. एकूणच शरीराच्या व उंचीच्या वाढीसाठी हे दुध चांगले आहे. वाढत्या वयातील मुले व गरोदर स्त्रियात, उंटाचे दुध पिल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढीस लागते व एलर्जी चे प्रमाण कमी होते. वर दिलेल्या जमेच्या बाजूंवर श्रेय कुमार व हितेश राठी यांनी आपले लक्ष केंद्रित केले.

राजस्थानातील उंट पालकांकडून त्यांनी दुध गोळा करायला सुरवात केली पण सुरवातीला दिवसाआड ते फक्त एखादा लिटर दुध विकू शकत होते. थांबायचे नाही, डगमगायचे नाही असे  त्यांनी मनोमन ठरवलेच होते...विविध फ्लेवर मध्ये दुध पावडर, चॉकलेट या खाद्य पदार्था व्यतिरिक्त त्यांनी अंगाचा साबण, फेसवाश, स्क्रब क्रीम, बॉडी बटर अशी सौदर्य प्रसाधने बनवायला सुरवात केली.

वितरण करते वेळी त्यांनी दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, मुंबई, हैद्राबाद, पंजाब येथील उच्च मध्यमवर्गीय ग्राहकांची आवडीची किराणामालाची दुकाने निवडली. शिवाय पूर्वेकडील राज्यात नावाजलेल्या व्ही-मार्ट, मध्य भारतातील डी-मार्ट, वेगाने वाढणारे रिलायन्स रिटेल अश्या रिटेल चेनच्या शेल्फ मध्ये त्यांनी जागा मिळवली. श्रेय कुमार व हितेश राठी, दोघेही ऑनलाईन पिढीतले तरूण मग ते ऑनलाईन ला कसे सोडणार? एमेझोन, फ्लिपकार्ट, ईबे या ऑनलाईन पोर्टलवर देखील त्यांनी  उत्पादने विक्रीस ठेवली आहेत इथे क्लिक करून आपण त्यांचे एमेझोन वरील स्टोअर बघू शकता. एव्हढे करून ते थांबलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील त्यांनी त्यांची उत्पादने उपलब्ध करून दिलेली आहेत. आज अमेरिका, मलेशिया व फिलीपिन्सला देखील या उत्पादनांना मागणी आहे!


सुरवातीला एक लिटर दुध खपवू न शकणाऱ्या या जोडगोळीला आता दररोज ५०० लिटर उंटाचे दुध लागते! यांच्या उद्योगाची एक महत्वाची खासियत अशी आहे कि त्यांनी पहिल्या दिवसापासून प्रत्येक व्यवहार नफ्यात केला. असे केल्याने ते दुध पुरवठा करणाऱ्या उंट मालकांना दुधाची चांगली  किंम्मत देवू शकले. सहाजिकच या पुरवठा दारांनी दुध उत्पादन वाढवण्यासाठी नवीन उंट घेतले व त्यांची अधिक चांगली निगा राखायला सुरवात केली! या व्यवहारिक सचोटीमुळे त्यांना कच्चा माल मिळायला अडचण यायची कोणतीही शक्यता नाही हे अगदी स्पष्ट आहे! 

मित्रहो हे वाचतांना आपल्याला हे जाणवले असेल कि या दोघांनी "उंटाचे दुध" हा एक नवीन कच्चा माल वापरला पण जी उत्पादने बनवली ती अगोदरच बाजारास सर्वज्ञात होती. समजा कुणी दुध पावडर घेणार असेल तर त्याला आता उंटाच्या दुधाची अधिक पोषक दुध पावडर मिळत होती! आपले आरोग्य चांगले करायचा, आयुष्य वाढवायचा, जीवन अधिक सुखकर बनवायचा एक नवा व उमदा पर्याय ग्उराहकांना उपलब्ध झाला! शिवाय दुध नाशवंत असते..पण दुधापासून जी उत्पादने बनवली गेली ती नाशवंत नाहीत. जास्त काळ टिकणार असल्याने...बाजारपेठेत पोहोचणे शक्य झाले. यालाच म्हणतात "एका दगडात दोन पक्षी!"

मित्रहो या दोघांनी आपला व्यवसाय चांगला पसरावा व कमीत कमी खर्चात लोकांपर्यत पोहोचता यावे म्हणून सोशल मिडियाचा खूप चांगला वापर केला. फेसबुक व गुगल जाहिरातीच्या माध्यमातून ते कमी खर्चात मोठ्या क्षेत्रफळातील मध्यमवर्गीय ग्राहकापर्यंत पोहोचले. उत्तम जाहिरात व्यवस्थापनातून त्यांनी लोकांच्या मनातील उंटाच्या दुधाबद्दलच्या कुशंका तर खोडून काढल्याच शिवाय त्यांच्या उत्पादनाबद्दल ओढही निर्माण केली. प्रिंट मिडिया, टीव्ही कमर्शियल, कागदी पोष्टर अश्या महागड्या व कुचकामी जाहिरातीत त्यांनी आपला पैसा व वेळ वाया जावू दिली नाही. 

-------

पाटील बायोटेक एग्रोब्लॉग

विविध लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा
--------

या सगळ्या खटाटोपिटून "एडविक" हा एक नवीन ब्रांड जन्माला आला आहे. हि एक मोठी उपलब्धी आहे हि बाब लक्षात घेवून उद्योजकांनी ब्रांड व्हॅल्यूचा फायदा उचलायला सुरवात केली. तवा गरम असेपर्यत पोळ्या शेकून घ्यायची कला "एडविक" च्या निर्मात्यांना चांगलीच अवगत आहे. त्यांनी उंटाच्या दुधासोबत आता बकरीच्या दुधावर आधारित उत्पादने बाजारात आणली आहेत. त्याची उलाढाल देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अर्थात एव्हढे  करून हि मंडळी थांबणार नाहीत हे नक्की. विचार करा..ज्या ग्राहकांच्या मनात "एडविक" ब्रांड कोरला गेला आहे त्यांना उद्या "एडविक"चे "सात्विक गाईचे तूप"  शेल्फमध्ये दिसले तर ते खरेदी करतील कि नाही? 

सरते शेवटी सबसे बडा रुपय्या. कोणताही व्यवसाय करायचा तर भांडवल लागते, भांडवलदार लागतो. आजच्या टेक-फायनान्स च्या जगात, विदेशातील व्याजदर तळाला असल्याने "कर्ज" सहज उपलब्ध आहे. "एडविक"चे हे चौथे वर्ष आहे व त्यांची वार्षिक उलाढाल साडेचार करोड झाली आहे. बाजारातील गुंतवणूकदारांच्या आर्थिक विश्लेषणानुसार "एडविक"ची वार्षिक उलाढाल पुढील पाच ते सहा वर्षात १०० कोटीचा आकडा पार करेल! मग "एडविक"ची गुंतवणूक किती? त्यांनी किती कर्ज घेतले? असा प्रश्न आपल्या मनात सहज येतो व या प्रश्नाचे उत्तर देखील धक्का देणारे आहे.  पदरमोड करून दोघांनी मिळून आजपर्यंत टप्या-टप्याने दहा लाख रुपये या व्यवसायात टाकले आहेत व कोणतेही कर्ज त्यांनी आजपर्यंत घेतलेले नाही! 

सहज आकडे मोड केली तर  "एडविकने" एकूण गुंतवणूकीच्या पंचेचाळीस पट वार्षिक उलाढाल चार वर्षात साधली आहे. आजही कर्ज घेण्याच्या विचारला त्यांनी फारशे प्राधान्य दिलेले नाही. 

वाचकांच्या मनात निर्माण होणारा प्रश्न असा आहे कि "एडविकने" प्रक्रिया उत्पादनासाठी लागणाऱ्या मशिनरीमध्ये किती भांडवल गुंतवले? 

दुध पावडर बनवायला स्प्रे ड्रायर व त्यासाठी लागणारे  तंत्रज्ञान, साबण बनवायला लागणारे तंत्रज्ञान व मशिनरी असे कितीतरी खर्च आहेत ज्यात मोठे भांडवल अडकून पडले असणार.खरी बाब अशी आहे कि यात एडवीक ने काडीमात्र खर्च केलेला नाही. श्रेय कुमार व हितेश राठी यांच्या नियोजना नुसार त्यांनी कच्चा मालाची खरेदी व उत्पादित मालाचे वितरण स्वत:कडे ठेवले.

उंट पाळणे, निघा राखणे, दुध काढणे, दुधावर प्रक्रिया करून अंतिम उत्पादने तयार करणे हि सर्व कामे त्यांनी इतरांकडून करून घेतली. असे केल्यामुळे त्यांचा भांडवली पैसा अडकला नाही शिवायकोणत्याही तांत्रिक अडचणी त्यांच्यासमोर उभ्या ठाकल्या नाहीत.  


मित्रहो जर तुम्ही कृषी-उद्योजकतेचा विचार करत असाल तर या लेखातून आपणास प्रेरणा नक्कीच मिळाली असणार! तुम्हाला काय वाटते हे मला सांगायला विसरू नका. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत नक्की मांडा.  

Back to blog