Call 9923974222 for dealership.

हरभरा पिकास झालय तरी काय?

मित्रहो या वर्षी हरभरा लागवड जवळपास दुप्पट झाली आहे त्यामुळे त्यास खूप चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा धरणे बाळबोध आहे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन येणे महत्वाचे आहे. एकरी जास्त उत्पादन आले तरच आपली कमाई होऊ शकेल हे एकमेव सत्य आहे.

खर तर बहुतेक शेतकरी बांधवांनी अगोदरचे पिक काढून घाईघाईने हरभरा लागवड केली आहे त्यामुळे मृदेची तयारी त्या दृष्टीने केली असण्याची शक्यता नाही. इतकेच काय तर घाटे अळी शिवाय दुसरा कुठला त्रास हरभऱ्यास होऊ शकतो हे शेतकऱ्याच्या गावी देखील नाही.  

सत्य मात्र थोडे वेगळे असू शकते. इतरही काही अशा समस्या आहेत ज्या एकरी उत्पादनात मोठी घट आणू शकतात. त्यासाठी या पिकाच्या गरजांचा विचार करणे आवश्यक आहे. 

जसे भाज्यांमध्ये "बटाटे" हि भाजी निर्विवाद पणे सगळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते त्याच प्रमाणे सामान्य माणूस "हरभरा" मोठ्या आवडीने, चवीने व मोठ्या प्रमाणात खातो. कारण हरभऱ्याची चव या वर्गातील इतर कोणत्याही पिका पेक्षा उत्तम आहे. या चवीचा मुख्य श्रोत यातील प्रथिनेच आहे. 

हरभरा दाण्यात चांगली चव निर्माण होण्यासाठी त्यात भरपूर प्रथिन निर्मिती होणे आवश्यक आहे. हरभऱ्याच्या जनुकीय ढाच्यातच हि व्यवस्था असली तरी त्यासाठी इतर पोषक घटक उपलब्ध असणे आवश्यक आहे. हरभऱ्याच्या बाबतीत, या पोषक घटकात झिंक (जस्त) या पोषण मूल्याचे महत्व सर्वाधिक आहे कारण प्रथिन निर्मितीत पिकास झिंक योग्य प्रमाणात लागते. पिकवाढीच्या कोणत्याही स्थितीत झिंक चे प्रमाण २० पी पी एम च्या खाली आले तर मोठा आघात होऊ शकतो.  शिवाय दाणे भरते वेळी त्यातहि मोठ्या प्रमाणात झिंकचा साठा होत असतो. कोरड्या एक टन दाण्यात ३५ ते ५५ ग्राम इतक्या मोठ्या प्रमाणात झिंक असते. 

पिकवाढीच्या काळात झिक ची कमतरता स्पष्ट दिसेल असे नाही. 

वरील फोटोत डावीकडील पानात झिक ची कमतरता आहे

जर कमतरता वाढली तर अश्या प्रकारे शेंडे जळतात

अति दुर्लक्ष झाले तर हि अवस्था निर्माण होते.

मृदेची तयारी करते वेळी, शेणखतासोबत, एकरी २५ किलो झिंक सल्फेट देण्याची शिफारस आहे. जर मृदेचा सामू सात ते आठ च्या दरम्यान असेल तर हि मात्रा देखील कमी पडू शकते अशा वेळी फवारणीतून झिंक दिले गेले पाहिजे. 

पिकवाढीच्या कुठल्याही टप्यात झिंक कमतरता होऊ नये, पिक हिरवे गार रहावे, चांगली फुले व घाटे यावीत यासाठी पाटील बायोटेकच्या "मायक्रोडील झिंक १२" ची शिफारस आहे. 

फवारणीसाठी :  "मायक्रोडील झिंक १२" १०० ग्राम प्रती २०० लिटर पाण्यात टाकून एका एकरावर फवारणी करावी

फेकून देण्यासाठी: ५००  ग्राम "मायक्रोडील झिंक १२" १० किलो मातीत एकजीव करून एक एकर क्षेत्रात फेकावे. (माती चांगली बारीक करून घ्यावी)

ठिबकसंचातून देण्यासाठी:  वाटर सोल्युबल खतासोबत एकरी ५०० ग्राम "मायक्रोडील झिंक १२" विरघळून द्यावे.

आपला खर्च कमीत कमी व्हावा यासाठी आपण ऑनलाइन खरेदी करू शकता. खाली एक उत्तम ऑफर देत आहे आपण लाभ घ्यावा. या ऑफर मध्ये आपले १७१ रु ची सरळ बचत होईल. ३९९ रुपयात दर्जेदार उत्पादन घरपोच (पोस्टाने) पाठवले जाते.  १६ डिसेंबर मध्यरात्री पासून पहिल्या २०० ऑर्डर सोबत पिवळे चिकट सापळे मोफत पाठवले जातील तेव्हा घाई करा!

 जर आपली "मायक्रोडील झिंक १२" ची गरज ५ किलो पेक्षा अधिक असेल तर आपण क्वोटेशन मागवून खूप चांगल्या दरात "मायक्रोडील झिंक १२" खरेदी करू शकता त्यासाठी इथे क्लिक करा. 

 

मित्रहो आमची पोस्ट फेसबुक व व्हाटसएप वर शेअर करायला विसरू नका. 

हरभऱ्यावरील यापूर्वीच्या व्हायरल पोस्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

6 comments

 • हारबरा माहीती

  संतोष भोजने
 • हरभरा पिवळा पडु राहिला उपाय सांगावा

  Umesh Sandu Tayade
 • Lay bhari

  vikas wagh
 • हरभरा पिकात मर रोग प्राथमिक अवस्था असताना 1kg ट्रायकोडर्मा 200kg चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळा. 3 दिवसां नंतर मरप्रादुर्भावित भागात याचा वापर करा किंवा ट्रायकोडर्मा आणि अन्य जैविक बुरशी नाशके असलेल्या औषधांचे ड्रेन्चिंग करा.

  जास्त तापमानामुळे आणि सिंचनाच्या आर्द्रतेमुळे पिकात मुळांजवळ बुरशीची शक्यता निर्माण होते. तेथेही अशा द्रावणाचे ड्रेन्चिंग उपयोगी पडेल.

  प्रादुर्भाव जास्त असेल तर (70% कॅप्टन + 5% हेक्झाकोनाझोल) “टाटा ताकत” 30 ग्रॅम/पम्प पेरणी नंतर 15 व 30 दिवसांनी आळवणी करा किंवा प्रोपेकनझोल 4 ml प्रति 10 लि पाण्यात मिसळून अलवणी केल्यास मर रोग आटोक्यात येऊ शकतो.

  इंटरनेट वरून
 • मर रोगावर उपाय सांगा

  Rameshwar Dawkhar

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published