तुमच्या मिरचीतही बोकड्या, घुबड्या, कोकडा येतो का?

मिरची एक महत्वपूर्ण व्यापारी पिक आहे. आपल्या देशात जितक्या भाषा बोलल्या जातात तितक्याच प्रकारच्या मिरच्या देखील उगवल्या व उपयोगात आणल्या जातात. एकूणच आपल्याकडील सर्व लहान मोठे शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात.

मोठे शेतकरी उत्तम बियाणे, दर्जेदार मशागत, तंत्रशुद्ध लागवड, ठिबक, पेपर मल्चिंग, तार बांधणी, क्रॉप कव्हर, नियोजित फवारण्या, नियोजित अळवण्या, तंत्रशुद्ध काढणी, बाजाराभिमुख मार्केटिंग व निर्यात असे सर्वसमावेशक नियोजन करतात.

मिरचीमध्ये वापरायचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचे शेड्युल आपण ऑनलाईन देखील मागवू शकता.

इतर अनेक शेतकरी पारंपारिक मार्ग निवडतात. सर्वसमावेशक नियोजनाच्या अभावाने त्यांना विविध स्तरावर जास्त धोक्याचा सामना करावा लागतो. यातील महत्वाचा धोका म्हणजे मिरचीतील व्हायरस ज्याला स्थळानुसार बोकड्या, घुबड्या किंवा कोकडा असे म्हटले जाते.

गेल्या दशकापासून मिरचीत व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सुरवातीच्या काळात व्हायरस पसरला तर ते पिक नष्ट करून आपण नुकसान थोपवू शकतो. पण जर तोडे सुरु व्हायच्या वेळेस व्हायरस जडला तर? अश्या वेळी मोठे नुकसान संभवते. बराच खर्च झालेला असतो व तो भरून निघणे कठीण होऊन बसते.

या लेखाच्या माध्यमातून आपण मिरचीचे तोडे सुरु झाल्यावर व्हायरस पसरला तर काय उपाय करावा हे बघू.

 • हा उपाय मिरचीतील पाटील बायोटेक तंत्रज्ञानावर आधारित आहे.
 • ज्यांनी या उपायातून यश मिळवले त्यांची उदाहरणे पुराव्या दाखल लेखाच्या शेवटी देत आहे
 • मिरचीतील व्हायरसवर रामबाण उपाय नाही, फक्त होणारे नुकसान थोपवण्यात यश येवू शकते

या तंत्रज्ञानाची वैशिठ्ये

 • मिरचीत पसरलेल्या व्हायरसचा लोड कमी करते
 • व्हायरसला पसरवणाऱ्या रसशोषक किडींचा लोड कमी करते
 • रसशोषक किडीने पसरवलेल्या बुरशीचा लोड कमी करते
 • अन्नद्रव्य संतुलन निर्माण करते
 • संसर्गामुळे पिकाच्या आरोग्याला झालेल्या हानीला बहुतांश भरून काढते
 • पिकाच्या रोग प्रतिकारशक्ती मध्ये वाढ करते
 • पिकाला नवीन जोम देते

तंत्रज्ञानाचे स्पष्टपणे दिसणारे फायदे

 • नव्या पानांवर तितकासा संसर्ग दिसत नाही
 • विक्रीयोग्य मिरचीचे भरगोस तोडे हाती येतात

तंत्रज्ञाना बद्दल खुलासा: पिकातील खराब झालीली पाने पूर्णपाने सुधारत नाहीत

तंत्रज्ञाना बद्दल इशारा: बाजारात मिरचीला भाव मिळणार असेल तरच तंत्रज्ञान वापरावे, अन्यथा पिक काढून टाकावे

तंत्रज्ञान

 • सर्व प्रथम जमीनित ओल आहे याची खात्री करून घ्यावी. नसेल तर पाणी देवून शेत ओले करून घ्यावे.
 • फवारणीचा डोस १५ लिटर पाण्यासाठी असून फवारणी करते वेळी पाने, फांद्या, खोड, परिसरातील तण संपुर्ण ओले होईल याची खबरदारी घ्यावी.
 • आळवणीचा डोस प्रती एकर असून, २०० लिटर पाण्यात १५ मिनिटे चांगले ढवळून विरघळून घ्यावे. ठिबक ने सोडा किंवा पंपाचे नोझल काढून पिकाच्या मुळाजवळ टाका
 • फवारणी व आळवणी एकाच दिवशी करा. त्यामध्ये १ दिवसापेक्षा जास्त अंतर ठेवू नका.
 • प्रयोगाचा उपयोग झाला आहे कि नाही हे कळण्यासाठी २-३ ओळी फवारणी व आळवणी न करता सोडून द्या

पहिली फवारणी

सिंघम ३०३ - ३० मिली, अरेना एक चॉकलेट, फोलिबीऑन ४० मिली , साफ पावडर ५० ग्राम, ब्लेझ सुपर- ५ मिली किंवा ब्लेझ-१५ मिली

पहिली आळवणी

१२-६१-०० ८ किलो , पोटॅशीयम शोनाईट ३ किलो, ह्युमोल गोल्ड १ किलो, फोलीबिऑन १ लिटर  

--------------------------

पाच ते सहा दिवसाच्या अंतराने

----------------------------------

दुसरी फवारणी

व्हर्टेक्स २० मिली , ऑक्सिजन ५० मिली , झकास ६ मिली , कोन्फीडॉर १० मिली, ब्लेझ १५ मिली किंवा ब्लेझ सुपर ५ मिली

दुसरी आळवणी

१२-६१-०० ८ किलो , पोटॅशीयम शोनाईट ३ किलो, अमृत ड्रेंचींग कीट १ किंवा ( ह्युमोल गोल्ड १ किलो, कॅलनेट १ किलो, रीलीजर १ किलो) ऑक्सिजन १ लिटर

नोट: तंत्रज्ञान वापरण्या पूर्वी, श्री. अमोल पाटील यांना पिकाचे व शेताचे विविध कोनातून काढलेले फोटो व्हाटसअप  करावे व त्यांचे मत जाणून घ्यावे. सरांचे मार्गदर्शन मोफत आहे.

यश मिळवलेल्यांची पुराव्या दाखल उदाहरणे:

शेतकरी श्री. नाना शंकर हिरे

 शेतकरी श्री. युवराज पवार

शेतकरी श्री. राहुल पटेल

 

  

ऑनलाईन ऑर्डर चे फायदे

   • मुख्य गोदामातून नवा स्टॉक पाठवण्यात येतो
   • ऑर्डर दोन दिवसाच्या आत कुरियर कडे पाठवली जाते
   • भारताच्या प्रत्येक गावात ऑर्डर पोहोचवली जाते
   • डिलिवरी मोफत आहे
   • आकर्षक ऑफर दिल्या जातात

आत्ता ऑर्डर करा.