
मिरचीतील बोकड्या किंवा कोकडा किंवा चुरडा-मुरडा या नावाने ओळखला जाणारा आजार शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान करतो आहे. एका प्रकारची हताशा दिसून येते आहे.
हा एक विषाणूजन्य रोग असून उडणाऱ्या रससोषक किंडीद्वारे पसरवला जातो. या किडींना वाहक (व्हेक्टर/व्हेईकल) म्हटले जाते. मिरचीतील पांढरी माशी व फुलकिडे विषाणूचे वाहक आहेत. विषाणूवर औषधे उपलब्ध नसल्याने वाहक किडींचे नियंत्रण केल्यास रोगाचा प्रसार थांबतो. पिकाचे पोषण संतुलित पद्धतीने केल्यास रोगग्रस्त पिकात सुधारणा होते.
वर मांडलेला मुद्दा समजायला सोपा असला तरी प्रत्यक्षात कृतीत आणायला कठीण आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी या विषयीचे आपले ज्ञान चोख ठेवणे आवश्यक आहे. ज्ञान चोख असल्यास योग्य वेळी योग्य कृती हाती घेवून कमी खर्चात हा रोग नियंत्रित होऊ शकेल.
सर्वप्रथम आपण ज्या नर्सरीतून रोपे आणतो आहे तिच्या विषयी चौकशी करा. जर अगोदरच्या बॅचेस सुरवातीच्या काळात रोगमुक्त रहात असतील तरच ती रोपे घ्या. आपली रोपे आपण स्वत: तयार करू शकता त्या करता आमचा या पूर्वी प्रसिद्ध झालेला लेख नक्की वाचा.
निवडक कंपन्यांचे प्रतिकारक्षम वाण उपलब्ध आहेत अर्थात हे काही प्रमाणातच प्रतिकार करू शकतात, संपूर्ण प्रतिबंध होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे.
नेट किंवा जुन्या साड्या वापरून रोपांचे शक्य तितके संरक्षण करा. चिकट सापळ्यांचा उपयोग करून वाहक किडींना नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. एकरी ३५ पिवळे व ३५ निळे चिकट सापळे वापरले तर किडीच्या प्रजननावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
नत्रयुक्त खते शक्य तितकी विभागून द्यायला हवी. युरिया सारखी एकल खते न देता अमृत गोल्ड १९-१९-१९, अमृत गोल्ड १२-६१-००, अमृत गोल्ड ००-५२-३४, अमृत गोल्ड ००-००-२३, अमृत प्लस आळवणी कीट व मायक्रोडील सुपर सिक्स हि खते दिल्याने खतांचे संतुलन होते. योग्य वेळी नेमकी खते मिळाल्याने पिकाचे चांगले पोषण होते. अन्नद्रव्याचे असंतुलन झाल्यास कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेण्यासाठी आपण इथे क्लिक करून आमचा या विषयावरील ब्लॉग वाचू शकता.
आत्ता ऑर्डर करा |
बाजारात उपलब्ध असणारया वाणात अगोदरच उच्च वृद्धी व पैदास क्षमता असते त्यामुळे पिकवाढीसाठी अवास्तव संप्रेरके देण्याऐवजी वर सांगलीतल्या प्रमाणे संतुलित खते देवून त्यासोबत पिकाची रोगप्रतिकार शक्ती जागृत ठेवणारे "अरेना चोकलेट" फवारणे अधिक समर्पक आहे. अरेना चॉकलेट मुळे लीग्नीफिकेशन वाढते. लीग्निफीकेशन मुळे पिकाचे पृष्ठभाग मऊ न रहाता थोडे कडक बनतात. रससोशणाऱ्या किडींचे जबडे हा कडकपणा सहन करू शकत नाही. किडींना रसशोषणात अडचण आल्याने त्यांचे पोषण व पर्यायाने प्रजनन कमी होते. यामुळे व्हायरसच्या प्रसारात अडथळे निर्माण होतात.
कीटकनाशकाची निवड हा एक मोठा व महत्वाचा भाग आहे. सगळीकडे सज्जनतेचा आव आणणारी मंडळी दिसत असली तरी डुप्लीकेट कीटकनाशके खुले आम विकली जात आहेत. बोटावर मोजण्याइतके शेतकरी या बाबत जागृत असतात. फार लिहिण्यात अर्थ नाही पण समझदार को इशारा काफी!
सुरवातीला सांगितल्या प्रमाणे या रोगाच्या नियंत्रणासाठी पांढरी माशी व फुलकिडे यांचे नियंत्रण करायचे आहे. त्यासाठी इथे केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने शिफारस केलेली कीटकनाशके देत आहे. लक्षात असू द्या कि या किडींच्या उच्च पैसास क्षमतेमुळे या किडीत कीटकनाशकाला प्रतिकार करायची क्षमता लवकर विकसित होते त्यामुळे कीटकनाशके आलटून प्रत्येक फवारणीच्या वेळी कीटकनाशक बदललावे.
पांढऱ्यामाशीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके
फेनप्रोपाथ्रीन ३० टक्के प्रवाही (मिओथ्रीन) ४ ते ७ मिली प्रती पंप (१५ लिटर). तोडा करण्याच्या सात दिवस अगोदर फवारणी थांबवावी
पायरीप्रोक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% प्रवाही (सुमीप्रेमप्ट) १ ते १.५ मिली प्रती लिटर. तोडा करण्याच्या सात दिवस अगोदर फवारणी थांबवावी
पायरीप्रोक्सीफेन १०% प्रवाही (दैता) १.५ मिली प्रती लिटर. तोडा करण्याच्या सात दिवस अगोदर फवारणी थांबवावी
फुलकिडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके
इमामेक्टीन बेन्झोएट १.५ % + फिप्रोनील ३.५ % एस सी (एपेक्स ५०) १ ते १.५ मिली प्रती लिटर. तोडा सूर करायच्या तीन दिवस अगोदर फवारणी करू नये. एकदा फवारणी केल्यावर ४८ तास पिकात फिरू नये.
फ्लूबेंडामाइड १९.९२ % + थायक्लोप्रीड १९.९२ % (बेल्ट एक्स्पर्ट) ६ - ७.५ मिली प्रती १५ लिटर. तोडा सुरु करायच्या ५ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.
इंडोक्झाकार्ब १४.५% + एसीटामीप्रीड ७.७ % एस सी (बाजीराव) १ मिली प्रती लिटर. तोडा सुरु करायच्या ५ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.
प्रोफेनोफोस ४०% + फेनप्रोक्झीमेट २.५ % इसी २ मिली प्रती लिटर तोडा सुरु करायच्या ७ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.
थायमेथोक्झाम १२.६ % + लॅम्डा-सीहालोथ्रीन ९.५ % झेड सी ४.५ मिली प्रती पंप (१५ लिटर) तोडा सुरु करायच्या ३ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.
स्पीनेटोराम ११.७ % एस सी (डेलीगेट) १ मिली प्रती लिटर तोडा सुरु करायच्या ७ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.
ॲसिटामेप्रिड २० एसपी (प्राईम गोल्ड, प्राईड, माणीक, लिफ्ट, रेकॉर्ड, शार्प, मुद्रा, पोलार, नाईज) १.५ ते ३ ग्राम प्रती लिटर, तोडा सूर करण्याच्या ३ दिवस अगोदर फवारणी थांबवावी.
इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी (बायोक्लेम, प्रोक्लेम, डेरिम, ओेलेक्स, हिलक्लेम, तत्काळ, सफारी) ६ प्रती पंप (१५ लिटर), तोडा सरू करण्याच्या ३ दिवस अगोदर फवारणी थांबवावी
मिरचीची रोपवाटिका कशी बनवाल?
कमी खर्चात मिरची, कापूस व सोयबीन मधील तंबाखू अळी चे नियंत्रण
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
