Call 9923974222 for dealership.

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरता म्हणजे मोठे नुकसान

अलीकडील काळात विकसित झालेल्या मिरची वाणात भरपूर फळधारण क्षमता असल्याने पिकाची अन्नद्रव्याची गरज देखील मोठी असते. पारंपारिक पद्धतीने, पिकाच्या अन्नद्रव्य गरजेचा विचार न करता, व्यवस्थापन केल्याने अन्नद्रव्य कमतरता निर्माण होऊन पिकाची नीट वाढ होत नाही. बाजार भावाच्या गरजेनुसार उत्पादन होत नाही. एकरी कमी उतारा बसल्याने मोठे आर्थिक व मानसिक नुकसान होऊ शकते.

चांगल्या उत्पन्नासाठी पिकास अन्नद्रव्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. पाटील बायोटेक ची अमृत गोल्ड खते, सी एम एस खते (कॅल्शियम, मॅग्नेशियम, रीलीजर), मायक्रोडील खते या कामी आपली मदत करतात.

मिरचीच्या उभ्या पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखावी हा प्रश्न आपल्यासमोर अनेकदा उभा रहातो. अनेक वेळेला ज्ञानाच्या अभावामुळे पिकावर व्हायरस, जीवाणू किंवा बुरशीजन्य रोग झाला आहे असा गैरसमज होऊन चुकीच्या फवारण्या होतात. 

शेतात फिरता फिरता काही लक्षणांचा अभ्यास करून कमतरतेची लक्षणे जाणून घेवून योग्य त्या अन्नद्रव्याचा पुरवठा करता येतो. प्रार्थमिक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास अमृत एन पी के खते फवारणी किंवा ठिबक ने देता येतील. जर दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास कॅल्शियमसाठी कॅलनेट, मॅग्नेशियम साठी ह्युमॅग न सल्फर साठी रीलीजर फवारणी किंवा ठिबक ने देता येईल. जर सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास मातीत मायक्रोडील ग्रेड १ मिसळावे व सोबत मायक्रोडील ग्रेड २ ची फवारणी करावी. 

प्रार्थमिक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे


नत्र: 

नत्राची कमतरता झाल्यास पिकाची वाढ खुंटत जाते. पाने खालच्या शिरांच्या बाजूने काठावर कोरडे पडायला लागतात. देठ खालच्या दिशेने पडतात. फुलांची व फळांची संख्या कमी होते. अनेक वेळेला फळे विकसितच होत नाही, किंवा झाले तर त्यांचा आकार वेडा वाकडा होतो.

स्पुरद:

मिरची पिकात स्पुरदाची कमतरता झाल्यास वाढ खुंटते. हात लावल्यास पाने कडव व कुचके होतात. फुले विकृत असतात. फुलांची संख्या कमी असते व चार पाच पैकी एखाच्येच फळ बनते. फळे देखील निट विकसित होत नाहीत, त्यात बियांची संख्या फार कमी असते. मुळांचा विकास देखील थांबतो. 

पालाश: 

पहिले खालच्या पानांवर पानांच्या शिरांमध्ये पिवळे डाग पडतात. ठिपक्याभोवतीचा भाग व शिरांचा रंग बदलत नाही. त्यानंतर हे ठिपके हलके होतात. फार थोड्या मिरच्या लागतात, त्यांची साईज देखील खूप छोटी असते.

दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे


मॅग्नेशियम:

पानाच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो पण शिरा हिरव्या रहातात. जुन्या पानांवर पहिले परिणाम होतो. कधी कधी पोटॅश जास्त झाल्यामुले देखील मॅग्नेशियम ची कमतरता होते. उष्ण वातावरणात देखील मॅग्नेशियम ची कमतरता दिसून येते.

गंधक: 

नवीन पालवी पिवळी पडते. पानांचा आकार छोटा होतो

कॅल्शियम:

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मिरची टोकावर सडते. उष्ण वातावरण, क्षारपड जमीन, पिकाची वेगवान वाढ व पाण्याची कमतरता यामुळे, मूळाकडून शोषले जाणारे कॅल्शियम कमी पडते व लक्षणे दिसतात. कॅलनेटच्या फवारणी ने ही अडचण दूर होते.

सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे

बोरान: बोरान च्या कमतरतेची लक्षणे अचानक दिसू लागतात.  खालची पाने आतल्या बाजुने वळतात/गुंढाळली जातात, वाढ खुंटते, खोड जाड पण ठेंगणे पडते. टोक गळून पडते, खालून वर पाने पिवळे पडू लागतात. फुलांची संख्या कमी असते व फळे देखील कमी बसतात. जर कमतरता तीव्र असली तर वाढणारी टोके मरतात व सडतात, पानांचा आकार बिघडतो.  मायक्रोडील बी २० ची फवारणी करावी. 

लोह:

लोहाची कमतरता वाढीच्या शेवटच्या टप्यात जाणवते. नवीन पालवी फिकट होऊन शिरांमधील भाग पिवळी पडतो. शिरा हिरव्या रहातात. मायक्रोडील एफ ई १२ ची फवारणी अतिशय प्रभावी आहे. यातील लोह पूर्णपणे चिलेटेड असल्याने लवकर लागू होते. 

क्लोराईड: पाने तांबूस पिवळे होऊन मरतात. मुळे खुरडतात व टोकाकडील भाग जाड होतो.

 

मॅंगनीज: वरील पानाच्या शिरांमधील भागावर पिवळे डाग पडतात

झिंक:

पाने अरुंद व छोटे होतात. मायक्रोडील झेड एन १२ ची फवारणी अतिशय प्रभावी आहे. यातील झिंक पूर्णपणे चिलेटेड असल्याने लवकर लागू होते

 

 --------------------------------------------------

शेतकरी बांधवाने नियमित बाळगावे असे पुस्तक, इथे क्लिक करून खरेदी करू शकता
 --------------------------------------------------


तांबे: शाखीय वाढीच्या शेवटच्या टप्प्यात तांब्याची कमतरता होते. पानाच्या कडा गुंढाळल्या जावून कोरड्या पडतात. पाने व फळे अरुंद होऊन चौकोनी बनतात.

मोलाब्द: पालवी फिक्कट पिवळी- हिरवी होते. वाढ थोडी खुंटते. मोलाब्दाची कमतरता बहुतेक वेळा आम्ल धर्मीय मृदेतच येते. 

जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

आपल्या मानत काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. त्यासाठी खाली व्हाटसएप ची लिंक दिली आहे.

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

16 comments

 • Malegaon, ta-bhokrdan dist-jalna
  Pin-431114

  Fakiraba Jamunde,-8208143264
 • Khup Chan information ahe. Very good.

  Prabhakar G Jagtap
 • Nice work

  Shubham pawar
 • छान माहिती दिली

  वसंत लगड
 • खूप छान माहिती दिली आहे.शेतकर्यानि हा लेख वाचून उत्पादन घेतले तर नक्कीच फायदा होईल. धन्यवाद सर..

  Ramesh Pathade

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published