मिरचीची रोपवाटिका कशी बनवाल?

मिरचीची रोपवाटिका कशी बनवाल?

शेतकऱ्याने स्वत: मिरची रोपवाटिका बनवण्याचे दोन महत्वाचे फायद्याचे आहेत:

  1. हव्या त्या जातीची व वेगवेगळ्या प्रकारचे बी वापरता येते. अर्थात असे करतांना रोपवाटिकेत बी च्या जातीचे बोर्ड लावावेत.
  2. रोपे निरोगी ठेवायची काळजी आपण घेतो, तयार रोपे खरेदी केली तर धोका होऊ शकतो. अनेक वेळेला नर्सरीतून आणलेल्या रोपातून शेतात नवीन रोग आल्याचा अनुभव येतो 

मिरचीची रोपवाटिका तयार करण्याचे ठिकाण थोडे उंचावर असावे जेणे करून पाणी साचून मर होणार नाही. झाडाची अथवा पत्री शेडची सावली वापरू नये. रोपवाटिकेच्या ठिकाणी सावलीच येणार नाही हे कटाक्षाने पाळावे. हरळी किंवा लव्हाळा असले तण असणारी जमीन रोपवाटिकेसाठी अजिबात निवडू नये. 

पाणीपुरवठ्याची सोय नसेल तर ती आधीच करून घ्यावी. गादी वाफ्यासाठी रोपवाटिकेच्या मृदेची खोल नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या देऊन माती भुसभुशीत करावी. जमिनीच्या उतारानुसार 3 x 1 मीटरचे गादी वाफे तयार करावेत. पेरणीपूर्वी प्रत्येक गादी वाफ्यात 30 ग्रॅम ब्लायटॉक्‍स, ३० ग्राम ह्युमोल गोल्ड, ३० ग्राम हुमणासूर व 12 किलो चांगले कुजलेले शेणखत एकत्र करून मिसळावे.

 --------------------------------------------------

शेतकरी बांधवाने नियमित बाळगावे असे पुस्तक, इथे क्लिक करून खरेदी करू शकता
 --------------------------------------------------

रोपे तयार करण्यासाठी एक किलो बियाणे प्रति हेक्‍टर पुरेसे होते. पेरणीपूर्वी तीन ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. दोन ओळींतील अंतर १० सें.मी. ठेवून, एक सें.मी. खोलीवर बियांची पातळ पेरणी करावी. बारीक मातीने बियाणे झाकावे. बियाण्याची उगवण होईपर्यंत आच्छादनाने झाकावे. सकाळी व सायंकाळी, झारीने पाणी द्यावे. त्यानंतर वातावरणानुसार  पाटाने पाणी द्यावे. बारा दिवसांनी दोन ओळींमध्ये एक सें.मी. खोलीपर्यंत खुरप्याने नाली पाडून प्रत्येक वाफ्यास २५ ते ३० ग्रॅम फोरेट पेरून लगेच पाणी द्यावे.

पेरणीनंतर 30 दिवसांनी, प्रत्येक वाफ्यात १० ग्राम युरिया व १० ग्राम दाणेदार कॅलनेट एकत्र करून दोन ओळीत नाली पाडून  द्यावे. लगेच मातीने झाकावे. कॅलनेट मुळे रोपे वेगाने वाढतील तसेच कणखर देखील होतील. 

फुलकिडी व करपा रोगापासून रोपांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी १२  मिली नुवाक्रॉन अधिक 25 ग्रॅम डायथेन किंवा एम - 45 प्रति प्रती पंप फवारावे. दर दहा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात. साधारणपणे चार ते पाच आठवड्यांत रोपे तयार होतात. रोपांची उंची जास्त झाल्यास पुनर्लागणीच्या अगोदर शेंडे कापावेत जेणे करून फांद्याचा विकास होईल. 

 

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

Back to blog