मिरचीतील नफ्याचे गणित आजच समजावून घ्या

मिरचीला वर्षभर बाजारपेठ उपलब्ध आहे त्यामुळे लागवड वर्षभर करता येते. खरिप हंगामासाठी मे - जूनमध्ये रोपे तयार करून त्यांची जून - जुलैमध्ये पुनर्लागण करतात, तर रब्बी हंगामासाठी सप्टेंबर - ऑक्‍टोबरमध्ये रोपे तयार करून ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये पुनर्लागण होते. उन्हाळी हंगामासाठी डिसेंबरमध्ये रोपे तयार करून त्यांची जानेवारी - फेब्रुवारीमध्ये पुनर्लागण केली कि मार्च-एप्रिल-मे असे तोडे मिळतात. 

असे असूनही हिरवी मिरची, लाल मिरची, बियाणे निर्मिती अशी वैविध्य पूर्ण  लक्ष ठेवून, नियोजनबद्ध आखणी करून भरपूर नफा कमवणारे शेतकरी मोजकेच आहेत

 --------------------------------------------------

शेतकरी बांधवाने नियमित बाळगावे असे पुस्तक, इथे क्लिक करून खरेदी करू शकता
 --------------------------------------------------

फुल किडे, कोळी, मावा, खोड कुरतडणारी अळी अशा किडींचा उपद्रव तसेच करपा, सडकि फळे, बोकड्या, विषाणू रोग, मर, मुळकुजव्या इ. रोगांचे  प्रादुर्भाव या मुळे खर्चात मोठी वाढ होते. वाढणाऱ्या खर्चामुळे अनेक शेतकरी नफ्याचे गणित बसवू शकत नाहीत.

 

भूसुधार, योग्य बियाण्याची निवड, तंत्रशुद्ध रोप निर्मिती, काळजीपूर्वक पुनर्लागवड, संतुलित खत मात्रा,  विविध किडींचा अभ्यास व आर्थिकदृष्ट्या धोकेदायक किडींचे योग्य पद्धतीने दमन, पिकाच्या रोग प्रतिकारशक्तीत वाढ करून विषाणू जन्य रोगाचे व्यवस्थापन, मिश्र सूक्ष्मअन्नद्रव्याचे मातीतून, ठिबक द्वारे व फवारणीतून व्यवस्थापन अशा बहुआयामी कार्यक्रमातून मिरचीचा खर्च नियंत्रणात ठेवता येतो व उत्पन्न अनेक पटीने वाढवता येते.

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.