"क्लोरानट्रानिप्लोर" युक्त कीटकनाशके व त्यांच्या शिफारसी
क्लोरानट्रानिप्लोर या घटकाचे दुसरे नाव रीनाक्सपीर असे असून हे ड्यूपोंट या कंपनीचे उत्पादन आहे. हे कीटक वर्गासाठी खूप घातक असले तर सस्तन प्राण्यावर याचे परिणाम होत नसल्याने अलीकडील काळात याच्या वापराचे प्रमाण खूप वाढले आहे. कीटकांच्या स्नायूंवर याचा परिणाम होतो व ते निकामी होतात. सुरवातीला जबड्याचे स्नायू निष्क्रिय होतात व पाठोपाठ किडीस लखवा होतो.
आज पर्यंत केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने क्लोरानट्रानिप्लोरच्या पाच कीटकनाशकांना मंजुरी दिली असून इथे त्यांच्या शिफारसी कोणकोणत्या आहेत हे जाणून घेवू.
क्लोरानट्रानिप्लोर १८.५ एस सी
- भात पिकात खोड पोखरणारी व पाने दुमडणारी कीड नियंत्रण करण्यासाठी 4.5 मिली प्रती १५ लिटर या दराने काढणीच्या ४७ दिवस अगोदर पर्यंत वापरावे
- कोबीतील चौकोनि ठिपक्याचा पतंग नियंत्रणासाठी १.५ मिली प्रती लिटर दराने काढणीच्या ३ दिवस अगोदर पर्यंत वापरावे
- कापूस पिकातील बोंडअळ्या नियंत्रण करण्यासाठी 4.5 मिली प्रती १५ लिटर या दराने काढणीच्या ९ दिवस अगोदर पर्यंत वापरावे
- टोमेटो पोखरणारी अळी नियंत्रणासाठी 4.5 मिली प्रती १५ लिटर या दराने काढणीच्या ३ दिवस अगोदर पर्यंत वापरावे
- उसातील वाळवी नियंत्रणासाठी ७.५ ते ९ मिली प्रती लिटर दराने तोडणीच्या ६ महिने अगोदरपर्यंत वापरावे
- उसातील शेंडा व खोड किडीच्या नियंत्रणासाठी ५ ते ५.५ मिली प्रती लिटर दराने तोडणीच्या ६ महिने अगोदरपर्यंत वापरावे
- वान्ग्यातील खोड व फळ पोखरणारी कीड नियंत्रणासाठी ४-६ मिली प्रती १५ लिटर या दराने काढणीच्या २२ दिवस अगोदर पर्यंत वापरावे
- तुरीतील शेंगा पोखरणारी कीड नियंत्रणासाठी 3 ते ४.५ मिली प्रती १५ लिटर या दराने काढणीच्या २९ दिवस अगोदर पर्यंत वापरावे
- सोयबीन मधील चक्रीभुंग, खोडकीड व हिरवीअळी नियंत्रणासाठी ४-६ मिली प्रती १५ लिटर या दराने काढणीच्या २२ दिवस अगोदर पर्यंत वापरावे
- हरभऱ्यातील घाटेअळी नियंत्रणासाठी ४ मिली प्रती १५ लिटर या दराने काढणीच्या ११ दिवस अगोदर पर्यंत वापरावे
- उडीद मध्ये येणाऱ्या शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी ३ मिली प्रती १५ लिटर या दराने काढणीच्या २० दिवस अगोदर पर्यंत वापरावे
- कारले पोखरणारी अळी नियंत्रित करण्यसाठी ३-४ मिली प्रती १५ लिटर या दराने काढणीच्या ७ दिवस अगोदर पर्यंत वापरावे
- भेंडी पोखरणारी अळी नियंत्रित करण्यसाठी ४ मिली प्रती १५ लिटर या दराने काढणीच्या ५ दिवस अगोदर पर्यंत वापरावे
क्लोरानट्रानिप्लोर ९.३ % +लाम्डा सीहालोथ्रीन ४.६% झेड सी (एम्प्लीगो)
- तुरीतील शेंगा पोखरणारी कीड नियंत्रणासाठी ६ मिली प्रती १५ लिटर या दराने काढणीच्या १८ दिवस अगोदर पर्यंत वापरावे
- कापूस पिकातील बोंडअळ्या नियंत्रण करण्यासाठी ७.५ मिली प्रती १५ लिटर या दराने काढणीच्या २० दिवस अगोदर पर्यंत वापरावे
क्लोरानट्रानिप्लोर ८.८ % +थायमेथोक्झाम १७.५ % एससी
टोमेटो पोखरणारी अळी तसेच याच पिकातील लीफमायनर (नागअळी), पांढरी माशी नियंत्रणासाठी, रोपे लावल्यावर ८ते१० दिवसांनी, १५० ग्राम औषध ५०० लिटर पाण्यात मिसळून, प्रत्येक रोपास ५० ते १०० मिली आळवणी करावी. हा उपाय आपण फळे काढणीस ३६ दिवस शिल्लक असे पर्यत वापरू शकता.
खाली स्क्रोल करून शेतीविषयक आमचे विविध लेख नक्की वाचा. आपण आमची उत्पादने देखील ऑनलाईन खरेदी करू शकता.
क्लोरानट्रानिप्लोर ०.५ % +थायमेथोक्झाम १.० % जीआर
भातातील खोडकीड, पाने दुमडणारी कीड, तपकिरी व हिरवे तुडतुडे या किडी नियंत्रणासाठी हेक्टरी ६ किलो लागवड झाली कि सुरवातीच्या काळात वापरावे. शेवटचे ६० दिवस वापरायचे नाही
क्लोरानट्रानिप्लोर ०.४% जी आर (एनफ्युज, फेरटेरा)
- भातातील पिवळी खोड कीड व पाने दुमडणारी कीड नियंत्रण करण्यासाठी हेक्टरी १० किलो दराने मातीत मिसळावी. हि प्रक्रिया सुरवातीच्याच काळात करावी. शेवटच्या दोन महिन्यात हे कीटकनाशक वापरू नये
- उसातील खोड व शेंडे कीड नियंत्रण करण्यासाठी हेक्टरी १८.७५ किलो दराने मातीत मिसळावी. हि प्रक्रिया सुरवातीच्याच काळात करावी. शेवटच्या दोन महिन्यात हे कीटकनाशक वापरू नये
Agree information