कापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण

कापसातील सुतकृमिवर मिळवा नियंत्रण

जवळपास सर्वच पिकांना त्रासदायक ठरणारे सुतकृमी कापसात देखील मोठे नुकसान करतात. कापसाचे झाड सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे पिवळे पडून कोमेजते. प्रादुर्भाव ग्रस्त शेतात पिवळे पद्लेलेल्या झाडांचे पट्टे दिसून येतात. अशा झाडांची मुळे तपासली असता, लहान मुळ्यांचे प्रमाण अत्यल्प असते व त्यावर वेगळ्या करता येणार नाहीत अश्या गाठी असतात.

कापसाच्या क्षेत्रात १९ प्रकारचे सूत्रकृमी आढळून येतात व यातील ३ ते ४ प्रजाती कापसाचे नुकसान करू शकतात. सुमारे १५-२५ टक्के उत्पादनात घट येते. आलेल्या उत्पादनात लिंटची टक्केवारी व धाग्याची लांबी कमी असते.  

 

 सूत्रकृमींना सामान्यपणे गोलाकार जंत असे म्हटले जाते. त्यांचा दंडगोलाकार व दोन्ही बाजूला निमूळता असून, शरीराचे भाग पडत नाहीत. सूत्रकृमींचे विविध प्रकार असून, माणूस, प्राणी, वनस्पती व कीटक यांनाही ते हानी पोचवतात. काही सूत्रकृमी हे जीवाणू व बुरशीवर, तर काही सूत्रकृमी दुसऱ्या सूत्रकृमींना खाऊन जगतात. बहुतेक वनस्पती परजीवी सूत्रकृमी २ मि.मी. पेक्षा लहान असून, डोळ्यांना सहज दिसत नाहीत. सूक्ष्मदर्शकांखाली पाहिल्यास गांडुळासारखे दिसतात. त्यांच्या हालचाली नागमोडी असतात. 

 

 कापसातील सूत्रकृमींचे नियंत्रण करण्यासाठी - 

  1. जमिनीची उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी व उन्हात तापू द्यावी. १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा पुनर नांगरणी करावी.
  2. पिकांची योग्य फेरपालट करावी. 
  3. तण नियंत्रण कसोशीने करावे.
  4. जमिनीत सेंद्रिय खते देतांना त्यात एकरी ३ किलो च्या हिशोबाने हुमणासूर  मिसळावे.

तुमच्या कापसात सुतकृमिंची लागण आहे का? जर वर दिल्याप्रमाणे काही लक्षणे दिसत असतील तर एकरी ३ किलो हुमणासुर वापरावे.

हुमणासुर विषयी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

     

    Back to blog