कापूस नियोजनाच्या या तिसऱ्या व शेवटच्या भागात ४० दिवसा नंतर चे नियोजन देत आहे.
जर आपण या पूर्वी आपल्या शेतात यलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप लावले नसतील तर आता आवर्जून लावून घ्या. पाटील बायोटेक चे यलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप दर्जेदार आहेत उन-वारा-पावसाचा यावर परिणाम होत नाही. येणाऱ्या किडीची वर्दी मिळते व त्यानुसार कीटकनाशक निवडता येते. अनावश्यक, अवाजवी फवारण्या कमी होतात.
या काळात कापसाचे पिक परिपक्व होणार असल्याने, होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्यायचे आहे. वाढीच्या वेगवेगळ्या टप्यात येणारे रोग व किडी हे देखील वेगवेगळे असतात, त्यानुसार बदल करणे आवश्यक असते. आद्रता, ढगाळ वातावरण, वाफस्याचा आभाव यामुळे बुरशीजन्य रोगांची निर्मिती होऊ शकते. अश्या वेळी लागवडीनंतर ४०-६० दिवसांनी रोपे मरण्याचे प्रमाण दिसत असेल तर प्रती पंप आळवणी करावी. स्पर्शजन्य व अन्तरप्रवाही बुरशीनाशकांचा एकत्र वापर उपयुक्त आहे.
- एम-४५ ५० ग्रॅम
- डॉक्टर प्लस ५० ग्रॅम
- ह्युमॉल जेली १०० ग्रॅम
- ऑक्सिजन ५० मिली
- १३:००:४५ १०० ग्रॅम
- डॉक्टर प्लस ५० ग्रॅम
- ब्लेझ १५ मिली
- खुराक २० मिली
लागवडीनंतर ६५ दिवसांनी प्रती एकर आळवणी खाली दिल्या प्रमाणे करावी. यातून पिकास शक्ती प्राप्त होईल.
- अमृत कीट १ नग
- ००:५२:३४ ५ किलो
- ह्युमॉल गोल्ड १ किलो
- ह्युमॅग ५ किलो
टीप : संपूर्ण झाडाला संरक्षनात्मक कवच देण्यासाठी व निरोगी वाढ होण्यासाठी – ब्रम्हास्त्र - ६० मिली प्रती पंप फवारणी करावी
लागवडीनंतर ७०-९० दिवसांनी ह्युमॅग दिल्याने मेग्नेशियम ची कमतरता टाळता येईल.
- ह्युमॅग २५ किलो ड्रीप ने सोडणे / ड्रीप नसल्यास शेतात फेकून देणे
लागवडीनंतर ७०-७५ दिवसांनी प्रती पंप फवारणी करावी यामुळे कीटक नियंत्रणात रहातील व आर्थिक हानी टाळता येईल
- मोनोटेक ५० मिली
- झक्कास ७ मिली
- सिंघम २५ मिली
- ब्लेझ १५ मिली
लागवडीनंतर ९०-११० दिवसांनी (पांढरी माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास) प्रती पंप फवारणी करावी
- पोलो / स्टिक / पेजर १५ ग्रॅम
- अॅसीटमाप्रिड १५ ग्रॅम
- ऑक्सिजन ५० मिली
- झक्कास / आर्चर ७ मिली/ १५ मिली
(वरील सर्व शिफारसी कंपनी प्रक्षेत्रावर घेतलेल्या चाचण्यांवर आधारित असून कंपनी कुठल्याही उत्पादनाची हमी घेत नाही.)