कापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे

हाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात, एव्हडच काय प्रत्येक माणसाचा दृष्टीकोन कालानुरूप बदलतो. उद्याचा अंदाज घेवून नियोजनबद्ध शेती करणारे यशस्वी शेतकरी अगदी बोटावर मोजण्या इतकेच आहेत. वातावरण, बाजारभाव, राजकीय परिस्थिती अत्यंत लहरी आहे व या गोष्टींचा परिणाम शेतकऱ्याच्या नफ्यावर सर्वाधिक होतो, हे गृहीत धरून जे नियोजन केले जाते, ते यशस्वी झाल्याशिवाय रहात नाही.

फक्त नियोजन करून भागत नाही तर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. एखादे नियोजन बाडगळले तर पर्यायी नियोजन तयार ठेवावे लागते. सर्वाना हे जमत नाही त्यामुळे सर्वत्र नकारात्मकता पसरते.

पाटील बायोटेक तंत्रज्ञान म्हणजे फक्त खत व फवारणी चे नियोजन नाही, खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यासाठी बनवलेली एक विचार-आचार श्रुंखला आहे. पिकाची गरज व वातावरणातील बदल या नुसार नियोजन बदलते. जो शेतकरी जागृत राहून तंत्रज्ञानाचे नीट आकलन व अंमलबजावणी करतो त्याला फायदा होतोच.  

 

--------------------------------
-------------------------------

 

येत्या हंगामाची तयारी करायला हवी. शेताच्या एका भागात कापूस घ्यावा. जमिनी नुसार एकरी सत्तर ह्र्जार ते दीड लाखाच्या उत्पन्नाचे टार्गेट ठेवून, मृदेतील कर्बाचे पुनर्भरण व भू-सुधार, दोन किंवा तीन प्रकारचे बियाणे, प्रार्थमिक, दुय्यम व सूक्ष्म खतांचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन, कीट-निरीक्षण व नियमन, रोगप्रतिकारशक्ती चा विकास तसेच फुल व फळधारणे साठीची फवारणी, मेहनत-मजुरी इत्यादी बाबी लक्षात घेवून खर्चाचे बजेट आखायला हवे. जर वातावरण पोषक नसेल तर पर्यायी नियोजना चा संकल्प हवा. 

मित्रहो, या संपूर्ण प्रवासात पाटील बायोटेक आपल्या सोबत आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञान कापसात एकरी तीस क्विंटल चे लक्ष ठेवते. वाण, मृदेची स्थिती, पर्जन्यमान, वातावरणातील बदल या नुसार वेळोवेळी योग्य बदल करून लक्ष गाठायचा आमचा प्रत्यत्न असतो. 

  

कापसात पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

----------------------
---------------------