कापसातील खर्चाचे गणित

कापसातील खर्चाचे गणित

कापसात एकरी खर्च साधारण ३० ते ४० हजार होतो, हा खर्च निघण्यासाठी उत्पादनातील ६ ते ८ क्विंटल कापूस कामी येतो.  जर आपण उत्पादन वाढवून खर्च कमी करू शकलो तरच नफ्याचे प्रमाण वाढवता येईल हे नक्की. 

खर्चात साधारणपणे सिंचन, बियाणे, मृदा सुधारक, रासायनिक खते, कीटक नाशके व मजुरी (नांगरणी वखरणी, लागवड, खते देणे, फवारणी करणे, निंदणी - कोळपणी, व वेचणी करणे) यांचा समावेश असतो.

सिंचन खर्च कमी करण्यासाठी चांगल्या दर्जाचे ठिबक वापरावे जेणे करून घसारा कमी बसेल व एकरी घसारा ५००० रु च्या आत राहील

एकरी मजुरी चा खर्च १५ ते १७ हजार येतो, येथे बचत करणे अत्यावश्यक आहे. शक्य तिथे सामुहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून यंत्र वापरावे म्हणजे मजुरी कमी लागेल. वेचायला सोपे जाणारे वाण निवडल्याने क्विंटल मागे दोनशे रुपया पर्यंत मजुरीत बचत शक्य आहे. घरच्यांनी मदत केली तर यात भरगोस बचत शक्य आहे. 

मृदेचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्याची प्रकिया हंगामी नसून वर्षानुवर्षे करायची असते. यासाठी प्रत्येकाने बहुवार्षिक नियोजनबद्ध आखणी केली तर  हंगामी खर्च कमी होतो.

बियाण्याच्या खर्चात बचत शक्य नाही पण जोखीम कमी केली जावू शकते. जोखीम कमी करण्यासाठी भूल थापांना बळी न पडता, नावाजलेल्या कंपन्यांचे बियाणे वापरावे, पक्के बिल घ्यावे, एका पेक्षा अधिक प्रकारचे वाण वापरावे. 

ठिबक व फवारणी तून खतांचे व्यवस्थापन केल्याने मात्रेत बचत होऊन खर्चात बचत शक्य आहे. रसायनिक खतांवरचा खर्च कमी करण्यापेक्षा, संतुलित खतांच्या वापरावर भर देणे आवश्यक आहे. एन-पी-के सोबतच कॅल्शियम, मेग्नेशियम, सल्फर या दुय्यम खतांचा तसेच, लोह, मंगल, जस्त, तांबे, मोलाब्द व बोरान च्या मिश्र खतांचा योग्य प्रमाणात वापर केला जायला हवा. संतुलित खत मात्रेतून पिकांचे पोषण चांगले होते व ते रोग व किडींना सहजा-सहजी बळी पडत नाहीत. 

कीटक नियंत्रणाचा खर्च कापसात मोठ्या प्रमाणात होतो. हा खर्च कमी करण्या साठी वर दिल्याप्रमाणे संतुलीत खत मात्रा वापरावी; पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा, पिंक्याचा वापर  करावा, अरेनाच्या फवारणीतून कापसाची रोग-कीड प्रतिकार क्षमता वाढवता येते. 

कापूस कीडनियंत्रणासाठी बनवा परफेक्ट प्लान! हा ब्लॉग नक्की वाचा

 

 


खर्च कमी करतांना, एकूण जोखीम कमी करणे हि महत्वाची बाब आहे. एकूण जोखीम कमी करण्यासाठी कापूस+सोयाबीन/मुग/उडीद/तूर अशी अंतरपीक पद्धती वापरावी. कापसाचे एका पेक्षा अधिक वाण वापरतांना बागायती व कोरडवाहू, कमी कालावधीचे  व उशिरापर्यंत चालणारे अश्या वाणांच्या जोड्यांची निवड करावी. पिक विम्याचा सहारा घ्यावा. 

कापसातील पाटील बायोटेक तंत्रज्ञान ३० क्विंटल प्रती एकरचे लक्ष ठेवून आखले जाते, आपण कमीत कमी एक एकर क्षेत्रासाठी आमचे  तंत्रज्ञान वापरावे.

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

Back to blog