कापूस कीडनियंत्रणासाठी १४ मिश्र कीटकनाशके
हा लेख अपडेट करण्यात आलेला असून तो लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा
उत्तम कीड नियंत्रणासाठी अचूक निरीक्षण फार महत्वाचे आहे. शेतीपरिसरातील बोंडअळीचे पतंग व रससोशक किडीच्या प्रसारावर बारीक लक्ष ठेवले तर कमी खर्चात प्रभावी कीड नियंत्रण करता येते. असे केल्याने लागवडीवरील एकूण खर्च कमी तर होतोच शिवाय पिकाची गुणवत्ता टिकून राहते - हंगाम चांगला येवून जास्त नफा जमा होतो. आपण यासाठी पाटील बायोटेक चे चिकट सापळे व गुलाबी बोंड अळी चे "पिंक्या सापळे" वापरू शकता.
कापूस कीडनियंत्रणासाठी १४ मिश्र कीटकनाशके
Acephate 50% + Bifenthrin 10 % WDG हे मिश्र कीटकनाशक तुडतुडे, फुलकिडे व बोंडअळी साठी १ ते १.५ ग्राम प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी २० दिवस वापर टाळावा.
Acephate 25% w/w + Fenvalerate 3% w/w EC हे मिश्र कीटकनाशक रससोशक किडी व बोंडअळी नियंत्रणासाठी ४ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी १५ दिवस वापर टाळावा.
Acephate 50% + Imidacloprid 1.8% SP हे मिश्र कीटकनाशक मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी व बोंडअळी साठी २ ग्राम प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी ४० दिवस वापर टाळावा.
Acetamiprid 1.1% + Cypermethrin 5.5% EC हे मिश्र कीटकनाशक मावा, तुडतुडे व, फुलकिडे साठी १ ते २.५ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी ३० दिवस वापर टाळावा.
Cypermethrin 10% + Indoxacarb 10% w/w SC हे मिश्र कीटकनाशक तुडतुडे, फुलकिडे व बोंडअळी साठी ०.५ ते १.२५ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी ७ दिवस वापर टाळावा.
Cypermethrin 3% + Quinalphos 20% EC हे मिश्र कीटकनाशक बोंडअळी साठी २ ते २.५ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी १५ दिवस वापर टाळावा.
Chlorpyrifos 50% + Cypermethrin 5%EC हे मिश्र कीटकनाशक बोंडअळीच्या सर्व प्रकारासाठी तसेच मावा, फुलकिडे, तुडतुडे व पांढरी माशी साठी १ ते २ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी १५ दिवस वापर टाळावा.
Chlorpyriphos 16% + Alphacypermethrin 1% हे मिश्र कीटकनाशक ठिपकेदार व गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ३ ते ५ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी १५ दिवस वापर टाळावा.
Deltamethrin 1% + Trizophos 35%EC हे मिश्र कीटकनाशक पांढरी माशी व सर्व प्रकारच्या बोंडअळीच्या नियंत्रणासाठी २ ते २.५ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी २१ दिवस वापर टाळावा.
Ethion 40% + Cypermethrin 5% w/w EC हे मिश्र कीटकनाशक अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी २ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी १५ दिवस वापर टाळावा.
Fipronil 4% + Acetamiprid 4% W/W हे मिश्र कीटकनाशक मावा व तुडतुडे नियंत्रणासाठी २ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी ३० दिवस वापर टाळावा.

Thiamethoxam 12.6%+Lambda cyhalothrin 9.5%ZC हे मिश्र कीटकनाशक मावा, फुलकिडे, तुडतूडे व बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ०.४ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी २६ दिवस वापर टाळावा.
नोट: वरील १४ कीटकनाशके सेन्ट्रल इंसेक्टीसाइड बोर्डाने शिफारस केलेले आहेत. एका वेळी एकच कीटकनाशक वापरा. फवारणी करते वेळी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक काळजी घ्या. वेळेपेक्षा जीव महत्वाचा आहे हे लक्षात असू द्या.
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
मित्रहो हि संकलित माहिती आपणास कशी वाटली. जास्तीत जास्त शेतकरी बांधवासोबत हा लेख शेअर करायला विसरू नका.
Hi
आभारी आहे पाटील बायोटेक आपले…
मु पो कुडित्रे
ता करवीर
जि कोल्हापूर
अतिशय उपयुक्त माहिती. खरे तर शेतकऱ्यांना औषधे आणि कीटकनाशकांची केवळ बाजारातील नावेच बहुदा माहीत आहेत. औषधे आणि किटनाशकतील घटकांची नावे आणि त्याची बाजारातील नावे यांची माहिती असेल तर कळवावे
अत्यंत छान, सिलोड तालुका, जि. औरंगाबाद मध्ये कुठे मिळेल.
चांगली ऊपयुतमाहीती दिल्याबद्दल धन्यवाद