कापुस नियोजन (भाग १ ला)
मित्रहो, अनेक शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेवून पाटील बायोटेकचे कापूस नियोजन तीन भागात देत असून पहिला भाग २० व्या दिवसाच्या नियोजना पर्यंत चा आहे. आपण याचा नक्की लाभ घ्यावा. काही समस्या वाटल्यास खाली मोबाईल नंबर देत आहे, कृपया संपर्क साधावा.
कापसाची लागवड पद्धती :
बागायती शेतीसाठी
- मध्यम हलकी जमीन - ५ फुट x १ फुट
- काळी जमीन - ५ फुट x १.५ फुट किंवा ६ फुट x १ फुट
कोरडवाहू शेतीसाठी
- हलकी जमीन - ४ फुट x १ फुट किंवा ३.५ फुट x १ फुट
- काळी जमीन - ४ फुट x १.५ फुट किंवा ५ फुट x १.५ फुट
टिप : ३१ मे च्या आधी बागायती कापसाची लागवड करू नये
रासायनिक खतांचे व्यवस्थापन
- बागायती शेतीसाठी –
- लागवडी आधी बेसल डोस - डी.ए.पी. १०० किग्रॅ. + पोटॅश ५० किग्रॅ.+ ह्युमॉल-जी २० किग्रॅ. प्रती एकर फेकून देणे.
- लागवडीनंतर २० दिवसांनी युरिया ५० किग्रॅ ड्रीप मधून अथवा फेकून देणे.
- कोरडवाहू शेतीसाठी
- लागवडी आधी बेसल डोस - डी.ए.पी. १०० किग्रॅ.+ पोटॅश ५० किग्रॅ.+ ह्युमॉल-जी २० किग्रॅ. प्रती एकर फेकून देणे.
- लागवडीनंतर २० दिवसांनी युरिया ५० किग्रॅ. प्रती एकर फेकून देणे.
लागवडीनंतर लगेच प्रती एकर आळवणी करावी
अमृत प्लस ड्रेंचिंग १ कीट
अमृत गोल्ड १९:१९:१९ ५ किलो
Nice
आति सूदंर सर
Raju p.hamane at post basamba ta.dist.hingoli
खूप छान माहिती दिली आहे.