कापूस नियोजन (भाग २ रा)
कापूस नियोजनाच्या या दुसऱ्या भागात २१ ते ४५ दिवसाचे नियोजन देत आहे. या काळात आपल्या शेतात यलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप लावल्याने येणाऱ्या किडीची वर्दी मिळेल व त्यानुसार कीटकनाशक निवडता येतील.
हा काळ कापसाच्या वाढीचा असल्याने त्याला संतुलित अन्नद्रव्य पुरवठा करयचा आहे. नत्र-स्पुरद-पालाश यासोबतच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व सल्फर हि दुय्यम अन्न द्रव्ये वाढीतील रोपाची गरज पूर्ण करतात. वाढ जोमात असतांना काही कारणाने जर मुळावाटे सुक्ष्मअन्नद्रव्य मिळाली नाहीत तर वाढीतील संतुलन ढासळते, रोपाची रोग प्रतिकार क्षमता कमी होऊन किडी वाढू लागतात असे होऊ नये म्हणून मायक्रोडील ग्रेड २ चा फवारणीत समावेश करावा. मायक्रोडील मध्ये चिलेटेड स्वरूपातील सुक्ष्मअन्नद्रव्य आहेत त्यामुळे ती त्वरित शोषली जावून को-डीफीसीअन्सी पासून पिकास वाचवतात.
विविध रससोशक किडी व बुरशीजन्य रोगापासून रोपांचे संरक्षण करायचे आहे. या साठी व्यवस्थापनात कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा समावेश करण्यात आला आहे. योग्य प्रमाणात कायिक वाढ पूर्ण झाल्यावर साधारण ४५ व्या दिवसानंतर फुले लागण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा दुसरा व महत्वाचा टप्पा सुरु होतो. फुले मुबलक येण्यासाठी ऑक्सिजन च्या माध्यमातून प्रेरणा देणे महत्वाचे आहे, त्याचा देखील नियोजनात समावेश करण्यात आलेला आहे.
लागवडीनंतर २१ दिवसांनी प्रती एकर आळवणी करावी
अमृत ड्रेंचींग कीट १ + ह्युमॉल गोल्ड १ किलो + अमृत गोल्ड एन पी के १९:१९:१९ ५ किलो
लागवडीनंतर २५ दिवसांनी प्रती पंप फवारणी करावी
इमिडाक्लोप्रिड १० मिली + ब्लेझ १५ मिली + मायक्रोडील ग्रेड-२: १५ मिली
लागवडीनंतर ३५ दिवसांनी प्रती पंप फवारणी करावी
लान्सर गोल्ड ३० ग्रॅम + ऑक्सिजन ५० मिली + खुराक ३० मिली + ब्लेझ १५ मिली
लागवडीनंतर ४५ दिवसांनी
- रासायनिक खते
कोरडवाहू शेतीसाठी प्रती एकर शेतात फेकून देणे: डीएपी ५० किग्रॅ. + पोटॅश ५० किग्रॅ. + युरिया ५० किग्रॅ. + कॅलनेट ५ किग्रॅ. + रीलीजर ५ किग्रॅ. मिक्स करून .
- आळवणी करावी (प्रती एकर )
अमृत ड्रेंचींग कीट १ + ह्युमॉल गोल्ड १ किलो + अमृत गोल्ड एन पी के १९:१९:१९ ५ किलो
- फवारणी करावी (प्रती पंप )
सिंघम २५ मिली + मायक्रोडील ग्रेड-२: १५ मिली + इमिडाक्लोप्रिड १० मिली किंवा अॅसीटमाप्रिड १० ग्रॅम + ब्लेझ १५ मिली
वरील सर्व शिफारसी कंपनी प्रक्षेत्रावर घेतलेल्या चाचण्यांवर आधारित असून कंपनी कुठल्याही उत्पादनाची हमी घेत नाही.
Seeds of cotton
Amhala tumchi ad pahun bar vatal pan apan prati akr 30 Kental chi hami ghet asal tar amhi tumche biyane hamkhas vpru
Mast bhava patil
छान!!
आपण पुरवलेली माहिती आम्हा शेतकरींसाठी खुप उपयुक्त व मार्गदर्शक आहे.