कापसातील व्यावसायिक कीड व्यवस्थापन

कापसातील व्यावसायिक कीड व्यवस्थापन

या लेखा सोबत यावर आधारित व्हिडीओ आमच्या युट्यूब चानल व फेसबुक पेजवर प्रकाशित करण्यात आला आहे. आपण तो पहिला नसेल तर पुढे जाण्यापूर्वी हा व्हिडीओ नक्की बघा.

एका अंदाजानुसार कापसावर ५० च्या आसपास किडींचा प्रादुर्भाव होतो पण त्या सगळ्याच काही फार घातक नसतात. घातक किडी म्हटल्या तर साधारण पणे तुडतुडे, फुलकिडे, मावा, पांढरी माशी अशा रसशोषक किडी व बोंड खाणारी ठिपकेदार, पट्टेदार व गुलाबी अश्या तीन बोंडअळ्या या किडी प्रामुख्याने येतात.

चित्रात दिसणारा हा तुडतुडा, कापूस, भेंडी व वांग्यातील एक घातक कीड आहे. पानाचा रस शोसून मोठे नुकसान करते. परिणाम झालेली पाने पिवळी, चुरगळलेली दिसतात. काठ तपकिरी होतात. पानांच्या खाली मुख्य शिरेजवळ आपण किडीला पाहू शकतात. कापसात हि कीड महाघातक मानली जाते. नियमित वापरल्या जाणाऱ्या अनके औषधांना हि कीड जुमानत नाही.

चित्रात दिसणारी मावा कीड देखील एक घातक कीड म्हणून ओळखली जाते. कापूस, जास्वंद, भेंडी, टरबूज, काकडी, गंगाफळ, टमाटे, बटाटे व वांग्यात हि कीड मोठे नुकसान करते.

 

पांढरा पोशाख घालून विध्वंस करणाऱ्या पुढाऱ्यासारखी दिसणारी हि कीड म्हणजे पांढरी माशी.  ६०० पेक्षा अधिक वनस्पतींवर हिचा घरोबा आहे. कापसा व्यतिरिक्त टोमेटो, बटाटे, तंबाखू, डाळवर्गीय पिके, मिरची, वांगे, भेंडी व शोभेच्या झाडांवर हिचा प्रादुर्भाव होतो. पुढाऱ्यांचे पंटर ज्याप्रमाणे गल्ली बोळात उत आणतात त्याप्रमाणे या पांढऱ्या माशा देखील ६० पेक्षा अधिक विषाणू पसरवतात. मोझाईक, लीफ कर्ल अश्या प्रकारच्या रोगांचा प्रसार करणे, या किडीला एक मोठी डोकेदुखी ठरवतात.

चित्रात दिसणारा फुलकिडा, दुर्लक्ष झाल्यास घातक ठरू शकतो. कापसाव्यतिरिक्त टोमेटो, शेंगवर्गीय पिके व भुइमुगात हा तापदायक ठरू शकतो.

मित्रहो पिकावर येणाऱ्या या किडी अनेकदा आपल्या सहज दृस्तीस पडत नाहीत. त्यामुळे आपण गाफील रहातो आणि जेव्हा या किडीचा प्रभाव आपल्याला शेतात जाणवायला लागतो तो पर्यंत बरच पाणी डोक्यावरून गेलेलं असत, म्हणजे भलताच उशीर झालेला असतो. असे व्हायला नको म्हणून आपण प्रभावी निरीक्षणावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी आपण शेतात चिकट सापळ्यांचा उपयोग करावा. इथे शेअर केलेला व्हिडीओ नक्की पहावा.

फोटोत दिसणारी कीड हेलीकोव्हर्पा म्हणजेच अमेरिकन बोलवर्म हि अमेरिके प्रमाणे अवसरवादि आणि अतिशय घातक कीड आहे.

फोटोत दिसणारी कीड स्पोडोप्टरा म्हणजेच तंबाखू अळी, हेलीकोव्हर्पा-प्रमाणेच अवसरवादि आणि अतिशय घातक आहे. 

या दोघी किडी कापसा व्यतिरिक्त एरंडी, सुर्यफुल, तूर, हरबरा, मका, भेंडी, बटाटे, टमाटे, गुलाब, सोयाबीन, केळी, पेरू अश्या अनेक पिकात हि हौदोस घालतात. यांच्या प्रसाराचे निरीक्षण करण्यासाठी कामगंध सापळे उपलब्ध आहेत. फवारणी वरील अवास्तव खर्च टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी यांचा वापर करणे अतिशय महत्वाचे आहे.

बीटी टोंक्झीनचा प्रभाव कमी झाल्यामुळे गुलाबीबोंड अळीचा पुन्हाएकदा वेगाने प्रसार होऊ लागला आहे. हि कीड देखील पटकन आपल्या दृष्टीस पडत नाही. त्यामुळे हिदेखील अचानकच हाहाकार माजवते. फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणत वाढतो! सुदैवाने हि कीड आपल्या शेतात आहे कि नाही यासाठी सापळा वापरला जावू शकतो. साठवून ठेवलेल्या कापसाजवळ देखील सापळे लावून ठेवावे.

 

मित्रहो, पिकाच्या पोषणाचादेखील किडीच्या प्रकोपावर परिणाम होतो. नत्राचे प्रमाण वाढले तर पाने प्रमाणापेक्षा जास्त रसरशित व पोषक बनतात. या पानातून किडींना जास्त पोषण मिळाल्यामुळे त्या वेगाने प्रजनन करतात. अंडी फलित होण्याचे प्रमाण वाढते व त्याच्या संख्येचा स्पोट होतो. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. यासाठी आपल्याला नत्राच्या मात्रा शक्य तितक्या विभागून देता आल्या तर चांगले. कोणत्या वेळी कोणती खते द्यावीत व खत संतुलन कसे करावे यासाठी आपण आमच्या तज्ञांचे मार्गदर्शन घेवू शकता. त्यासाठी आपण इथे क्लिक करून फॉर्म भरावा. जेणेकरून आमचे तज्ञ आपणास फोन करून मार्गदर्शन देवू शकतील. 

मित्रहो तर आता आपण आजच्या मुख्य विषयाकडे वळू. मी तुम्हाला चौदा कीटकनाशकांची नावे देत आहे. तत्पूर्वी आपण फवारणी करते वेळी स्वत:चे व मजुरांचे संरक्षण करणे गरजेचे आहे हे मनात ठासून घ्यावे. दुपारच्या तीव्र उन्हात फवारणी करण्याऐवजी सुर्योदया पासून सकाळी १० च्या अगोदर पर्यंत आणि सायंकाळी ४ नंतर सूर्यास्तापर्यंत फवारणी करावी. मास्क, गोगल, एप्रन यांचा वापर करावा. फवारणी करते वेळी तंबाखू, गुटखा सेवन करू नये, इतर कुठलाही नशा देखील करू नये.

एसिफेट ५०% + इमिडाक्लोप्रीड १.८% एसपी हे पावडर स्वरूपातील मिश्र कीटकनाशक असून २ ग्राम प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी व बोंडअळीसाठीया सर्व किडीच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकता. 

एसीटामीप्रीड १.१ % + सायपरमेथ्रीन ५.५ % इसी हे द्रव कीटकनाशक मावा, तुडतुडे व, फुलकिडे अशा रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी १ ते २.५ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. हि दोघी कीटकनाशके किडीच्या मज्जातंतू आणि स्नायू वर परिणाम करते त्यामुळे तात्कळ परिणाम दिसून येतात.

फिप्रोनील ४% + एसीटामीप्रीड ४% एस सी हे मिश्र कीटकनाशक मावा व तुडतुडे नियंत्रणासाठी २ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे.

इंडोक्झाकार्ब १४.५% + एसीटामीप्रीड ७.७ % एस सी हे मिश्र कीटकनाशक तुडतुडे, पांढरी माशी व बोंडअळीच्या नियंत्रणासाठी १ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे.  आपण हे कीटकनाशक मिरचीतील फुलकिडे व फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी देखील वापरू शकता.

थायमेथोक्झाम १२.६ % + लॅबडा सीहलोथ्रीन ९.५% झेड सी हे मिश्र कीटकनाशक मावा, फुलकिडे, तुडतूडे व बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ०.४ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. मित्रहो हे कीटकनाशक आधुनिक तंत्रावर आधारित असून कापसा व्यतिरिक्त मका, भुईमुग, सोयबीन, मिरची व टोमेटो या पिकातील किडी नियंत्रण करण्यासाठी देखील वापरले जावू शकते.

सर्वसाधारणपणे आता पर्यंत सांगितलेली कीटकनाशके प्रत्येक शेतकऱ्याने पिकवाढीच्या सुरवातीच्या काळात वापरावी कारण नंतरच्या टप्यात हि कीटकनाशके वापरणे धोकेदायक ठरू शकते. निर्देशांनुसार वेचणीपूर्वी २६ ते ४० दिवस या कीटकनाशकांचा वापर टाळायचा आहे.

डेल्टामेथ्रिन १% + ट्रायएझोफॉस ३५% इसी हे मिश्र कीटकनाशक पांढरी माशी व सर्व प्रकारच्या बोंडअळीच्या नियंत्रणासाठी २ ते २.५ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी २१ दिवस वापर टाळावा. हे कीटकनाशक वांग्यात देखील वापरले जावू शकते.

एसीफेट ५०% + बिफेनथ्रीन १० % डब्लू.डी.जी हे पावडर कीटकनाशक तुडतुडे, फुलकिडे व बोंडअळी साठी १ ते १.५ ग्राम प्रती लिटर या प्रमाणात वापरावे.

क्लोरपायरीफॉस ५० % + सायपरमेथ्रीन ५ % इसी हे सर्व परिचित मिश्र कीटकनाशक असून बोंडअळीच्या सर्व प्रकारासाठी तसेच मावा, फुलकिडे, तुडतुडे व पांढरी माशी साठी १ ते २ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी १५ दिवस वापर टाळावा.

singham

मित्रहो कीटकनाशके फवारणी करते वेळी त्यासोबत आपण काही दर्जेदार उत्पादने वापरू शकतात ज्यामुळे फवारणी अधिक प्रभावी होईल व कमीत कमी डोस मध्ये चांगली परिणामकारकता साधता येईल. याविषयी मार्गदर्शन मिळवण्यासठी आपण 78752 66444 नंबरवर व्हाटसअप करू शकता. मेसेज मध्ये आपल्या प्रश्नासोबत आपला जिल्हा आवर्जून टाकावा.

सायपरमेथ्रीन ३% + क्विनोलफॉस २०% इसी हे मिश्र कीटकनाशक बोंडअळी व तुडतुडे नियंत्रणासाठी २ ते २.५ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वांग्यातील शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी देखील हे कीटकनाशक वापरले जावू शकते.

क्लोरपायरीफॉस १६ % + अल्फासायपरमेथ्रीन १ % इसी हे मिश्र कीटकनाशक ठिपकेदार व गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ३ ते ५ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे.

एसीफेट २५% + फेनवॅलरेट ३% इसी हे मिश्र कीटकनाशक रससोशक किडी व बोंडअळी नियंत्रणासाठी ४ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे.

इथीऑन ४०% + सायपरमेथ्रीन ५% इसी हे मिश्र कीटकनाशक अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी २ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे.

सायपरमेथ्रीन १०% + Indoxacarb १०% एस सी हे मिश्र कीटकनाशक तुडतुडे, फुलकिडे व बोंडअळी साठी ०.५ ते १.२५ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. वेचणीपूर्वी ७ दिवस अगोदर फवारणी टाळावी.

मित्रहो आता पर्यंत सांगितलेली सर्व कीटकनाशके किडीच्या मज्जातंतू आणि स्नायूवर परिणाम करतात त्यामुळे तात्कळ परिणाम दिसून येतात.

पायरीप्रोक्झीफेन ५% + फेनप्रोपॅथ्रीन १५% इसी हे मिश्र कीटकनाशक थोडे वेगळे आहे. पायरीप्रोक्झीफेन हा घटक वाढ थांबवतो व फेनप्रोपॅथ्रीन हा घटक मज्जातंतू आणि स्नायूवर परिणाम करतो. त्यामुळे या औषधाचा परिणाम अधिक उजवा असतो. पांढरी माशी व बोंडअळीच्या नियंत्रणासाठी १ मिली प्रती लिटर या प्रमाणात वापरावे. कापसा व्यतिरिक्त वांगे, भेंडी व मिरची या पिकातील पांढरी माशी व फळ पोखरणारी अळी नियंत्रित करण्यसाठी हे औषध उपयोगात आणले जावू शकते.

मित्रहो, जर तुम्ही यापैकी कुठलेही औषध यापूर्वी वापरले असेल तर त्या बद्दल माहिती आपण कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल. ज्या औषधी कपाशी व्यतिरिक्त अन्य पिकात देखील उपयोगी आहे ते मी आपणास हेतुपुरस्सर सांगितले आहे जेणेकरून आपण ते प्राधान्याने निवडावे. मित्रहो हि सर्व कीटकनाशके आहेत त्यामुळे इथे आपल्या आवडीचा प्रश्न निर्माण होत नाही. यातले एखादे औषध तुम्हाला लकी ठरले म्हणून फक्त तेच तेच वापरू नका. एकदा एक वापरले कि पुढल्या वेळी वेगळे घटक असलेले औषध वापरा जेणेकरून किडीत प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही.

अनेक शेतकरी बांधवांच्या मनात कीटकनाशके वापरण्याबद्दल न्यूनगंड असतो. कीटकनाशके वापरल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो, कर्करोगासारखे आजार वाढतात वगैरे..मित्रहो असले न्यूनगंड अजबात बाळगू नका. कीटकनाशके जबाबदारीने, काटेकोर व अभ्यासपूर्ण पद्धतीने वापरा. कीटकनाशकांचा वापर कमीत कमी व्हावा म्हणून निरीक्षण वाढवणे आवश्यक आहे आणि निरीक्षण वाढवायला आपल्याला आमचे चिकट सापळे, कामगंध सापळे खूप मदत करतात. कीटकनाशकांसोबत आमची काही उत्पादने आपण वापरल्यास कीटकनाशकांची क्रियाशीलता वाढेल व डोस कमी ठेवण्यास मदत होईल.

मित्रहो हि माहिती मी अनेक श्रोतांकडून संकलित केली आणि आपल्यासोबत शेअर केली. शेअर केल्याने ज्ञान वाढते असे म्हणतात. हा  लेख तुम्हाला तो उपयोगी वाटला का? ते कोमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि मित्रपरीवारात शेअर करायला विसरू नका.
Back to blog