Call 9923974222 for dealership.

या वर्षी कापसाचा ताळेबंद कसा असणार?

शेतकरी बांधव कापसाची लागवड ठोस मिळकतीसाठी करतात. एकरकमी नफ्यासाठी या पिकाचा विचार होत असल्याने यास "व्यापारी पिक" म्हटले जाते. 

मित्रहो ताकाला जावून भांडे लपवू नये अशी एक म्हण आपल्या भाषेत प्रचलित आहे. तात्पर्य असे आहे कि जर आपल्याला कापूस पिकातून व्यापारी पद्धतीचा म्हणजे हुकमी व ठोस नफा हवा असेल तर कापसाचे व्यवस्थापन देखील तसेच करावे लागेल. हौस म्हणून कुणीही कापूस लावू नये.

कापसात एकरी खर्च साधारण ३० ते ४० हजार होतो, हा खर्च निघण्यासाठी उत्पादनातील ६ ते ८ क्विंटल कापूस कामी येतो. जर आपले एकरी उत्पादन १६ क्विंटल आले तर ८ ते १० क्विंटल कापूस निव्वळ नफा असणार. जर उत्पादन एकरी ३० क्विंटल आले तर २२ ते २४ क्विंटल कापूस निव्वळ नफा होऊन श्रीमंती फायदा मिळू शकतो! वर्षातून एकदाच हा चान्स मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी याला लॉटरी किंवा सट्टा न समजता, याचा ताळेबंद हिशोब करायला हवा.

ताळेबंदाच्या खर्चाच्या रकान्यात साधारणपणे सिंचन, बियाणे, मृदा सुधारक, रासायनिक खते, कीटक नाशके व मजुरी (नांगरणी वखरणी, लागवड, खते देणे, फवारणी करणे, निंदणी - कोळपणी, व वेचणी करणे) यांचा समावेश असतो.

सिंचन खर्च कमी करण्यासाठी चांगल्या दर्जाचे ठिबक वापरावे जेणे करून घसारा कमी बसेल व एकरी घसारा ५००० रु च्या आत राहील. जरी आपल्याकडे जुने ठिबक उपलब्ध असले तरी ताळेबंदात त्याचा एकरी खर्च ५००० रु (घसारा) धरून चलावे.

एकरी मजुरी चा खर्च १५ ते १७ हजार येतो. यात बचत करणे अत्यावश्यक आहे. गेल्या दोन वर्षात अनेक शेतकरी बांधवांनी, बेकायदेशीर पद्धतीने, एचटीबीटी कापसाची लागवड केली. यात मजुरीत मोठी बचत होते असा त्याचा अनुभव आहे. एचटीबीटी कापसाला शासनाने मान्यत दिलेली नसल्याने फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात चालतात शिवाय गुन्हेगारी नोंद होऊन नसता उपद्रव होऊ शकतो. त्यापेक्षा शक्य तिथे सामुहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून यंत्र वापरावे म्हणजे मजुरी कमी लागेल. वेचायला सोपे जाणारे वाण निवडल्याने क्विंटल मागे दोनशे रुपया पर्यंत मजुरीत बचत शक्य आहे. घरोब्यातील शेतकरी बांधवांनी कौटुंबिक पद्धतीने एकमेकास मदत केली तर ताळेबंदातील खर्चाच्या रकान्यातील हा मजुरीचा खर्च वाचवता येतो.  

मृदेचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्याची प्रकिया हंगामी नसून वर्षानुवर्षे करायची असते. उत्तम दर्जाचे फार्म यार्ड मैन्यूअर बनवण्याची कला शेतकरी बांधवांनी आत्मसात केली तर ताळेबंदीच्या खर्चाच्या रकान्यात बचत कमी दिसली तरी या कामातून हे दर्जेदार सेंद्रिय खत मिळेल. विश्वसनीय दर्जाचे खत मिळाल्याने मृदेच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात भरीव वाढ होऊन त्याचा परिणाम ताळेबंदाच्या आवक रकान्यात स्पष्ट व दमदार दिसेल. पाटील बायोटेकचे हुमणासूर व मायक्रोडील ग्रेड १ हि उत्पादने फार्म यार्ड मैन्यूअर मध्ये वापरल्याने त्याच्यात दर्जात्मक सुधारणा होते. 

बियाण्याच्या खर्चात बचत शक्य नाही पण जोखीम कमी केली जावू शकते. जोखीम कमी करण्यासाठी कुणाच्याही भूल थापांना बळी न पडता, नावाजलेल्या कंपन्यांचे बियाणे वापरावे. पक्के बिल घ्यावे. अनेक शेतकरी बांधव एकाच प्रकारचे वाण वापरतात त्या ऐवजी एका पेक्षा अधिक प्रकारचे वाण वापरावे. यामुळे जोखीम कमी होईल.

ठिबक व फवारणी तून खतांचे व्यवस्थापन केल्याने मात्रेत बचत होऊन खर्चात बचत शक्य आहे. रसायनिक खतांवरचा खर्च कमी करण्यापेक्षा, संतुलित खतांच्या वापरावर भर देणे आवश्यक आहे. एन-पी-के सोबतच कॅल्शियम (कॅलनेट), मेग्नेशियम (ह्युमॅग), सल्फर (रिलीजर) या दुय्यम खतांचा तसेच, लोह, मंगल, जस्त, तांबे, मोलाब्द व बोरान च्या मिश्र खतांचा  (मायक्रोडील) योग्य प्रमाणात वापर केला जायला हवा. संतुलित खत मात्रेतून पिकांचे पोषण चांगले होते व ते रोग व किडींना सहजा-सहजी बळी पडत नाहीत. 

कीटक नियंत्रणाचा खर्च कापसात मोठ्या प्रमाणात होतो. हा खर्च कमी करण्या साठी वर दिल्याप्रमाणे संतुलीत खत मात्रा वापरावी; पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा, कामगंध सापळ्यांचा वापर  करावा. अरेनाच्या फवारणीतून कापसाची रोग-कीड प्रतिकार क्षमता वाढवता येते. 

कापसातील व्यावसायिक कीड व्यवस्थापन हा ब्लॉग नक्की वाचा.

 


खर्च कमी करतांना, एकूण जोखीम कमी करणे हि महत्वाची बाब आहे. एकूण जोखीम कमी करण्यासाठी कापूस+सोयाबीन/मुग/उडीद/तूर अशी अंतरपीक पद्धती वापरावी. कापसाचे एका पेक्षा अधिक वाण वापरतांना बागायती व कोरडवाहू, कमी कालावधीचे  व उशिरापर्यंत चालणारे अश्या वाणांच्या जोड्यांची निवड करावी. पिक विम्याचा सहारा घ्यावा. 

कापसातील पाटील बायोटेक तंत्रज्ञान ३० क्विंटल प्रती एकरचे लक्ष ठेवून आखले जाते, आपण कमीत कमी एक एकर क्षेत्रासाठी आमचे  तंत्रज्ञान वापराव जेणेकरून आपण ताळेबंदातील फरक ओळखू शकाल. 

 

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published