सीताफळ सडके का निघतात?

सीताफळ आरोग्यवर्धक फळ आहे. फळाचा गर शुक्राणूवर्धक, तृष्णावर्धक, बलवर्धक, उत्साहवर्धक, पचनशक्ती वाढविणारा व पित्ताविकार कमी करणारा आहे. याचे सेवन हाडांच्या व दातांच्या मजबुतीसाठी उपयोगी असते. शिवाय हृदयाची कार्यक्षमता  व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देखील हे फळ उपयोगी आहे. 

चवदार असल्याने ताज्या, पिकलेल्या फळांना मोठी मागणी असते. पिकलेले फळ नाजूक व  नाशवंत असल्याने त्यांची दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त काळ साठवण करता येत नाही. 

सीताफळाच्या गरावर प्रक्रिया करण्यात येते. पावडर, जॅम, सिरप, शेक, रबडी, श्रीखंड आइस्क्रीम, पेस्ट्री असे अनेक पदार्थ यापासून बनवण्यात येतात. या मुळे प्रक्रिया उद्योगात या फळाची मागणी चांगली असते. 

झाडांच्या पानांचा व फळातील बियांचा उपयोग कीटकनाशक औषधी, साबण, शाम्पू बनवण्यासाठी होतो व या प्रक्रियेत तयार होणारा लगदा खत निर्मितीसाठी वापरला जातो.एकूणच सीताफळ हे बहुगुणी व बहुउपयोगी फळ आहे, यात शंका नाही!

दुष्काळी परिस्थितीत देखील सीताफळ सहज तग धरते. फळबागेत रोगराईचे प्रमाण अत्यल्प असल्याने व्यवस्थापन खर्च कमी असतो. चांगली  मागणी व कमी गुंतवणूक! यामुळे महाराष्ट्रात सीताफळ लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. वॉशिंग्टन, बाळानगर, मेमोब, गियाना, अर्का सहान व फुले पुरंदर या जातीच्या सीताफळांची लागवड होत असे. या सर्व जाती थोड्या फार फरकाने सारख्याच आहेत. चव, आकार, वजन या गुणधर्माचा विचार केला तर सुपर गोल्डन हि नवीन जात वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे अलीकडेच या जातीचे संगोपन मोठ्या प्रमाणात सुरु झालेले आहे. जुन्या बागा काढतांना त्यात या नवीन जातीची लागवड होत आहे. 

सीताफळ हे कमी खर्चाचे आहे असा शेतकरी बांधवांचा समज असल्याने ते सीताफळाच्या बागेकडे फारसे व्यवस्थापकीय पद्धतीने लक्ष घालत नाही. परंतु अलीकडील काळात सर्वच प्रजातीच्या सीताफळ बागांमध्ये फळमाशीचा उद्रेक वाढत आहे. फळमाशी अतिशय वेगाने प्रजनन करते शिवाय ती अनेक फळपिकांवर जगू शकत असल्याने अचानकच सीताफळाच्या बागेत गोंधळ घालू शकते. ती फळाच्या आत अंडी देते. अंड्यातून निघालेल्या अळ्या फळाच्या गरावर ताव मारतात. त्यात बुरशीची बाधा झाली तर फळे सडू लागतात. अशी फळे बाजारात विकणे शक्य नसते. दुर्लक्ष झाले तर ९० टक्के फळे हातची जावू शकतात. 

 हि बाब लक्षात घेवून शेतकरी बांधवांनी वेळीच जागृत होणे गरजेचे आहे. 

फळमाशीच्या समस्येवर मात करण्यसाठी आपण पाटील बायोटेकच्या "मक्षिकारी" या फळमाशी सापळ्यांचा उपयोग करावा. यातील कामगंध, फळमाशीला आकर्षून घेतो व सापळ्यातच मारतो. फुल धारणेच्या वेळी एकरी १० सापळे लावले तर संपर्ण क्षेत्रातील फळे सुरक्षित रहातात. 

 • "मक्षिकारी" हा २५ वर्ष जुना ब्रांड आहे! त्या मध्ये ९९.९९ % शुद्ध कामगंध वापरले जातात, ज्या मुळे बाजारातील इतर कुठलाही सापळा याची बरोबरी करू शकत नाही.
 • मक्षिकारीची गंधगोळी विशिष्ठ प्रकारच्या फायबर वर प्रकिया करून बनवली जाते त्यामुळे ती दीर्घ काळापर्यंत व एक समान पद्धतीने कामगंध सोडते. परिणामी फळमाशीचा उत्तम बंदोबस्त होतो. 
 • मक्षिकारीचा पाउच चार लेयरचा बनवला जातो त्यामुळे, पाउच मधून गंध उडत नाही व गंधगोळी उत्पादना नंतर दोन ते तीन वर्ष साठवून ठेवता येते. गुणवत्ता १००% टिकून रहाते. आपल्या फळबागेची गरज ओळखून आपण २-३ वर्षासाठी लागणाऱ्या "मक्षिकारी" सापळ्यांची साठवण करून ठेवू शकतात. गरजे नुसार वापरू शकतात. 
 • मक्षिकारी गंधगोळीला अस्सल तांब्याचा तार वापरला जातो  त्यामुळे सापळ हवेवर कितीही हलला तरी तार टिकून रहातो
 • मक्षिकारीचा सापळा गर्द पिवळ्या रंगाचा असल्याने फळमाशीला दुरूनच आकर्षित करण्यासाठी गंधगोळी ला मदत होते
 • मक्षिकारीचा सापळा खालच्या बाजूने पारदर्शक असतो त्यामुळे सापळ्यात अडकलेल्या माशा सहज दिसून पडतात. या मुळे निरीक्षण चांगले होते व सापळा वेळेवर रिकामा करायला सोपे जाते.

 • मक्षिकारी मधमाशीवर कोणताही परिणाम करत नाही त्यामुळे फुलांचे परागीभवन चांगले होते व जास्त फळे मिळतात
 • मक्षीकारी लावल्यावर फळमाशी नियंत्रणासाठी कुठलीही फवारणी करावी लागत नाही. त्यामुळे खर्च, वेळ तर वाचतोच शिवाय फळात रेसिडयु येत नाही.  
 • मक्षिकारी पर्यावरण पूरक व किफायतशीर आहे. त्या मुळे सेंद्रिय शेतीत याचे विशेष महत्व आहे.
 • मक्षिकारी लिक्विड स्वरूपात देखील उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधव खर्चात मोठी बचत करू शकतात.

मित्रहो, मक्षिकारी ऑनलाईन उपलब्ध असून, 

 • आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत.
 • जर ऑनलाईन खरेदीत आपले बिल ५००० रु च्या वर झाले तर आपणास आपोआप १०% रकमेची वाढीव सूट लागू होईल.
 • या ऑफर्स फक्त पहिल्या १०० खरेदीवरच लागू आहेत. तेव्ह ऑफर्स चा लाभ लगेच घ्या.