अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखाल?

अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखाल?

चांगल्या उत्पन्नासाठी पिकास अन्नद्रव्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. पाटील बायोटेक ची अमृत गोल्ड खते, सी एम एस खते (कॅल्शियम, मॅग्नेशियम, रीलीजर), मायक्रोडील खते या कामी आपली मदत करतात. उभ्या पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखावी हा प्रश्न आपल्यासमोर अनेकदा उभा रहातो. तेव्हा आम्ही आपणास मदत करू शकतो. खाली आमच्या प्रतिनिधींचे फोन नंबर देत आहे त्यांना फोन करून मार्गदर्शन मिळवू शकता. 

शेतात फिरता फिरता काही  लक्षणांचा अभ्यास आपणही करू शकता, त्यासाठी खाली दिलेली कमतरतेची लक्षणे जाणून घ्या. 

नत्र - झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.

स्फुरद - पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.पालाश - पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

जस्त - पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो. पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.

लोह - शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ खुंटते.

 तांबे - पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.

बोरॉन - टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने मरतात.

मॉलिब्डेनम - पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात. पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.

गंधक - झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात.
    Back to blog