डायफेनथ्युरॉन आहे वेगळ्या गटातील कीटकनाशक
डायफेनथ्युरॉनवर आधारित तीन कीटकनाशके आपल्याकडे उपलब्ध आहेत.
- डायफेनथ्युरॉन ५० डब्ल्यु.पी. (फेरोशिया गोल्ड, पोलो, पेगासस, रुबी, डिक्लेअर) व
- डायफेनथ्युरॉन ४७.८ % एससी (पेगासस, डिप्लोमॅट)
- पायरीप्रोक्झीफेन ५% +डायफेनथ्युरॉन २५% एस इ (एसएलआर ५२५)
डायफेनथ्युरॉन हे एक थायोयुरिया प्रकारातील कीटकनाशक असल्याने नेहमीच्या कीटकनाशकापेक्षा वेगळे आहे. सस्तन प्राण्यावर व परागीभवनकरणाऱ्या किटकावर याचे दुष्परिणाम तोकडे (फारच कमी) आहेत. सूर्यप्रकाशात याचे रुपांतर होऊन एका प्रकारचे कर्बोइमाईड तयार होते जे कीटक वर्गासाठी अधिक घातक असते. जर आपण ओर्गानोफोस्पेट किंवा निकोटीनाईड गटातील कीटकनाशके वापरत असाल तर फेरपालट करण्यासाठी डायफेनथुरॉनयुक्त कीटकनाशक वापरल्याने किडीत प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही व उत्तम नियंत्रण मिळेल.
क्लिक करा आणि जाणून घ्या आमच्या उत्पादनांबद्दल
अलीकडील काळात याचा उपयोग बटाट्यातील पांढरी माशी नियंत्रित करण्यासाठी देखील चांगला होऊ शकते असे सिद्ध झाले आहे पण केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने अजूनतरी तशी शिफारस दिलेली दिसत नाही.
केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने खालील ६ पिकात डायफेनथ्युरॉन ५० डब्ल्यु.पी ची शिफारस केलेली आहे.
- कापसातील पांढरी माशी, मावा, फुलकिडे व तुडतूडे नियंत्रणासाठी ९-१८ ग्राम प्रती १५ लिटर दराने फवारणी करावी. वेचणी सुरु करायच्या २१ दिवस अगोदर या कीटकनाशकाची फवारणी बंद करावी.
- पत्ताकोबीतील चौकोनी ठिपक्याचा पतंग नियंत्रणासाठी १२-१८ ग्राम प्रती १५ लिटर दराने फवारणी करावी. काढणी सुरु करायच्या ७ दिवस अगोदर या कीटकनाशकाची फवारणी बंद करावी.
- मिरचीतील लाल कोळी नियंत्रणासाठी ९-१८ ग्राम प्रती १५ लिटर दराने फवारणी करावी. तोडे सुरु करायच्या ३ दिवस अगोदर या कीटकनाशकाची फवारणी बंद करावी.
- वांग्यातील पांढरी माशी नियंत्रणासाठी १२-१८ ग्राम प्रती १५ लिटर दराने फवारणी करावी. तोडे सुरु करायच्या ३ दिवस अगोदर या कीटकनाशकाची फवारणी बंद करावी.
- वेलदोड्यातील फुलकिडे व वेलदोडा पोखरणारी कीड नियंत्रणासाठी १२ ग्राम प्रती १५ लिटर दराने फवारणी करावी. शेवटचे ७ दिवस या कीटकनाशकाची फवारणी बंद करावी.
- लिंबूवर्गीय पिकातील लालकोळी नियंत्रणासाठी ३० ग्राम प्रती १५ लिटर दराने फवारणी करावी. तोडे सुरु करायच्या ३० दिवस अगोदर या कीटकनाशकाची फवारणी बंद करावी.
डायफेनथ्युरॉन ४७.८ % एससी ची शिफारस खालील प्रमाणे आहे.
- कापसातील पांढरी माशी, मावा, फुलकिडे व तुडतूडे नियंत्रणासाठी १५ मिली प्रती १५ लिटर दराने फवारणी करावी. वेचणी सुरु करायच्या ३० दिवस अगोदर या कीटकनाशकाची फवारणी बंद करावी.
पायरीप्रोक्झीफेन ५% +डायफेनथ्युरॉन २५% एस इ ची शिफारस अजून प्राप्त झालेली नाही.
- माहिती उपलब्ध झाल्यावर इथे अद्ययावत करण्यात येईल.
खाली स्क्रोल करून शेतीविषयक आमचे विविध लेख नक्की वाचा. आपण आमची उत्पादने देखील ऑनलाईन खरेदी करू शकता.
संदर्भ
- केंद्रीय कीटकनाशक बोर्ड
- इंडियन जर्नल ऑफ साइंटीफीक रीसर्च