Call 9923974222 for dealership.

२१ पिकात रेसिड्यूची चिंता न करता वापरा हे कीटकनाशक

मित्रहो कीटकनाशक म्हटले कि आपल्यलाला रेसिड्यूची चिंता लागुनच रहाते. आज माहित घेवू "डायमीथोएट" ची. याची व्यापारी नावे रोगोर, हेक्सागोर, सुलगोरटाटा टाफगोर अशी आहेत. डायमीथोएटचे एक वैशिठ्य आहे. ते पिकात जितक्या वेगाने पसरते तितक्याच वेगाने नाहीसे देखील होते. याच्या याच गुणामुळे याचा रेसीड्यू येत नाही. 

आता उत्तम दर्जाची कीटकनाशके ऑनलाईन उपलब्ध आहेत. आपल्या सुविधेसाठी इथे लिंक देता आहे

 

या कीटकनाशकाचे डोसेस खालील प्रमाणे आहेत

 • बाजरीत येणारा किडा (Milky weed bug) नियंत्रीत करण्यासाठी ९ ते २० मिली प्रती १५ लिटर 
 • मक्यातील खोडकिडा नियंत्रीत करण्यासाठी १० ते २० मिली प्रती १५ लिटर 
 • मक्यातील खोडमाशी नियंत्रीत करण्यासाठी २०-४० मिली प्रती १५ लिटर
------------------------------
कीटकनाशक कोणतेही असो, त्याचा वापर हा शेवटचा पर्याय असतो. त्याअगोदर आपण व्यवस्थापनाच्या माध्यमातून कीडनियंत्रण करू शकतो. संतुलित खत व्यवस्थापन हा त्याचाच एक भाग असून त्यासाठी आपण अमृतगोल्ड एन[पीके वाटर सोल्युबल मिश्र खतांचा, अमृत प्लस ड्रेंचींग कीटचा व मायक्रोडील सूक्ष्मअन्नद्रव्य खतांचा वापर करावा. चिकट सापळे, कामगंध सापळे वापरून आपण किडीचे प्रजनन रोखू शकता.
------------------------------
 • ज्वारीतील मच्छर/मिजमाशी (Midge) नियंत्रीत करण्यासाठी  २५-५० मिली प्रती १५ लिटर
 • एरंडीतील तुडतूडे व कोळी नियंत्रीत करण्यासाठी १२-२४ मिली प्रती १५ लिटर
 • एरंडीतील अळी (semi looper) नियंत्रीत करण्यासाठी १७-३५ मिली प्रती १५ लिटर
 • मोहरीतील नागअळी, मावा व पाने खाणारी अळी (saw fly) नियंत्रीत करण्यासाठी  १०-२० मिली प्रती १५ लिटर
 • करडईतील मावा नियंत्रीत करण्यासाठी १०-२० मिली प्रती १५ लिटर
 • भेंडीतील मावा नियंत्रीत करण्यासाठी ३५-७० मिली प्रती १५ लिटर
 • भेंडीतील तुडतुडे व फुलकिडे नियंत्रीत करण्यासाठी ३०-६० मिली प्रती १५ लिटर
 • वांग्यातील खोड कीड नियंत्रीत करण्यासाठी १०-२० मिली प्रती १५ लिटर
 • फुलकोबी व पत्ताकोबीतील मावा व रंगीत किडा (Painted bug) नियंत्रीत करण्यासाठी  १०-२० मिली प्रती १५ लिटर 

खाली स्क्रोल करून शेतीविषयक आमचे विविध लेख नक्की वाचा. आपण आमची उत्पादने देखील ऑनलाईन खरेदी करू शकता.

 • मिरचीतील कोळी नियंत्रीत करण्यासाठी १५ ते ३० मिली प्रती १५ लिटर
 • कांद्यातील तुडतूडे नियंत्रीत करण्यासाठी १०-२० मिली प्रती १५ लिटर
 • बटाट्यातील तुडतूडे नियंत्रीत करण्यासाठी १०-२० मिली प्रती १५ लिटर
 • टमाट्यातील मावा व पांढरी माशी नियंत्रीत करण्यासाठी १० ते २० मिली प्रती १५ लिटर 
 • सफरचंदातील खोड कीड नियंत्रीत करण्यासाठी १२-२० मिली प्रती १५ लिटर
 • जर्दाळूतील मावा नियंत्रीत करण्यासाठी १२-२० मिली प्रती १५ लिटर
 • केळीतील मावा, लेस विंग बग नियंत्रीत करण्यासाठी  १२-२० मिली प्रती १५ लिटर
 • लिंबूतील मावा नियंत्रीत करण्यासाठी  १२-२० मिली प्रती १५ लिटर
 • अंजीरातील तुडतूडे नियंत्रीत करण्यासाठी १२-२० मिली प्रती १५ लिटर
 • अंजीरातील मिलीबग नियंत्रीत करण्यासाठी १८.५ ते ३३ मिली प्रती १५ लिटर
 • आंब्यातील तुडतूडे नियंत्रीत करण्यासाठी १२-२० मिली प्रती १५ लिटर
 • गुलाबातील खवले व फुलकिडे नियंत्रीत करण्यासाठी ३७-७५ मिली प्रती १५ लिटर 

मित्रहो आमच्या वेबसाईटवर अनेक कीटकनाशकांची माहिती दिली आहे. शिफारशी नुसार प्रत्येक  कीटकनाशकाची फवारणी, पिकाची काढणी सुरु करण्याच्या काही दिवस अगोदर, बंद करावी लागते. पण डायमीथोएट या कीटकनाशकास तशी कुठलीही शिफारस नाही त्यामुळे आपण हे कीटकनाशक साधारणपणे शेवटच्या टप्प्यात वापरावे. शेवटी कितीही म्हटले तरी हे एक रसायन आहे, विष आहे, त्यामुळे काढणीच्या शेवटच्या सात दिवस फवारणी टाळावी जेणे करून काढणी केलेल्या पिकात खरोखरच कुठलाही रेसिड्यू येणार नाही.  

कीटकनाशका बद्दलचे नियम कालपरत्वे बदलतात त्यामुळे उपयोग करते वेळी योग्य ती चौकशी नक्की करावी.

1 comment

 • Superb

  Yuvraj Lange

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published