इमामेक्टीन बेन्झोएट कोण-कोणत्या पिकात वापराल?

इमामेक्टीन बेन्झोएट कोण-कोणत्या पिकात वापराल?

मातीत आढळून येणाऱ्या स्ट्रेप्टोमायसेस एव्हरमिटीस या जीवाणूचे किण्वन करून आबामेक्टीन हा घटक मिळतो. यावर प्रक्रिया केल्यावर इमामेक्टीन बेन्झोएट हे कीटकनाशक  तयार करण्यात येते. २००८ साली भारतात याचा उपयोग सुरु झाला. केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी या प्रमाणित कीटकनाशकाची शिफारस खालील पिकात केली आहे. 
 • कापूस पिकातील बोंडअळी नियंत्रणासाठी ६ ग्राम प्रती १५ लिटर, वेचणीच्या १० दिवस अगोदर फवारणी बंद करावी
 • भेंडी पिकातील फळ व खोड पोखरणारी कीड नियंत्रणासाठी ५ ग्राम प्रती १५ लिटर, तोडणीच्या ५ दिवस अगोदर फवारणी बंद करावी
 • कोबीतील चौकोनि ठिपक्याचा पतंग नियंत्रणासाठी ५-६ ग्राम प्रती १५ लिटर, काढणीच्या ३ दिवस अगोदर फवारणी बंद करावी
 • मिरचीतील फळ पोखरणारी अळी, फुलकिडे व कोळी नियंत्रणासाठी ५ ग्राम प्रती १५ लिटर, तोडणीच्या ५ दिवस अगोदर फवारणी बंद करावी
 • वांग्यातील फळ व खोड किडा नियंत्रणासाठी ५ ग्राम प्रती १५ लिटर, तोडणीच्या ३ दिवस अगोदर फवारणी बंद करावी
 • तुर व हरभऱ्यातील शेंगा पोख्ररणारी अळी नियंत्रणासाठी ४-६ ग्राम प्रती १५ लिटर, तोडणीच्या १४ दिवस अगोदर फवारणी बंद करावी
 • द्रक्षातील फुलकिडे नियंत्रणासाठी ३-६ ग्राम प्रती १५ लिटर, तोडणीच्या ५ दिवस अगोदर फवारणी बंद करावी

हे कीटकनाशक ऑनलाईन उपलब्ध असून खाली दिलेल्या लिंकवरून आपण ते खरेदी करू शकता.

  खाली स्क्रोल करून शेतीविषयक आमचे विविध लेख नक्की वाचा. आपण आमची उत्पादने देखील ऑनलाईन खरेदी करू शकता.
   Back to blog