Call 9923974222 for dealership.

यशस्वी शेतकऱ्याचे व्यक्तिगत गुण

कोणतेही कृषी प्रकाशन वाचून बघितले कि असे वाटते कि काही शेतकरी फारच हुषार आहेत, यशस्वी आहेत, शेती हा फायदेशीर व्यवसाय आहे. पण जर चारचौघात चर्चा केली तर असे जाणवते कि शेतीत हुषारीचा काही उपयोगच नाही. काही केले- कितीही केले तरी नफा होतच नाही!

या विरोधाभासाचे काय कारण आहे?

शेती हि प्रार्थमिक उद्योजकता आहे. शेतकऱ्याच्या  व्यक्तिगत गुणांचे यात फार जास्त महत्व आहे. ज्या प्रमाणे बाजारातील प्रत्येक दुकानदार यशस्वी नसतो, त्याप्रमाणे शेतीत देखील आहे. जो शेतकरी सदैव कार्यमग्न रहातो, बारकाव्यांकडे लक्ष देतो, वेळचे काम वेळेवर करतो, युक्त्या शिकतो-वापरतो, हिशोब लिहितो तो यशस्वी होतोच.

यशस्वी शेतकऱ्याचे व्यक्तिगत गुण प्रत्येक शेतकरी आत्मसात करू शकतो त्यासाठी यथे एक प्रश्नावली देत असून, प्रत्येक आठवड्यानंतर कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या मित्रा कडून स्वत:चे मुल्यांकन करून घ्या. स्वत:च्या नजरेतून व इतरांच्या नजरेतून स्वत:चे मुल्यांकन लक्षात घ्यावे. तुमचे मुल्यांकन किती झाले हे बघून खुश किंवा नाराज होण्या ऐवजी पुढच्या वेळेस ते कसे सुधारेल यासाठी प्रयत्नशील रहावे.

मुल्यांकनासाठी गुण खालील पद्धतीने द्यावे

 

 • कधीच नाही या उत्तराला १ गुण आहे
 • कधी कधी या उत्तराला २ गुण आहेत
 • काही वेळ या उत्तराला ३ गुण आहेत
 • नेहमी या उत्तराला ४ गुण आहेत.
 •  

  प्रश्नावली

   

  1. कामाच्या बाबत आपली आचारसंहिता दर्जेदार आहे का?
  2. आपण कामाच्या बारकाव्यांकडे लक्ष देता का?
  3. काम वेळेवर करणे याचे आपणास महत्व आहे का?
  4. आपण दृढनिश्चयी आहात का? कामाला चिटकून रहाता का?
  5. आपण नवीन युक्त्या व नवनवीन पद्धती शिकून वापरून पहाता का?
  6. शेतातील प्रत्येक कामाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्चाची किंमत जाणता का?
  7. आपण लवचिक आहात का व गरज पडल्यास बदल घडवता का?
  8. आपण इतरांशी (शेजारी, व्यापारी, ग्राहक व मजूर) निट वागता का?
  9. आपण थेट संवाद साधता का? दुसऱ्यांचे ऐकून घेता व मनातले प्रश्न विचारता का?
  10. इतरांचा सल्ला व विचार ऐकून घ्यायची क्षमता आपल्यात आहे का?
  11. कुणाचा सल्ला घेतल्यावर आपण स्वत:च्या विवेकबुद्धीचा वापर करता का?
  12. प्रगत शेतकरी बांधवांशी घनिष्ठ संबध ठेवता का?
  13. बाजारातील नवीन घटना व लाटेवर लक्ष ठेवता का?
  14. आपणास शेती मनापासून आवडते का? आपण व्यासंगी शेतकरी आहात का?
  15. आपले कुटुंब आपणास शेतीत मदत करते का?
  16. कृषीमित्रांच्या संघटनेत आपण हिरीरीने भाग घेता का?
  17. शेतीव्यतीरिक्त इतर गोष्टीत देखील आपला सहभाग असतो का?
  18. निराशा वाटली कि इतरांची मदत घेता का?
  19. आपण आपल्या निर्णयाची जबाबदारी मी स्वीकारता का?
  20. आपल्या सोबत शेतात काम करणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष एकच आहे का? आपण सर्व एक आहोत अशी भावना आहे का?

  या वीस प्रश्नांची उत्तरे काय आहेत हे लिहून एकूण किती गुण होतात ते बघा. ४० पेक्षा अधिक गुण मिळवायचा प्रयत्न करा. त्यासाठी स्वत:मध्ये योग्य बदल करा. जेव्हा आपण ६० पेक्षा अधिक गुण मिळवायला लागाल तेव्हा आपण प्रगती पथावर आहात हे लक्षात घ्या. प्रयत्न सुरुच ठेवा. हे मुल्यांकन दर आठवड्याला करायला विसरू नका.  

  शेतकरी मित्रहो, आपल्या उद्योजगतेत पाटील बायोटेक सदैव आपल्या सोबत आहेहा तक्ता अमेरिकेतील मिनेसोटा डिपार्टमेंट ऑफ एग्रिकल्चर यांनी तयार केला आहे, आम्ही फक्त अनुवाद व शब्दांकन करून अत्यावश्यक बदल केले आहेत.

  उत्कृष्ट दर्जाची नवनवीन कृषी अवजारे बघण्यासाठी व खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा. 

  2 comments

  • कृपया कांदा लागवड, रोगनियंत्रण, व व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन करावे

   कैलास उत्तम हिरे
  • मला पपई लागवड करायची आहे mulching टाकायची आहे कुठला पेपर टाकावा

   Shantaram Patil

  Leave a comment

  Name and Mobile number .
  .
  Message with Address, District & Pincode .

  Please note, comments must be approved before they are published