उद्योजक शेतकरी: पुन्हा पुढल्या खेळासाठी तयार व्हायचे!

उद्योजक शेतकरी: पुन्हा पुढल्या खेळासाठी तयार व्हायचे!

रोबर्ट कियोसाकी, जपानी मुळाचे अमेरिकन नागरिक, एक उद्योजक, वक्ता व लेखक आहेत. जगभरातील अनेक उद्योजक त्यांच्याकडून व्यावसायिक मानसिकतेबद्दल जाणून घेतात. त्यांच्या एका पुस्तकात लिहिले आहे कि "ज्या व्यवसायिकाकडे शेतकऱ्याची मानसिकता असेल तोच खरा उद्योजक"!

हे एक वाक्य माझ्या हृदयात घर करून बसले. अनेक शेतकरी बांधवांशी बोलल्यावर या वाक्यातील सत्यता मला पटली.

प्रत्येक व्यक्ती कामाच्या बदल्यात मोबदला घेते किंवा एका ठराविक मोबदल्यासाठी काम करतो. आपल्या मिळकतीतून मिळणारी सुरक्षेची भावना प्रत्येकाला महत्वाची वाटते. शेतकरी व उद्योजक या मानसिकता याच्या अगदी विरुद्ध असतात. आर्थिक सुरक्षेची यांना कधीच गरज वाटत नाही. आपल्या कामाच्या व गुंतवणुकीच्या बदल्यात आपल्याला काही मोबदला मिळेल का? किती मिळेल याची कोणतीही खात्री यांच्या जीवनात नसते, अनेकदा ते याचा विचार हि करीत नाही. 

आपल्या इच्छेनुसार डाव मांडायचा, निसर्गाच्या सोबतीने त्यात रंग भरायचे, अनुभव व ज्ञाना नुसार जोखिम पत्करत डाव पुढे न्यायचा, सर्वकाही व्यवस्थित पार पडले तर एका दाण्याच्या बदल्यात सूपभर परत मिळते, जर विस्कटले तर जे मिळाले त्यात समाधानी व्हायचे. पुन्हा पुढल्या खेळासाठी तयार व्हायचे! 

Back to blog