Click Here for Product Demand Form

फार्म एक्सचेंज आहे तरी काय?

व्यवहारात दोन पक्ष असतात आणि या दोघांचा व्यवहारात आर्थिक फायदा होतो असे अध्यरुत धरले जाते. शेतीमाल खरेदीविक्री मध्ये देखील हीच अपेक्षा असते परंतु असे घडत नाही. शेती माल हा नाशवंत असतो, त्याच्यातील मागवी व पुरवठा यात क्षणाक्षणाला बदल घडून येतात. मोठ्या प्रमाणात होणारी राजकीय ढवळाढवळ हा देखील मुद्दा यात असतो. असंख्य अनिश्चितता या मालाच्या बाबतीत आहेत.  या शिवाय आपल्या देशात इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रात देखील पायाभूत सुविधांचा आभाव आहे. वेगवान दळणवळण उपलब्ध नाहीत. शास्त्रीय साठवून व्यवस्था, शीतगृहांची साखळी यांची मोठी कमतरता आहे. यातून मार्ग काढतांना नुकसान होते ते नफ्याचे. अनेक वेळेला नफा होण्या ऐवजी तोटा होतो. हा तोटा भरून काढण्याच्या नादात फसवणूकि देखील होतात.  

यातील सर्व समस्यांना एकाच वेळी बगल देणे शक्य नसले तरी माहिती तंत्रज्ञान वापरून व वेळेच्या अगोदर सूचनांचे व्यवस्थापन करून या क्षेत्रातील नकारात्मकतेची दाहकता कमी करणे शक्य आहे. 

हि बाब लक्षात घेवून आम्ही "फार्म एक्सचेंज" हि सुविधा सुरु केली आहे. यात शेतकरी बांधव पुढील काळात आपल्या शेतातील कोणता माल विक्रीसाठी उपलब्ध होईल याची आगावू सूचना/माहिती नोंदवू शकतो. सोबत त्याचा जिल्हा व मोबाईल नंबर, उपलब्धतेच्या तारखा, गुणवत्ता याची देखील माहिती गोळा करण्यात येते. हि सर्व माहिती एकाच तक्त्यात जिल्हा निहाय वर्गीकृत करण्कयात येते. हा तक्ता सगळ्यांसाठी खुला ठेवण्यात येतो. 

माहिती तंत्रामुळे अंतरे कमी होतात. शेतकरी बांधवाने भरलेली माहिती दुसऱ्या क्षणाला मुंबई - दिल्ली - दुबई किंवा कुठेही बसलेला ग्राहक बघू शकतो. यातून व्यवहार चांगला होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढते.

जर आपण शेतकरी असाल तर इथे क्लिक करून आपण आपल्या मालाची माहिती देवू शकता. भविष्यात हि सुविधा वापरण्यासाठी आपण www.patilbiotechservices.in या वेबसाईटच्या होम पेजला भेट द्यावी. तिथे आपणास हि सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध आहे.

जर आपण व्यापारी असाल व शेतीमाल खरेदी करण्याची आपली इच्छा असेल तर इथे क्लीक करून आपण खुला डेटा बेस बघू शकता. वर सांगितल्या प्रमाणे यावेबसाईटच्या होमपेजवर आपणास हि लिंक सदैव उपलब्ध आहेच.

याशिवाय आपण आमचे टेलेग्राम चानल जॉईन करावे. यावर नियमित पणे प्रत्येक नोंद ट्रान्समिट केली जाते. त्यामुळे ते एका प्रकारच्या अलर्ट चे काम करते. टेलेग्राम चानल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

मित्रहो  "फार्म एक्सचेंज" हि एक निस्पृह व निरंतर सेवा आहे. यात कोणतीही माहिती गुप्त ठेवली जात नाही. शिवाय कोणत्याही माहितीची खात्री केली जात नाही. संशयास्पद माहिती, कालबाह्य माहिती सरळ सरळ डिलीट करण्यात येते. डिलीट केलेल्या माहितीसाठी आम्ही कुणाचीही तक्रार घेत नाही. एकूणच माहिती अद्ययावत असावी असा आमचा प्रयत्न आहे.

सावधान असणे जीवनाची गरज आहे. इथे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे सरळ सरळ व्यवहार करणे पूर्ण पणे चुकीचे आहे. दोघी पक्षांनी आपला व्यवहार जोखून करायचा आहे. "फार्म एक्सचेंज" आपल्या आर्थिक व्यवहारात भाग घेत नाही. आपल्या व्यवहारात आमची कोणतीही वित्तीय जबाबदारी नाही. 

माहिती घेते किंवा देते वेळी कोणतीही फी किंवा कमिशन घेण्यात येत नाही. आमची संस्था या बाबतीत कुणालाहि फोन करीत नाही, या बाबीची नोंद घ्यावी. असा कोणताही फोन आला तर तो फसवा असू शकतो, सावध असावे.

आमच्या फेसबुक पेजला ७० हजार पेक्षा अधिक फॉलोअर्स असून त्याद्वारे फार्म एक्सचेजची माहिती नियमित पणे प्रक्षेपित केली जाते. मित्रहो अंतरे खूप मोठी आहेत ती कापायची असतील तर चांगल्या बाबींचा प्रचार होणे गरजेचे आहे. आपण यात हातभर लावू शकता. आमच्या पेजला भेट देवून फोलो करा व आपल्याला आवडणाऱ्या आमच्या सोशल पोस्ट ला नियमित पणे लाईक व शेअर करत रहा.

 

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published