ऑफर्स वर ऑफर

३००० रु च्या पुढील सर्व खरेदीवर १० टक्के सूट.

3000 ऐवजी भरा फक्त २७०० रु '

४००० ऐवजी भरा फक्त ३६०० रु

फॅशनेबल टरबूज

फॅशनेबल टरबूज

Photo by Nicole De Khors from Burst

फॅशनेबल टरबूज म्हणजे काय? हा प्रश्न तुमच्या मनात आला म्हणूनच तुम्ही या ब्लॉगवर पोहोचला आहात.

ज्या व्यक्तीला आपले शरीर नीट झाकायचे असेल तो १०० रु खर्चून आपली गरज भागवू शकतो. आजकाल अशी माणसे तुम्हाला कमीच दिसतील. बाजारात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, दुकानदार एकापेक्षा एक सुरेख पोशाख दाखवतो. पोशाख निवडला कि त्याला साजेशे दागिने, घड्याळ, गॉगल, जोडे, टोपी, स्टिक असे सगळे आलेच! आता शरीर नीट झाकायची किंमत पोहोचली लाखावर!

एकूणच फॅशन म्हणजे "गरजेपेक्षा मोठी हौस आणि खिशापेक्षा मोठा खर्च!"

अर्थात या फॅशनचा परिणाम काय? "शक्यतेपेक्षा मोठी उलाढाल व अपेक्षेपेक्षा मोठा नफा!" अर्थात हा नफा त्यालाच मिळेल जो त्यासाठी तयार असेल! "लक फेवर्स प्रीपेअर्ड माइंड" या इंग्रजी उक्तीप्रमाणे "नशीब त्याचेच फळफळते जो त्यासाठी तयार असतो".

मी या ब्लॉगमधून काही अशा टरबूजांची ओळख करून देणार आहे जे तुम्हाला भरपूर नफा कमावून देतील. अर्थात ते टरबूज कुठे, केव्हा आणि कुणाला विकायचे हे समजायला, उमजायला व जमायला हवे!

सत्तरच्या दशकात आईसक्रिम व कोलाचा मोठा प्रचार-प्रसार झाला. जपानी तरुणाई याच्या इतकी आहारी गेली कि टरबूजाचा खप खूपच खालावला. जपानमधील टरबूज उत्पादक शेतकऱ्या समोर मोठी समस्या उभी राहिली. यामाशिता सॅन हा तरुण शेतकरी मात्र मागे हटायला तयार नव्हता. आरोग्याच्या दृष्टीकोनातून "आईसक्रिम व कोला" पेक्षा टरबूज उजवे होते. जपानमधील एका गटाचे अर्थकारण या टरबूजावर अवलंबून होते.

तरुणाईचे मन कसे आकर्षून घ्यायचे? एकदा यामाशिताला चौकोनी टरबूजाची कल्पना सुचली. १८ सेमी लांबी-रुंदी-उंचीचे ठोकळ्यासारखे टरबूज फ्रीजमध्ये (आईसक्रिम व कोला सोबत) ठेवायला सोपे होते. त्याने अनेक प्रयोग केले. अथक प्रयत्नानंतर एक साचा तयार करण्यात तो यशस्वी झाला. यामाशिताने या साच्याचा रीतसर पेटंट घेतला. त्याने या चौकोनी टरबूजाला "झेनसुझी" हे ब्रांडनेम देखील दिले. ते ताच्या शिवाराचे नाव होते. दुर्दैवाने हे सर्व करण्यात या टरबुजाचा उत्पादन खर्च प्रमाणाबाहेर वाढला. वाढीव किमतीमुळे सामान्य जनता हे टरबूज घ्यायला तयार नव्हती. यामाशिताच्या समोर हि एक नवी समस्या उभी राहिली. हा माणूस हार मानणारा नव्हता, त्याने हे फळ "खाद्य वस्तू" म्हणून न विकत "शो"ची वस्तू म्हणून विकायला सुरवात केली. हि युक्ती चांगलीच फळली. प्रत्येक फळ दुकानदार त्याच्या दुकानात हे फळ सजवून ठेवायला लागला. पुढे हे फळ "प्रेमाची भेट" म्हणून हि दिले जावू लागले. यातूनच हार्ट शेपचे "टरबूज" चलनात आले. आता एखाद्या तरुणाला प्रियसी बद्दल प्रेम व्यक्त करायचे असेल तेव्हा स्वत:च्या प्रेमाचे प्रतिक म्हणून तो-तिला "हार्ट शेपचे टरबूज" देवू लागला!

 


फोटो क्लि रू मोल्ड वि घेवू ता

मित्रहो, जपान मध्ये चौकोनी टरबूजाला साध्या टरबूजाच्या पाच पट अधिक किंमत मिळते तर हार्टशेपच्या टरबूजाला दहा ते वीस पट!. 

या टरबुजांची वैशिष्ट्य काय

 • हे टरबूज सहा महिने टिकते. (कारण ते कच्चेच काढलेले असते)
 • त्यांना सजवून प्रदर्शनीय ठेवले जाते
 • अतिशय कमी प्रमाणात उत्पादन घेतले जाते जेणेकरून ते सहजासहजी मिळणार नाही
 • त्याची किंमत साधारण टरबुजाच्या पाच ते दहा पट असते
 • त्यांचे ब्रँडिंग केलेलं असतं. 

मित्रहो तुम्हाला हा प्रयोग करून बघायचा असेल तर हे लक्षात घ्या

 • साचा कोणत्याहि मटेरियलचा असू शकतो फक्त तो कडक असावा व त्यातून आवश्यकतेएवढा प्रकाश व हवा खेळायला हवे
 • फळाच्या देठाला कुठलीही अडचण यायला नको
 • साचा लावल्यावर तो हलायला नको म्हणून योग्य सपोर्ट देता आला पाहिजे
 • टरबूजाच्या काही प्रजातीत चट्टे-पट्टे असतात तेव्हा साच्यात ठेवतांना त्यांच्या दिशेकडे लक्ष ठेवायला हवे  
 • वाढीत पडलेलं, कीड-डाग नसलेल्या टरबूजा भोवती हा साचा लावावा. पक्का आकार येण्यासाठी १०-१२ दिवस लागतात. 
 • आपण अनेक आकारांचा विचार करू शकतो फक्त साच्यात फळ अडकून बसणार नाही असा साच्याचा आकार असायला हवा
 • आपल्याकडील प्रतीके जसे शंकराची पिंड, फेंगशुईचा पिरॅमिड, धोबड आकाराचा गणपती, डमरू असे आकार देता येतील 

मित्रहो फक्त आकारच नाही तर आतील व बाहेरील  रंग, मिठास अश्या बाबीवर काम करून प्रयोगशीलता उपयोगात आणून अनेक प्रकारचे फॅशनेबल टरबूज बनवले जावू शकता. खाली काही फोटो देत आहे.

पिवळ्या गराचे टरबूज

जंबो टरबूज

फोटोवर क्लिक करून या फॅशनेबल टरबूजांचे खरेदी करू शकता

सिडलेस टरबूज

राखाडी रंगाचे टरबूज

  

प्रत्येक पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

 

आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

फेसबुक
टेलेग्राम

 

मित्रहो हा लेख कसा वाटला? यावर प्रतिक्रिया नक्की द्या. 

संदर्भ: 

https://www.youtube.com/watch?v=O4NsaILbsaI

सोयाबीन पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन
सोयाबीन पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन
बीज प्रक्रिया एकरी २५-३० किलो बियाणे लागते. बीज प्रक्रीये साठी ह्युमॉल जेली ५०० ग्राम + बुरशीनाशक...
Read More
मका पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन
मका पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन
 मक्याची लागवड वर्षातून तीन वेळा करता येते. पावसाळी लागवड मध्य जून ते मध्य जुलै, रब्बी लागवड मध्य...
Read More
टरबुज खरबुज लागवडीची पुर्वतयारी
टरबुज खरबुज लागवडीची पुर्वतयारी
शेतकरी मित्रहो, सदर लेख "पाटलांचा फळा" या आमच्या नियमित प्रसारित होणाऱ्या तात्कालिक युट्युब व्हिड...
Read More
हंगामानुसार कांदा बीजोत्पादन वेळापत्रक
हंगामानुसार कांदा बीजोत्पादन वेळापत्रक
खरिपातील जातींचे बीजोत्पादन : खरिपातील जातींचे कांदे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तयार होतात. या का...
Read More
पपई-मैलाचा दगड फेसबुक लाइव मधील महत्वाचे मुद्दे
पपई-मैलाचा दगड फेसबुक लाइव मधील महत्वाचे मुद्दे
पाटील बायोटेकचे फेसबुक लाइव हा दर शनिवारी सा. ६ वाजता होणारा कार्यक्रम शेतकरी व कृषीकेंद्र धारकां...
Read More
हळदीवरील करप्याचे नियंत्रण
हळदीवरील करप्याचे नियंत्रण
शेतकरी मित्रहो, सदर लेख "पाटलांचा फळा" या आमच्या नियमित प्रसारित होणाऱ्या तात्कालिक युट्युब व्हिड...
Read More
रब्बी मका घेणाऱ्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा!
रब्बी मका घेणाऱ्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा!
शेतकरी मित्रहो, सदर लेख "पाटलांचा फळा" या आमच्या नियमित प्रसारित होणाऱ्या तात्कालिक युट्युब व्हिड...
Read More
हरभर्‍याचा भरगोस फुलोरा
हरभर्‍याचा भरगोस फुलोरा
शेतकरी मित्रहो, सदर ब्लॉग पाटलांचा फळा या आमच्या नियमित युट्युब व्हिडीओ वर आधारित आहे. आमचे व्हिड...
Read More
Back to blog

युट्यूब