फॉलीबिओनचा वापर व फायदा

फॉलीबिओनचा वापर व फायदा

मित्रहो, पाटील बायोटेक प्रा. ली. ने फॉलीबिओन हे अनोखे उत्पादन बाजारात आणले असून ते महाराष्ट्रातील सर्व नामांकित कृषीकेंद्रात उपलब्ध आहे. या उत्पादांचे वैशिठ्य म्हणजे यात प्राणीजन्य प्रथिनाम्ल (Protein hydrolysate) अर्क असून  ते अतिशय शुद्ध स्वरुपात आहे.

बाजारात या श्रेणीतील जी उत्पादने आहेत त्यात मोठ्या प्रमाणात सोडियम असतो. सोडियम च्या अस्तित्वामुळे त्या उत्पादनात प्रथिनाम्लाचे प्रमाण कमी असते. सोडियम सोबत क्लोराईड मुळे पिकास फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होते.  

फोलीबीऑन  एन्झाइमद्वारे विघटीत कॉन्संट्रेट असून यात 60 ते 65 टक्के प्रथिनाम्ल आहे. संपूर्ण विद्राव्य असल्याने पानाद्वारे लगेच शोषले जाते. तयार प्रथिनांम्ल मिळाल्यामुळे पिक वेगाने वाढते. फोलीबिऑनची फवारणी शाखीय वाढीला मदत करते, फुलधारणा, परागीभवन व फळधारणेत सुधारणा करते. याच्या फवारणी मुळे पिकात विपरीत वातावरणात टिकून रहायची क्षमता विकसित होते. कीटकनाशक, खते व तणनाशकाच्या चुकीच्या वापराने पिकावर पडणारा ताण कमी करण्यास व पिकवाढीचा वेग पूर्ववत करण्यात फोलीबिऑन अतिशय प्रभावी आहे. .

 

--------------------------------
आमची दर्जेदार खते मिळवण्यासाठी
इथे क्लिक करा
-------------------------------

 

कुठल्याही कारणाने आपल्या पिकाची वाढ खुंटली आहे किंवा कमी आहे; हे तुम्हास जाणवले कि फवारणीसाठी १५ मिली प्रती १५ लिटर वापरावे. जर फवारणी शक्य नसेल तर ठिबकद्वारे २ लिटर प्रती एकर द्यावे.

----------------------------------
आपणास आमची उत्पादने विक्री करायची का?
इथे क्लिक करा
---------------------------------

आजारी व्यक्तीस ज्या प्रमाणे आपण टॉनिक देतो तसे फॉलीबिओन हे संकटात सापडलेल्या पिकासाठी टॉनिकच आहे.  सामान्य परिस्थितीत प्रत्येक वनस्पती सूर्यप्रकाश, हवा, पाणी व मुळातून शोषल्या जाणाऱ्या अन्नद्रव्याच्या मदतीने शर्करेची निर्मिती करते व या शर्करेचा वापर करून आवश्यक प्रथिनांम्ल बनवली जातात, याचे पुढे हवे त्या प्रथिनात रुपांतर होते. तयार प्रथिनाच्या मदतीने चयअपचय  प्रक्रिया वाढते व परिणामी आपल्याला पिकात वाढ दिसून येते. 

संकटात सापडलेल्या पिकात सामान्य प्रक्रियेत अडथळे आल्याने पिकाची वाढ थांबते. अश्या वेळी फॉलीबिओन ची फवारणी केल्याने वनस्पतीस तयार प्रथीनाम्ल मिळते, त्या पासून वनस्पती आवश्यक प्रथिने बनवून चयअपचय प्रक्रिया पूर्ववत करते.

ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी पडणे, तणनाशकाच्या बाधेमुळे चयअपचय थांबणे, कीड-रोगाचा प्रकोप झाल्याने प्रकृती खालावणे, मृदेत संतुलित मात्रेत अन्नद्रव्य उपलब्ध नसणे, पाणी कमी पडल्याने मुळ करपणे, या पिकाच्या वाढीच्या काळातील मुख्य समस्या आहेत. अश्या सर्व परिस्थितीतून सुधारणेसाठी पिकास तयार प्रथिनांम्ल देणे अपरिहार्य आहे.

पाटील बायोटेक प्रस्तुत फॉलीबिओन हे उत्पादन उच्च तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक प्लांट टॉनिक आहे, आवश्यक त्या वेळी याचा वापर करून आपल्या पिकाच्या वाढीचा वेग उत्कृष्ट ठेवावा

----------
वाचकांचा प्रश्न
जाधव चंद्रकांत दत्तराव- फोलीबिओन कोणत्या पिकासाठी उपयोगी पडेल?
पाटील बायोटेक: फोलीबिओनचा उपयोग प्रत्येक पिकात केला जावू शकतो. भाजीपाला, फळभाज्या, व्यापारी पिके, फळबागा, फुलशेती अश्या सर्व पिकात फोलीबीओन अतिशय उपयोगी आहे. इतकेच काय तर शेती व्यतिरिक्त परस बागेत न लॉन मध्ये देखील याचा उपयोग करण्यात येतो.
Back to blog