शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त पुस्तके

प्लानिंग आले लागवडीचे

अलीकडील काळात आले हे व्यापारी पिक म्हणून उदयास आले आहे. भरगोस उत्पादनाच्या यशोगाथांमुळे अनेक शेतकरी या पिकाकडे वळले. दुर्दैवाने प्रत्येकास भरगोस नफा झाला नाही. व्यवस्थापनातील चुका, मागणीपेक्षा मोठा पुरवठा यामुळे नुकसान झाले. अपेक्षाभंग झाला. आल्याचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी इथे काही मुद्दे देत आहे. आपल्या मनात काही प्रश्न असल्यास कॉमेंट सेक्शनमध्ये विचारावे.
  • लागवडीस एप्रिल-मे हा चांगला सिझन आहे. जून १५ नंतर लागवड करूच नये. कीड रोगाच्या नियंत्रणाचा खर्च वाढतो.
  • हमखास नफा हवा असेल तर सुरवातीपासून मार्केटवर चांगली नजर ठेवावी. टप्याटप्याने नफा घेत राहिल्यास बाजारातील चढ उतार आपली आर्थिक गळचेपी करू शकणार नाही.
  • काढणीसाठी टप्पे असे आहेत - सहा महिने (फ्रेश आले), आठ महिन्याने (प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्यासाठी लागणारे आले). भाव मिळत नसल्यास चौदा ते सोळा महिन्या पर्यत काढणी लांबवता येते. आले जमिनीत ठेवून वर पिक घेणे शक्य आहे.    
 • या पिकास २५ टक्के सावली मानवते त्यामुळे परीसरा नुसार, नारळ, सुपारी, कॉफी अशा बागांमध्ये हे पिक घेतले जाते. आपल्या भागात आपण पपई, कोथींबीर, झेंडू, मिरची, तूर, गवार अशी आंतरपिके घेवू शकता. अशा व्यवस्थापनासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे
 • उत्तम पूर्वमशागत करावी जेणेकरून जमीन चांगली भूसभुशीत होईल. जमिनीच्या मगदुरानुसार योग्य भरखते व जोरखते नक्की द्यावीत. यावेळी मायक्रोडील ग्रेड १ हे खत एकरी १० किलो तर ह्युमोल जी कंद स्पेशल एकरी ३० किलो दराने द्यावे.
    
 • माहिम, महिमा,रिओ-डी-जानरो, चायना, मारन जमेका, वरदा, रीजाथा असे वाण उपलब्ध आहेत. आपल्या परीसरानुसार पाटील बायोटेकचे तज्ञ आपले मार्गदर्शन करतात, त्यासाठी संपर्क साधावा.
 • जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफे, गादी वाफा व सरी वरंबा पद्धतिने लागवड करण्यात येते. 
 • बेणे निवडतांना कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅम, लांबी २.५ ते ५ सें.मी., २ ते ३ डोळे फुगलेले निवडावे. 
 • एकरी एक टन बेणे लागते त्याच्या बीजप्रक्रियेसाठी २०० लिटर पाण्यात खालील प्रमाणे औषधे मिसळावीत व पाळीपाळीने २५-५० किलो बेणे यात १५-२० मिनिटे बुचकवून ठेवावे त्यानंतर २० मिनिट सावलीत सुकवावे 
  • बुरशीनाशके कार्बेन्डाझिम (५० टक्के) ३०० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ६०० ग्रॅम व
  • कीटकनाशक  क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) ४०० मि.लि. किंवा डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) २०० मि.लि. आपण हि औषधे ऑनलाईन खरेदी करू शकता.
   • लागवड करते वेळी कंद ४ ते ५ सें.मी. खोल, डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूस ठेवावा
   • लागवडीनंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना ६० ते ७५ ग्रॅम ॲट्राझीन (तणनाशक) प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यापाठोपाठ १०-१२ दिवसांनी ६० ते ७५ मि.लि. ग्लायफोसेट प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उगवण झाल्यावर तणनाशक वापरू नये. 

  • विद्राव्य खते 19-19-19; 12-61-00 व पोटाशियम शोनाईट या खतांच्या योग्य वेळी वापराने पिकाच्या वाढीचे टप्पे वेळे नुसार गाठता येतात. 
  • अमृत प्लस आळवणी कीट च्या वापरातून दुय्यम खतांचे चांगले व्यवस्थापन होते. कीटमधील घटक ठिबक ने सोडू शकता.  एकरी एक कीट वापरायची असून त्यामुळे एनपीके खतांचा अपटेक वाढतो.  
  • आल्यात कंदमाशी, पाने गुंडाळणारी अळी, खोड पोखरणारी अळी, सूत्रकृमी या किडींचा त्रास संभवतो तर कंदकूज, पानावरील ठिपके हे बुरशीजन्य रोग देखील येवू शकतात. याबद्दल अधिक माहितीसाठी वेगळा ब्लॉग देत असून तो नक्की वाचवा.
  • काढणीच्या वेळी गड्डे बाहेर काढताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • पाला कापून गड्डे, नवीन आल्याची बोटे वेगळी करावीत. कंद स्वच्छ धुवून मातीपासून वेगळे करावेत. यासाठी मशिनरी उपलब्ध आहेत. 

  या विषयावर आमचे अन्य ब्लॉग वाचायला विसरू नका, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

    

  या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

  तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

   इथे क्लिक करा.

   

  7 comments

  • Sarv mahiti patva plz

   9890160896
  • Nice information 👍👍👍👍👍

   Shivprasad sonawane 9049712022
  • 1\2 acre var lagvad karaychi aahe. please guide.

   Hemant Dorlikar
  • आले पीक दुरीला(16महिने)साठी ठेवायचे आहे मार्गदर्शन करा plz

   निलेश दत्तात्रय येवले
  • Please send me fertilizer chart for this crop

   Sharad Sanas

  Leave a comment

  Name and Mobile number .
  .
  Message with Address, District & Pincode .

  Please note, comments must be approved before they are published