या कडीची अळी पिवळसर, गुळगुळीत असते. तिला पाय नसतात . तोंडाकडील भाग जाड असतो. लांबी दोन सेंटीमीटर च्या आसपास असते. अळी कोषावस्थेत जाते व आठ ते नवू दिवसात त्यातून भुंगे बाहेर येतात.
या भुंग्याची मादी फांदीवर दोन वर्तुळाकार चक्र तयार करते.
दोन चक्राच्या मध्ये भोक पडून त्यात, मिलन झाल्यावर, अंडी देते. प्रत्येक मादी अश्या प्रकारे कमीत कमी ७८ अंडी घालू शकते!
त्यामुळे शेंड्याकडील भाग वाळतो. त्यातून निघणारी अळी काडीच्या आतला भाग पोखरून टाकते.
या किडीची सुरवात लक्षात येत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष्य द्यायला हवे.
जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात कीड यायला सुरवात होते व ऑक्टोबर च्या शेवटपर्यंत सक्रिय रहाते. लक्ष न दिल्यास शेंगांच्या प्रमाणात, त्यातील दाण्यांच्या संख्येत आणि वजनात ५० ते ६०% पर्यंत घट येऊ शकते.
शंभर पैकी पाच झाडांवर कीड दिसून आल्यास लगेच फवारणी हाती घ्यावी.
कोम्बो कीटकनाशक प्रकर्षाने वापरावे
थायमेथोक्झाम १२.६ % + लामडासायहेलोथ्रीन ९.५% झेड सी (सिंजेटा चे अलिका) ४ मिली प्रती पंप. काढणीपूर्वी ४० दिवसात वापरू नये
ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही -(होस्टॉथिऑन, सुटाथिऑन, टायटन, जोश, ट्रायझोसेल, चार्म, त्रिकोन, टायटन, सरताज, ट्रायझो) १.२५ मिली प्रती लिटर, काढणीपूर्वी ३० दिवसात वापरू नये
क्लोरानट्रानिप्लोर १८.५ टक्के (ड्यूपांटचे कोराजेन) ४.५ मिली प्रती १५ लिटर
इथीऑन ५० टक्के प्रवाही -(लेझर, इन्डोथिऑन, इथीओसूल, फॉसमाईट, मिट ५०५, निलमाईट, टाफेथिऑन) – २ ते ३ मिली प्रती लिटर काढणीपूर्वी ३० दिवसात वापरू नये
थायक्लोप्रीड २१.७ टक्के (अलांटो) १.५ मिली/लिटर - काढणीपूर्वी १७ दिवसात वापरू नये
प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी-(क्यूरॅक्रॉन, कॅरीना, सेलक्रॉन, प्रहार, प्रोफेक्स, प्रबल, बॅन्जो, सिमक्रॉन) - 2 मिली प्रती लिटर काढणीपूर्वी ४० दिवसात वापरू नये
फोटो: डॉ. प्रकाश कुमार, सहा. संचालक. एग्रोनामी संशोधन शाखा, राजस्थान सरकार, एनबीएआय आय मार्फत
संदर्भ: केंद्रीय कीटकनाशक बोर्ड
सोयबीन वरील कीड व कीडनियंत्रके डेटाबेस खालील टेबलवर बघू शकता. डेटा इंग्रजी आहे, सर्च विंडोचा वापर कुरून बघा.