हरभरा शेती बद्दलच्या तीन अश्या गोष्टी ज्या बदलवतील तुमचा दृष्टिकोन!

मित्रहो हरभरा हे पिक डाळवर्गीय पिकातील सर्वाधिक परवडणारे व चविष्ट असे हे पिक आहे. मला तुम्हाला तीन अशा गोष्टी सांगायच्या आहेत ज्यामुळे या पिकाबद्दलचा आपला दृष्टीकोन बदलेल.  

 • जागतिक उत्पादनात भारताचा वाटा ७५ टक्के असला तरी आयात-निर्यातीची गोळाबेरीज केली तर आपण हरभरा आयात करतो. एकूणच हरभरा उत्पादन वाढीला अजून वाव आहे. पाकिस्तान हा जगातला सर्वात मोठा आयातक आहे, जर आपले हरभरा उत्पादन वाढले व आपण तो निर्यात केला तर शत्रूवर व्यापारावर आधारित वरकडी रहाणे शक्य आहे. इतरही अनेक देशात हरभऱ्यास मोठी मागणी आहे.
 • उत्पादन क्षमतेचा विचार केला तर सर्वाधिक उत्पादन क्षमता बिहार, त्या पाठोपाठ आंध्रप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र व शेवटी मध्यप्रदेश असा उतरता क्रम लागतो. बिहारची उत्पादन क्षमता हि महाराष्ट्राच्या दुप्पट व मध्यप्रदेशाच्या चौपट आहे! वातावरण, वाण व तंत्रज्ञान यातील फरकामुळे उत्पादन क्षमतेत एव्हडी मोठी दरी आहे. 
 • तिसरी व सर्वात महत्वाची बाब म्हणजे उत्पादन क्षमता कमी असली तरी सर्वाधिक उत्पादन (४० टक्के) हे मध्यप्रदेशात होते. त्यापाठोपाठ राजस्थानात १४%, महाराष्ट्रात १०%, बिहार मध्ये ९%, आंध्रप्रदेशात ७% व उर्वरित इतर राज्यात होते. गेल्या काही वर्षात आंध्रप्रदेश व कर्नाटकातील उत्पादन वाढते आहे. 

  एकूण विचार केला तर मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील शेतकरी जास्त क्षेत्रातून कमी उत्पादन घेत आहेत. म्हणजेच जर आपण आहे त्याच पद्धतीने हरभऱ्याची शेती केली तर जितके जास्त क्षेत्र लागवड कराल (बिहार व आंध्रप्रदेशी तुलनात्मक दृष्ट्या) तितके जास्त नुकसान होईल!

  ------------------

  फेसबुक, व्हाटसएप व टेलेग्राम वरीलआमच्या सोशल गृप्सला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा आणि वेळो वेळी प्रसारित होणारे लेख नियमित मिळवा.

  ------------------

  यातून मार्ग काय? 

  परिवर्तन हा निसर्गाचा महत्वाचा नियम आहे. आपणास हरभरा उत्पादन घ्यायचे असेल तर चांगले तंत्रज्ञान वापरावे लागेल. वातावरणा नुसार योग्य  बदल करून व चांगले वाण निवडून हरभरा पिकाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. 

  आपण जर हरभरा उत्पादन वाढवू शकलो तर

  • कुपोषणाचा कलंक मिटवता येईल कारण हरभरा हा चविष्ट प्रथिनाचा उत्तम स्त्रोत आहे
  • निर्यात वाढवून परदेशी चलन कमवता येईल त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची स्थिती सुधारेल
  • एकरी उत्पादन वाढल्याने नफा वाढेल व शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल 

  मित्रहो या कार्यात पाटील बायोटेक प्रा. ली. आपल्या पाठीशी आहे.

  हरभऱ्याच्या उत्तम जाती कोणत्या? तयारी कशी करायची? कोणती खते व औषधी वापरल्याने खर्च कमी होईल? असे अनेक प्रश्न आपण विचारू शकता.  आमच्या तंत्रज्ञानाचा व तज्ञांचा आपणास लाभ होईल. 

    

  या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

  तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

  इथे क्लिक करा.

   

  हरभऱ्या बद्दल आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा